रियानं सुशांतवर आध्यात्मिक उपचार करुन घेतले होते. त्याचाही सीबीआय तपास करत आहे (CBI investigating spiritual therapy over Sushant).
खरंतर, सुशांतच्या आत्महत्येवरून अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. सुशांतने आत्महत्या केली होती की त्याची हत्या करण्यात आली यावर मोठा सस्पेन्स पाहायला मिळाला. सुशांतने आत्महत्या नाही तर त्याची हत्या करण्यात आली असं त्याच्या चाहत्यांचं म्हणणं आहे.
Follow us
मुंबई :सुशांत सिंहच्या मृत्यूचा तपास करण्यासाठी सीबीआयचे 16 अधिकारी मुंबईत तळ ठोकून आहेत. ते प्रत्येक अँगलनं तपास करतायत (CBI investigating spiritual therapy over Sushant). मात्र सर्वांचीच नजर सुशांतची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीवर आहे. रियाला समन्स पाठवल्याचं सीबीआयकडून सांगण्यात येतंय. मात्र समन्स आलाच नसल्याचं रियाच्या वकिलांनी म्हटलंय. सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी आज सुशांत आणि रिया ज्या रिसोर्टमध्ये राहिले होते, तिथंही धडक दिली.