मैत्रिणींच्या वाढदिवसाचा केक खाल्ला, 15 विद्यार्थिनींना विषबाधा

केक खाल्ल्यानंतर 15 विद्यार्थिनींना मळमळ आणि उलटीचा त्रास जाणवू लागला. त्यानंतर विद्यार्थिनींना तातडीने जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले.

मैत्रिणींच्या वाढदिवसाचा केक खाल्ला, 15 विद्यार्थिनींना विषबाधा

चंद्रपूर : शाळेत मैत्रिणींच्या वाढदिवसाचा केक (Food Poisoning From cake) खाल्ल्याने 15 विद्यार्थिनींना विषबाधा झाली आहे. यापैकी 6 विद्यार्थिनींना डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली ठेवण्यात आले आहे. चंद्रपूर शहरातील बागला चौकात असलेल्या मुरलीधर बागला कॉन्व्हेंट शाळेत ही घटना घडली. शाळेतील 15 विद्यार्थिनींना केक खाल्ल्याने विषबाधा झाल्याने परिसरात एकच खळबळ उडाली.

मुरलीधर बागला कॉन्व्हेंट शाळेतील सहाव्या ‘ब’ वर्गातील विद्यार्थिंनीनी (Food Poisoning From cake) वर्गातील दोन मैत्रिणींचा वाढदिवस वर्गातच साजरा करण्याचे ठरविले. दुपारच्या सुट्टीत त्यांचा वाढदिवस साजरा करण्याचं ठरलं. यामध्ये त्यांच्या शिक्षिका देखील सहभागी झाल्या. यासाठी शाळेलगतच्या परिसरात असलेल्या एका दुकानातून केक आणला. मोठ्या उत्साहात त्या विद्यार्थिनींचा वाढदिवस साजरा करण्यात आला.

मात्र, हा केक खाल्ल्यानंतर 15 विद्यार्थिनींना मळमळ आणि उलटीचा त्रास जाणवू लागला. त्यानंतर विद्यार्थिनींना तातडीने जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. यामध्ये वाढदिवस असलेल्या दोन्ही विद्यार्थिनींचा समावेश आहे. यापैकी 6 विद्यार्थिनींवर वैद्यकीय उपचार सुरु आहेत. त्यांना डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आलं आहे. तर इतर विद्यार्थिनींना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे.

केकमधून विषबाधा झाल्याने हा प्रकार घडला असावा असा पालक आणि विद्यार्थिनींचा दावा आहे. दरम्यान, शाळा व्यवस्थापनाने या प्रकाराची दखल घेत योग्य तक्रार करण्याचे (Food Poisoning From cake) ठरविले आहे.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI