AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

“कोरोना लसीला मंजुरी दिली असली तरी संघर्ष संपलेला नाही”, लसीकरणाचं मोठं आव्हान: बोरिस जॉनसन

ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉनसन यांनी लसीला मंजुरी दिली असली तरी कोरोना विरुद्धचा संघर्ष संपला नसल्याचे वक्तव्य केलं आहे Boris Johnson Corona Vaccine

कोरोना लसीला मंजुरी दिली असली तरी संघर्ष संपलेला नाही, लसीकरणाचं मोठं आव्हान: बोरिस जॉनसन
| Updated on: Dec 03, 2020 | 10:40 AM
Share

लंडन: ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉनसन यांनी कोरोना लसीला मंजुरी दिली असली तरी संघर्ष संपला नसल्याचे वक्तव्य केलं आहे. कोरोलना लसीला मंजुरी दिली असली तरी लसीकरणाचं मोठं आव्हान समोर असल्याची जाणीव त्यांनी देशवासियांना करुन दिली. पाश्चिमात्य राष्ट्रांमध्ये ब्रिटनच्या सरकारनं फायझर-बायोएनटेक या कोरोना लसीला मंजुरी दिली आहे. त्यामुळे ब्रिटनमध्ये आता मोठ्या प्रमाणात लसीकरणाला सुरुवात होणार आहे. या कोरोना लसीला मेडिसिन अ‌ॅन्ड हेल्थकेअर पॉडक्ट्स रेग्युलेटरी अ‌ॅथॉरिटी अर्थात MHRA नं आपत्कालीन वापराला परवानगी दिली आहे. (Boris Johnson said struggle against corona is not over after approval of vaccine)

बोरिस जॉनसन यांनी लसीचा साठा -70 डिग्री सेल्सिअस तापमानाला लस साठवली जात आहे. एका व्यक्तीला दोन वेळा लस देणे आवश्यक आहे. तीन आठवड्यांच्या कालावधीमध्ये कोरोना लसीचे दोनदा द्यावी लागणार आहे. यामुळे प्रत्येक व्यक्तीला लस देण्यासाठी कित्येक महिने लागतील, असं बोरिस जॉनसन यांनी सांगितले.

अति-आशावादी राहू नका

बोरिस जॉनसन यांनी कोरोना लसीबाबत अति-आशावाद बाळगू नये, असे सांगतिले. कोरोना लसीला मंजुरी दिल्यानंतर आपला संघर्ष संपला आहे, असं समजू नये,असं आवाहन ब्रिटनच्या नागरिकांना केले आहे. ब्रिटनमधील लॉकडाऊन उठवण्यात आलं आहे, त्यामुळे अर्थव्यवस्थेच्या महत्वाच्या क्षेत्रांना खुलं करण्यात आलं आहे, असंही जॉनसन यांनी सांगितले.

MHRA ला UK सरकारनं 1 जानेवारी पूर्वी विशेष नियमांद्वारे लसीला मंजुरी देण्यासाठी अधिकृतरित्या सांगितलं होतं. येत्या काही दिवसांत लसीचा पहिला टप्पा बाजारात येईल अशी माहिती कंपनीकडून देण्यात आली आहे. UK सरकारनं लसीचे 40 लाख डोस खरेदी केले आहेत, जे चाचणीच्या शेवटच्या टप्प्यात ९५ टक्के प्रभावशाली ठरले आहेत. (Boris Johnson said struggle against corona is not over after approval of vaccine)

भारतात पंतप्रधान मोदींकडून लसीचा आढावा

भारतात अहमदाबाद, हैदराबाद आणि पुण्यात कोरोना लसीची निर्मिती सुरु आहे. पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटकडून निर्माण केली जाणारी लस अंतिम टप्प्यात असल्याची माहिती आहे. या लसीचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी 28 नोव्हेंबरला पुणे दौऱ्यावर आले होते. अहमदाबादमधील झायडस कॅडिला, हैदराबादेतील भारत बायोटेक आणि पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटमध्ये निर्मिती केली जाणाऱ्या लसीचा आढावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतला. ऑक्सफर्ड विद्यापीठ, अ‌ॅस्ट्रा झेनेका आणि सीरम इन्स्टिट्यूटद्वारे संयुक्तरित्या कोरोना लसीची निर्मिती सुरु आहे. तर लसीच्या वितरणाबाबत केंद्र सरकारनं आतापासूनच मोठी तयारी सुरु केली आहे.(Boris Johnson said struggle against corona is not over after approval of vaccine)

संबंधित बातम्या :

BREAKING | फायझर-बायोएनटेक कोरोना लसीला मंजुरी देणारा पहिला देश ठरला UK! पुढील आठवड्यापासून वितरण सुरु

अमेरिकेत कोरोना विषाणूचा संसर्ग चीनपूर्वी? अमेरिकेतील संस्थेच्या अहवालात दावा

(Boris Johnson said struggle against corona is not over after approval of vaccine)

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.