Coronavirus Lockdown : दारुची दुकानं बंदच राहणार, केंद्राने नेमकं काय म्हटलंय?

लॉकडाऊनमध्ये काही किराणा आणि अन्य दुकानांना सशर्त परवानगी (Govt clarification on wine shops ) दिली असली, तरी मद्य आणि वाईन दुकानांवर बंदी कायम असेल, असं केंद्राने स्पष्ट केलं आहे.

Coronavirus Lockdown : दारुची दुकानं बंदच राहणार, केंद्राने नेमकं काय म्हटलंय?

नवी दिल्ली : लॉकडाऊनमध्ये काही किराणा आणि अन्य दुकानांना सशर्त परवानगी (Govt clarification on wine shops ) दिली असली, तरी मद्य आणि वाईन दुकानांवर बंदी कायम असेल, असं केंद्राने स्पष्ट केलं आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाने याबाबतची माहिती दिली. त्यामुळे देशात मद्यविक्रीवर बंदी कायम असेल. राज्यासह देशभरात दारु दुकानं-वाईन शॉप सुरु ठेवण्याची मागणी केली जात होती. त्यावर केंद्राने हे स्पष्टीकरण दिलं.

महाराष्ट्रात तर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून महसुलासाठी वाईन शॉप सुरु करण्याचा विचार व्यक्त केला होता. मात्र यावर आता केंद्रानेच स्पष्टीकरण देत, देशभरातील दारु दुकानं बंदच राहतील असं म्हटलं. (Govt clarification on wine shops )

ग्रामीण भागात कोणती दुकानं सुरु?

याआधी काल केंद्राने दुकानांबाबत महत्त्वपूर्ण निर्णय घेतला होता. त्यानुसार गृहमंत्रालयाने (Ministry of Home Affairs) मॉल्स किंवा मोठी दुकानं वगळता इतर दुकानदारांना दुकानं सुरु ठेवण्याची सशर्त परवानगी दिली आहे.

शहरी भागात कोणती दुकानं सुरु?

त्यानतंर आज पुन्हा गृहमंत्रालयाने स्पष्टीकरण देताना, शहरी भागातील कॉम्प्लेक्स, निवासी भागातील दुकाने आणि निवासी संकुलांमध्ये असलेली दुकाने उघडण्यास परवानगी असल्याचं म्हटलं. मात्र शॉपिंग मार्केट, मार्केट कॉम्प्लेक्स आणि शॉपिंग मॉल्सना परवानगी नाही.

दारुच्या दुकानांबाबत नेमका निर्णय काय?

सर्व दुकानांना परवानगी दिली पण दारुच्या दुकानांबाबत निर्णय काय, अशी विचारणा सर्वत्र होत असताना, केंद्रीय गृहमंत्रालयाने आज त्याबाबत स्पष्टीकरण दिलं.

केंद्राने नेमकं काय म्हटलं आहे?

केंद्रीय गृहमंत्रालयाने आज स्पष्टपणे नमूद केलं आहे की, दारु किंवा तस्तम घटकांच्या विक्रीला पूर्णपणे बंदी आहे. लॉकडाऊनदरम्यान, कोव्हिड 19 किंवा कोरोना रोखण्यासाठी जे निर्बंध घातले आहेत, ते या घटकांना लागूच राहतील.

(Govt clarification on wine shops )

हॉटस्पॉट असलेल्या ठिकाणांना सवलती नाही

देशातील कोरोना हॉटस्पॉट किंवा कंटेनमेंट झोन असलेल्या ठिकाणी दुकान सुरु करण्याची सूट दिली जाणार नाही. तिथे सर्व दुकानं ३ मेपर्यंत बंदच राहतील.

संबंधित बातम्या 

महसुलासाठी वाईन शॉप्स सुरु करा, राज ठाकरे यांचं मुख्यमंत्र्यांना पत्र

केंद्र सरकारचा मोठा निर्णय, अटीशर्तींसह दुकानं सुरु ठेवण्यास परवानगी   

व्वा! राज बाबू!!, सामनाचा अग्रलेख, राज ठाकरेंचा फोटोही छापला

Published On - 12:55 pm, Sat, 25 April 20

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI