शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रावर फसवणूक केल्याची तक्रार दाखल

बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि तिचा पती राज कुंद्रा यांच्यावर एका उद्योगपतीने फसवणूक केल्याची तक्रार दाखल केली (Fraud case against Shilpa Shetty and Raj Kundra) आहे.

शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रावर फसवणूक केल्याची तक्रार दाखल

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि तिचा पती राज कुंद्रा यांच्यावर एका उद्योगपतीने फसवणूक केल्याची तक्रार दाखल केली (cheating complaints against Shilpa Shetty and Raj Kundra) आहे. मुंबईतील एक नॉन-रेसिडेन्शिअल इंडियन उद्योगपती सचिन जे. जोशी यांनी पोलिसात तक्रारीत केली आहे. हे प्रकरण सोन्याचा व्यापार करणारी कंपनी ‘सतयुग गोल्ड प्रायव्हेट लिमिटेड’शी (एसजीपीएल) संबंधित आहे. कुंद्रा हे यापूर्वी या कंपनीचे माजी (cheating complaints against Shilpa Shetty and Raj Kundra) संचालक होते.

मुंबईतील खार पोलीस स्टेशनमध्ये जोशी यांनी शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा, गणपती चौधरी, मोहम्मद सैफीसह एसजीपीएलच्या इतर अधिकाऱ्यांवर फसवणूक केल्याची तक्रार दाखल केली आहे.

उद्योगपती सचिन जोशी आणि राज कुंद्रा-शिल्पा शेट्टी यांच्यात 2014 रोजी देवाण-घेवाणीवरुन वाद झाला होता. 15 दिवसांपूर्वी जोशी यांनी पोलिसात तक्रार दाखल केली आहे, अशी माहिती समोर येत आहे.

“मला लालच देऊन माझी फसवणूक केली आहे. 2014 रोजी सुरु करण्यात आलेल्या एसजीपीएलची सतयुग गोल्ड स्कीमद्वारे फसवणूक केली आहे”, असा आरोप मुंबईतील एक नॉन-रेसिडेन्शिअल इंडियन उद्योगपती सचिन जे. जोशी यांनी केला आहे.

पोलिसांसोबत संपर्क केला असता ते म्हटले, “सध्या या प्रकरणाची पूर्ण चौकशी सुरु आहे. याशिवाय सविस्तर सागंण्यासाठी पोलिसांनी नकार दिला आहे.”

“सतयुग गोल्ड स्कीमद्वारे विकलेली पाच वर्षाच्या स्वर्ण योजनेद्वारे डिस्काऊंट देत खरेदीदारांना सतयुग गोल्ड कार्ड दिले. पाच वर्षानंतर एक निश्चित प्रमाणात किंमत देणार असल्याचेही सांगितले होते”, अशी माहिती तक्रारदार जोशी यांनी दिली.

दरम्यान, यापूर्वीही शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा अनेक वादात सापडले आहेत. अंडरवर्ल्ड डॉन इक्बाल मिर्ची यांच्यासोबत राज कुंद्राचे आर्थिक संबंध असल्याचा आरोपही त्यांच्यावर झाला आहे. ईडीने यासंबंधी कुंद्रा यांना नोटीसही दिली होती. पण कुंद्रा यांनी हे सर्व आरोप फेटाळले होते.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI