…तर पॅन कार्ड रद्द होणार, आयकर विभागाचा 17 कोटी नागरिकांना निर्वाणीचा इशारा

आयकर विभागाने 17 कोटी नागरिकांना इशारा दिला आहे (pan card will be closed).

...तर पॅन कार्ड रद्द होणार, आयकर विभागाचा 17 कोटी नागरिकांना निर्वाणीचा इशारा
– आता कॅटेगरी मेन्यूमध्ये Individual ऑप्शन निवडा. यानंतर सगळी महत्त्वाची कागदपत्रं सबमिट करा.
Follow us
| Updated on: Feb 15, 2020 | 1:41 PM

मुंबई : देशातील 17 कोटी नागरिकांनी अद्यापही आपलं पॅन कार्ड आधार कार्डसोबत लिंक केलेलं नाही. मात्र, येत्या 31 मार्च 2020 पर्यंत पॅन कार्डला आधार कार्डसोबत लिंक केलं नाही तर 17 कोटी नागरिकांचे पॅन कार्ड रद्द होईल, असा निर्वाणीचा इशारा केंद्रीय प्रत्यक्ष कर बोर्डाने (सीबीडीटी) दिला आहे (pan card will be closed).

पॅन कार्डला आधार कार्डसोबत लिंक करण्यासाठी केंद्र सरकारने याअगोदर अनेकवेळा मुदतवाढ दिली आहे. मात्र, अजूनही देशातील 17 कोटी नागरिकांनी आपलं पॅन कार्ड आधार कार्डसोबत लिंक केलेलं नाही. त्यामुळे येत्या 31 मार्च 2020 पर्यंत या नागरिकांनी पॅन कार्ड आधार कार्डसोबत लिंक केलं नाही तर त्यांचे पॅन कार्ड रद्द होणार आहे.

सीबीडीटीने दिलेल्या माहितीनुसार, 27 जानेवारी 2020 पर्यंत 30.75 कोटी पॅन कार्ड आधार कार्डसोबत लिंक करण्यात आले आहेत. मात्र, तरीही अजून 17.58 कोटी पॅन कार्ड आधार कार्डसोबत लिंक करण्यात आलेले नाहीत.

कलम 139 अअ(2)च्या अंतर्गत 1 जुलै 2017 पर्यंत ज्या लोकांकडे पॅन कार्ड आणि आधार कार्ड आहेत त्यांनी आयकर विभागाला आधार क्रमांकाचा नंबर देणं अनिवार्य आहे (pan card will be closed).

कसं कराल पॅन कार्ड आधार कार्डशी लिंक?

– सर्वात अगोदर आयकर विभागाची अधिकृत वेबसाईट incometaxindiaefiling.gov.in वर जावं लागेल. – वेबसाईटवर आल्यानंतर डाव्या बाजूला आधार कार्डशी लिंक करण्याचा पर्याय दिसेल. – त्यानंतर नवीन पेज ओपन होईल. या नव्या पेजवर लाल रंगात Click here असं लिहिलं असेल. – तुम्ही याअगोदर पॅन कार्ड आधार कार्डसोबत लिंक केलं असेल तर या पेजवर क्लिक करुन तुम्ही त्याची पडताळणी करु शकतात. – तुम्ही लिंक केलं नसेल तर Click here च्या खाली बॉक्समध्ये पॅन नंबर, आधार नंबर आणि नाव विचारलं असेल. ते सर्व पर्याय भरायचे. – त्यानंतर Link Aadhar या पर्यायावर क्लिक करायचे. या क्लिकसोबतच पॅन कार्डला आधार कार्डसोबत लिंक करण्याची प्रक्रिया पूर्ण होईल.

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.