कोल्हापुरात रस्ते अपघातांचं प्रमाण वाढलं, वर्षभरात 340 जणांचा मृत्यू

कोल्हापूर जिल्ह्यासाठी काळ ठरणारे हे ब्लॅक स्पॉट पालकमंत्र्यांच्या आदेशानंतर तरी हटवले जातील अशी (Kolhapur accident death) अपेक्षा वाहनधारकांना आहे.

कोल्हापुरात रस्ते अपघातांचं प्रमाण वाढलं, वर्षभरात 340 जणांचा मृत्यू

कोल्हापूर : वाढते रस्ते अपघात हा दिवसेंदिवस गंभीर विषय बनत चालला आहे. विशेषतः कोल्हापूर जिल्ह्यात रस्ते अपघातांचे प्रमाण वाढलं (Kolhapur accident death) आहे. कारण कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या वर्षभरात 340 जणांना रस्ते अपघातात आपला जीव गमवावा लागला आहे. तर तितकेच लोक जखमीही झाले आहेत. त्यामुळं कोल्हापूरचे रस्ते प्रवाशांसाठी काळ ठरताहेत का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. या अपघातांच्या आकडेवारीची दखल आता खुद्द पालकमंत्र्यांनीच घेतली आहे.

राष्ट्रीय महामार्ग असो, राज्य महामार्ग असो किंवा शहरातील रस्ते, प्रत्येकाला कमी वेळेत आपल्या इच्छित स्थळी पोहचायची घाई असते. त्यातच दळणावळच्या सोयीसाठी बनवलेले चकचकीत रस्ते आणि आटोमॅटिक वाहनांमुळे रस्ते अपघाताच प्रमाण देखील वाढतं आहे. पण अनेक वेळा रस्ते सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक काळजी न घेतल्यानं देखील तितकेच अपघात वाढल्याचं आकडेवारीतून स्पष्ट झालं आहे.

कोल्हापूर जिल्ह्यात एकाच ठिकाणी वारंवार अपघात होणारे 84 ब्लॅक स्पॉट आहेत. ज्या ठिकाणी वर्षभरात 340 जणांचा मृत्यू झाला (Kolhapur accident death) आहे.

या जिल्ह्यात गेल्या वर्षभरात 340 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 500 हून अधिक जण जखमी झाले आहेत. कोल्हापूर शहरात दोनपेक्षा अधिक वेळा अपघात झालेली 29 ठिकाण आहेत. तर जिल्ह्यातील राज्यमार्गावर तब्बल 29 ब्लॅक स्पॉट आहेत. पुणे बँगलोर महामार्गावर कोल्हापूर जिल्ह्याच्या हद्दीत तब्बल 89 ब्लॅक स्पॉट असल्याची धक्कादायक माहितीही यानिमित्ताने उघड झाली आहे.

कोल्हापूर जिल्हा पोलिसांनी अधोरेखित केलेल्या ही अपघातांची ठिकाण आणि मृतांची आकडेवारी नक्कीच चिंताजनक आहे. त्यामुळे आता खुद्द पालकमंत्री सतेज पाटील यांनी या ब्लॅक स्पॉटची दखल घेतली आहे. पोलीस प्रशासनासह सार्वजनिक बांधकाम विभाग आणि अन्य संबंधित विभागांना त्यांनी चार महिन्यात या ब्लॅक स्पॉटबाबत प्रभावी उपाय योजना करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

खरं तर सुरक्षित प्रवास हा प्रत्येकाचा अधिकार आहे. पण रस्ते सुरक्षेच्या दृष्टीने म्हणावे तसे प्रयत्न प्रशासनाच्या पातळीवर केले जात नाही. म्हणूनच अनेक प्रवाशांचे दररोज जीव जात आहेत. किमान कोल्हापूर जिल्ह्यासाठी काळ ठरणारे हे ब्लॅक स्पॉट पालकमंत्र्यांच्या आदेशानंतर तरी हटवले जातील अशी (Kolhapur accident death) अपेक्षा वाहनधारकांना आहे.

Published On - 10:42 pm, Wed, 5 February 20

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI