मी कित्येक वेळा माझा जीव धोक्यात घालून सर्व ठिकाणी फिरतो, मी थकलोय : खासदार संभाजीराजे

सरकारने ताबडतोब पावलं उचलावीत, एवढीच माझी विनंती आहे," अशी प्रतिक्रिया राज्यसभेचे खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी दिली. (Chhatrapati Sambhaji Raje on Maratha Reservation)

मी कित्येक वेळा माझा जीव धोक्यात घालून सर्व ठिकाणी फिरतो, मी थकलोय : खासदार संभाजीराजे
sambhajiraje chhatrapati


मुंबई : “मी माझा जीव धोक्यात घालून मराठा समाजासाठी फिरत आहे. सरकारला काय बोलायचं? काय सांगायचं? मी आता बोलून बोलून थकलो आहे. सरकारने ताबडतोब पावलं उचलावीत, एवढीच माझी विनंती आहे. मी थकून गेलो आहे,” अशी उद्विग्न प्रतिक्रिया राज्यसभेचे खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी व्यक्त केली. (Chhatrapati Sambhaji Raje on Maratha Reservation)

‘टीव्ही 9 मराठी’शी संवाद साधताना त्यांनी हा उद्वेग व्यक्त केला. “मी किती वेळा बोलायचं. मी माझा जीव धोक्यात घालून सर्व ठिकाणी फिरत असतो. जालना, कोल्हापूर, नवी मुंबई या ठिकाणी होतो. मी आता बोलून बोलून थकलो आहे. मी गर्दीत सोशल डिस्टन्सिंग न पाळता फिरत आहे. मी माझा जीव धोक्यात घालून सर्व समाजासाठी करत आहेत. अजूनही वेळ गेलेली नाही, सरकारने ताबडतोब पावलं उचलावीत. एवढीच विनंती आहे. मी थकलो आहे. थकून गेलो आहे,” असे संभाजीराजे म्हणाले.

“मी काल, परवा, अनेक दिवसांपासून बोलतोय की फ्लोअर मॅनेजमेंट व्यवस्थित होणं गरजेच आहे. मी हे देखील सांगितले होते की सामान्य डिपार्टमेंट जे आहे त्यांच्या सचिवांना कोऑर्डिनेट करायला सांगा, माझं अशोक चव्हाणांशी दोन दिवसांपूर्वी बोलणं झालं होतं की उपसमितीची मिटिंग लावा, पण ती मिटिंगही झालेली दिसत नाही. त्याचंच मला आश्चर्य वाटतंय,” असेही संभाजीराजेंनी सांगितले.

“सरकारी वकील उपस्थित नव्हते हे दुर्दैवं”

“सरकारी वकील कुठे आहेत? असा सवाल सर्वोच्च न्यायालयाकडून केला जातो आणि तिथे वकील उपस्थित नसतात हे दुर्देव आहे. गंभीर आहे. त्यामुळे अशोकराव जिथे कुठे असतील त्यांनी कृपया कोऑर्डिनेट करा,” अशी विनंती संभाजीराजेंनी केली.

“मराठा समाजाला तुम्ही अशा पद्धतीने गृहित का धरायला लागले आहेत का? त्यांच्याशी खेळखंडोबा करायला लागले आहेत. हे बरोबर नाही. माझी हात जोडून विनंती आहे सरकारला की सर्वोच्च न्यायालयात समाजाचं आरक्षणावरील स्थगिती उठवण्यासाठी जी केस सुरु आहे तिथे वकिलांना पोहोचावं. आमचा वकिलांवर पूर्ण विश्वास आहे, त्याबद्दल काहीही दुमत नाही. पण आपली बाजू तिथे मांडणं महत्त्वाचं आहे,” असेही त्यांनी यावेळी म्हटलं.

“मराठा आरक्षण हा विषय गांभीर्याने घ्या. त्यातील बारकावे समजून घ्या हे, मी सरकारला नेहमी सांगितलं आहे. जे कोणी सामान्य विभागाचे जे कोणी सचिव असतील त्यांनी याचा फॉलोअप घेणं गरजेचे आहे. काही तरी तांत्रिक घोळ झाला आहे, असे माझ्या कानावर आले आहे. पण त्यातही आपल्याकडे वेळ आहे. आपण दुरस्ती करु शकतो. जर पुढच्या सुनावणीत कोणी हजर राहिलं नाही तर हा मॅसेज चुकीचा जाईल. त्यामुळे सरकाराला माझी विनंती पूर्वक सूचना आहे की ताबडतोब जी चूक झाली ती दुरुस्त करा,” अशी कळकळीची विनंतीही त्यांनी राज्य सरकारला केली.

संबंधित बातम्या : 

सरकारवर विश्वास नसेल तर मराठा संघटनांनी त्यांचा वकील लावावा : अशोक चव्हाण

Maratha Reservation LIVE | मराठा आरक्षण सुनावणी काही काळासाठी तहकूब

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI