रस्ते अपघातातील जखमींवर मोफत उपचार, लवकरच मोदी सरकारची मोठी योजना

रस्ते अपघातातील जखमींवर मोफत उपचार करण्याबाबतची ही योजना आहे. (Central government scheme on Road Accident)

रस्ते अपघातातील जखमींवर मोफत उपचार, लवकरच मोदी सरकारची मोठी योजना
Follow us
| Updated on: Jul 01, 2020 | 4:16 PM

नवी दिल्ली : मोदी सरकार रस्ते अपघातातील जखमींवरील उपचारांबाबत मोठी योजना घेऊन येत आहे.  रस्ते अपघातातील जखमींवर मोफत उपचार करण्याबाबतची ही योजना आहे. (Central government scheme on Road Accident) . रस्ते अपघातात जखमी झालेल्या व्यक्तीला तब्बल अडीच लाख रुपयांपर्यंतचा उपचार मोफत केला जाणार आहे. (Motor vehicle relief fund)

देशात दरवर्षी जवळपास पाच लाख रस्ते अपघात होतात. जगातील सर्वाधिक रस्ते अपघात हे भारतात होतात. अपघातातील जखमी आणि मृतांची संख्याही मोठी आहे. दरवर्षी रस्ते अपघातात जवळपास दीड लाख लोकांचा मृत्यू, तर तीन लाख लोक अपंग होतात. त्यामुळे आता केंद्र सरकारने अपघातातील जखमींवर अडीच लाखापर्यंत मोफत उपचार करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे.

अपघातामध्ये जखमी झालेल्या व्यक्तींना तातडीने उपचार मिळावा, त्याचा जीव वाचावा हा सरकारचा हेतू आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाने राज्यांच्या परिवहन सचिवांना आणि परिवहन आयुक्तांना याबाबत पत्र पाठवलं आहे. त्यानुसार कॅशलेस ट्रीटमेंट योजनेसाठी मोटर वाहन सहाय्यता निधी  (Motor vehicle relief fund) जमा केला जाईल.

विमा कंपन्यांचीही मदत

मोटर वाहन सहाय्यता निधीत रस्ते वाहतूक मंत्रालयासह विमा कंपन्यांचाही सहभाग असेल. ज्या वाहनांचा विमा आहे आणि हिट अँड रन प्रकरणांमध्ये जखमींवरील खर्च विमा कंपन्या करतील.

रस्ते वाहतूक मंत्रालय यासाठी राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरण अर्थात नॅशनल हेल्थ अथॉरिटीची (National Health Authority) मदत घेणार आहे. आरोग्य प्राधिकरणानेही आयुष्यमान भारत पंतप्रधान जन आरोग्य योजना लागू केली होती. राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरण रस्ते अपघातातील जखमींवर उपचार करण्यासाठी मोठा वाटा उचलू शकतो.  जखमींवरील उपचारानंतर रुग्णालयांकडून आलेले क्लेम किंवा कॅशलेस प्रक्रिया राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणच परस्पर पाहून घेईल.

इन्शुरन्स नसेल तर स्वत: खर्च करावा लागेल

रस्ते अपघातातील पीडितांसाठी अपघात आणि आरोग्य सेवांसाठी एका विशिष्ट खात्यांतून निधी दिला जाईल. मात्र, जर अपघातग्रस्त गाडीचा विमा नसेल, तर भरपाई म्हणून उपाचाराचा खर्च वाहन मालकाला करावा लागेल.

दरम्यान, भारतात प्रत्येक वर्षी रस्ते अपघातात 1 लाख 50 हजारपेक्षा अधिकांचा मृत्यू होत आहे. परिवहन मंत्रालयाच्या माहितीनुसार, भारताता प्रत्येक दिवशी अंदाजे 1200 रस्ते अपघात होतात. यामध्ये जवळपास 400 लोकांचा मृत्यू होतो.

संबंधित बातम्या :

लॉकडाऊनमुळे पुण्यात रस्ते अपघात घटले, एप्रिलमध्ये केवळ 3 अपघात, बळींचा आकडा…

कोल्हापुरात रस्ते अपघातांचं प्रमाण वाढलं, वर्षभरात 340 जणांचा मृत्यू

Non Stop LIVE Update
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.