औरंगाबादमध्ये गळा चिरुन बहिण-भावाची हत्या, परिसरात खळबळ

औरंगाबादमधील एका घरात बहिण-भावाची हत्या करण्यात आली (Aurangabad Sister and Brother Murder) आहे.

औरंगाबादमध्ये गळा चिरुन बहिण-भावाची हत्या, परिसरात खळबळ
Follow us
| Updated on: Jun 10, 2020 | 8:23 AM

औरंगाबाद : औरंगाबादमधील एका घरात बहिण-भावाची हत्या करण्यात आली (Aurangabad Sister and Brother Murder) आहे. ही घटना काल (9 जून) रात्रीच्या दरम्यान जिल्ह्यातील सातारा परिसरातील एमआयटीजवळ घडली आहे. बहिण-भावाच्या हत्येने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान, या दोघांचे मृतदेह गळा चिरलेल्या अवस्थेत बाथरुममध्ये आढळले (Aurangabad Sister and Brother Murder) होते.

सातारा परिसर, एमआयटी जवळील अल्फाईन हॉस्पिटलजवळ राहणारे लालचंद राजपुत हे शेतीच्या कामानिमित्त परिवारासह जालना येथे गेले होते. घरात त्यांची मोठी मुलगी किरण लालचंद राजपुत (19) आणि तिचा भाऊ सौरभ राजपुत (17) हे दोघे घरात होते.

रात्रीच्या सुमारास लालचंद राजपुत हे घरी परतले. त्यांनी वाहनाचा हॉर्न वाजवला. हॉर्न वाजवून घरातून प्रतिसाद मिळत नसल्याने त्यांनी वाहन उभे करून घराची पाहणी केली. यावेळी त्यांना बाथरूममध्ये दोघा बहिण-भावाचे मृतदहे आढळले. दोघांचे गळे चिरून हत्या करण्यात आली होती. आरडाओरड केल्याने परिसरातील नागरीकांनी घटनास्थळी धाव घेतली.

घटनेची माहिती मिळताच उपायुक्त डॉ. राहुल खाडे, पोलीस निरीक्षक सुरेंद्र माळाळे यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेतली. दोघा बहिण-भावाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी घाटी रुग्णालयात पाठवला. हत्येचे नेमके कारण कळू शकले नाही.

“हत्या दुपारच्या दरम्यान झाली असून रात्री उघडकीस आली. याप्रकरणी सातारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरु होती”, असं पोलिसांनी सांगितले.

संबंधित बातम्या :

Pimpri Murder | पिंपरीत प्रेमप्रकरणातून 20 वर्षीय तरुणाची हत्या, सहा जणांना अटक

लातुरात थरार, अनैतिक संबंधातून पतीची हत्या, मग पत्नीची आत्महत्या, अखेर प्रियकरानेही स्वतःला संपवलं

मुंबईत कोरोनाग्रस्ताची हत्या, हत्येच्या पाच दिवसांनी रिपोर्ट पॉझिटिव्ह, आता मृतदेहच रुग्णालयातून गायब

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.