PHOTO : ना योगा, ना वॉकिंग, बॉलिवूडचा नवा फिटनेस मंत्रा!
सलमान खान, रणबीर कपूर, आयुषमान खुराना, सारा अली खान अनेक कलाकार रस्त्यावर सायकल चालवताना दिसले. (Bollywood Celebrities Cycling during Lockdown)

- कोरोना काळात कलाकारांपासून सर्वसामान्यांपर्यंत सर्वजण फिट राहण्याचा प्रयत्न करत आहेत. सूर्यनमस्कार करण्यापासून योगापर्यंत, धावण्यापासून ते एक्सरसाईज करण्यापर्यंत सर्वजण वेगवेगळे वर्कआऊट करत असतात.
- लॉकडाऊनपासून बॉलिवूडमध्ये एक नवा फिटनेस मंत्रा रुजू झाला आहे तो म्हणजे सायकलिंग…
- लॉकडाऊन काळात सलमान खान, रणबीर कपूर, आयुषमान खुराना, सारा अली खान, जॉन अब्राहम यासारखे अनेक कलाकार रस्त्यावर सायकल चालवताना दिसले.
- अभिनेता रणबीर कपूर काही दिवसांपूर्वी घराबाहेर एक फॅन्सी सायकल चालवताना दिसला. तसेच सायकल चालवताना त्याने मास्कही लावला होता.
- अभिनेता आयुषमान खुराना सध्या त्याच्या परिवारासोबत वेळ घालवत आहे. काही दिवसांपूर्वी त्याने चंदीगडमधील रस्त्यांवर सायकल चालवतानाचा एक व्हिडीओ शेअर केला होता.
- बॉलिवूडचा भाईजान अभिनेता सलमान खान हा अनेकदा सायकल चालवताना दिसतो. बिझी शेड्युलमध्येही वेळात वेळ काढून सायकल चालवतो.
- लॉकडाऊनदरम्यान अभिनेत्री डेजी शाहने स्वत:ला फिट ठेवण्यासाठी सायकल चालवणं सुरु केलं होतं. ती आठवड्यातून पाच दिवस सायकलिंग करते.
- तसेच अभिनेत्री सारा अली खानही तिचा भाऊ इब्राहिम अली खानसोबत सायकल चालवताना दिसत आहे. त्या दोघांनी याबाबतचा एक व्हिडीओही शेअर केला आहे.








