सेलिब्रिटी शेफ घरातील किचनमध्ये मृतावस्थेत आढळल्याने खळबळ

इन्स्टाग्रामसारख्या सोशल मीडियावर सेलिब्रिटी शेफ जगी जॉन प्रचंड लोकप्रिय होती.

सेलिब्रिटी शेफ घरातील किचनमध्ये मृतावस्थेत आढळल्याने खळबळ

तिरुअनंतपुरम : ‘जगीज् कूकबुक’ या कुकरी शोमुळे लोकप्रियतेच्या शिखरावर असलेली प्रसिद्ध मॉडेल आणि सेलिब्रिटी शेफ जगी जॉन हिचा मृतदेह (Celebrity chef Jagee John death) आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. राहत्या घरातील किचनमध्ये जगी मृतावस्थेत सापडली. मात्र तिच्या मृत्यूचं गूढ उकलण्यात पोलिसांना अद्याप यश आलेलं नाही.

जगी जॉन केरळमधील कुर्वणकोनममध्ये आईबरोबर राहत होती. जगीचा मृतदेह दुपारी चार वाजताच्या सुमारास तिच्या मित्रांनी पाहिला. त्यांनी ही माहिती पोलिसांना दिल्यामुळे हा प्रकार उघडकीस आला.

जगीच्या शरीरावर कोणतीही जखम आढळलेली नाही. त्यामुळे पोलिसांनी शवविच्छेदन करण्याचा निर्णय घेतला आहे. पोस्टमार्टम रिपोर्ट आल्यानंतरच जगीच्या मृत्यूचं कारण स्पष्ट होईल.

हेही वाचा : ‘धाकड गर्ल’ गीता फोगट आई झाली!

जगी जॉन 45 वर्षांची होती. तिचा जन्म सौदी अरेबियात झाला, तर इंग्लंड, यूएस आणि भारतात तिचं शिक्षण झालं. इन्स्टाग्रामसारख्या सोशल मीडियावर जगी प्रचंड लोकप्रिय होती. नाताळच्या निमित्ताने रविवारी केलेली पोस्ट तिची अखेरची पोस्ट ठरली. Celebrity chef Jagee John death

Published On - 11:21 am, Wed, 25 December 19

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI