माझी खुर्ची समाजाच्या बरोबर हवी, समाजाच्या वर नको- संभाजीराजे

माथाडी कामगारांचे नेते नरेंद्र पाटील यांनी नवी मुंबईच्या माथाडी भवनमध्ये मराठा आरक्षणाच्या आंदोलनाची पुढील रणनीती ठरवण्यासाठी बैठक आयोजित केली आहे.

माझी खुर्ची समाजाच्या बरोबर हवी, समाजाच्या वर नको- संभाजीराजे
Follow us
| Updated on: Oct 07, 2020 | 1:22 PM

नवी मुंबई: मराठा आरक्षणासंदर्भात पुढील दिशा ठरवण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत भाजपचे खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी आपल्या एका कृतीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. यावेळी त्यांनी व्यासपीठावर ठेवलेल्या खुर्चीवर न बसता समन्वयकांसह खालीच बसणे पसंत केले. आपण राजे घराण्याच्या सन्मान राखलात, आमच्यासाठी दोन मोठ्या खुर्च्या ठेवल्या. पण मी त्यावर बसणार नाही. मी माझ्या समाजसोबतच खाली बसणार, अशी भूमिका संभाजीराजे यांनी घेतली. (Chhatrapati Sambhaji Raje in Maratha reservation meeting )

यानंतर संभाजीराजे यांनी आयोजकांना आपल्याला अशाप्रकारे वेगळी वागणूक देऊ नये, अशी विनंतीही केली. मी इथे येतोय म्हणजे मी समाजाचा घटक म्हणून येतो. ज्यावेळी मानपान घ्यायच्या त्यावेळी पुढाऱ्यांकडून आम्ही तो बरोबर घेतो. माझी सुद्धा खुर्ची समाजाच्या बरोबर हवी, समाजाच्या वर नको, असे संभाजीराजे यांनी म्हटले.

यावेळी संभाजीराजे यांनी उपस्थितांना राजर्षी शाहू महाराज यांच्यासंदर्भातील एक किस्सा सांगितला. शाहू महाराज मराठा समाजाच्या एका कार्यक्रमात गेले होते. त्यावेळी शाहू महाराजांनी आपल्या भाषणात मी तुमचा सेवक असल्याचे सांगितले. मी छत्रपती घराण्यातील असलो, मी राजे जरी असलो तरी, मी समाजाचा सेवक असल्याचे सांगत राजर्षी शाहू महाराज खाली बसल्याची आठवण संभाजीराजे यांनी सांगितले.

माथाडी कामगारांचे नेते नरेंद्र पाटील यांनी नवी मुंबईच्या माथाडी भवनमध्ये मराठा आरक्षणाच्या आंदोलनाची पुढील रणनीती ठरवण्यासाठी बैठक आयोजित केली आहे. या बैठकीच्यानिमित्ताने उदयनराजे आणि संभाजी राजे पहिल्यांदाच मराठा आरक्षणच्या मुद्द्यावर एकत्र येणार होते. पण ऐनवेळी खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांनी बैठकीला येणे रद्द केले.

संबंधित बातम्या:

मोठी बातमी! मराठा आरक्षणाच्या बैठकीला उदयनराजेंची दांडी; संभाजीराजेंची हजेरी!

(Chhatrapati Sambhaji Raje in Maratha reservation meeting )

Non Stop LIVE Update
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?.
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?.
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.
ही धमकी समजा नाहीतर... , राज ठाकरेंच्या टीकेवरून मनसेचा राऊतांना इशारा
ही धमकी समजा नाहीतर... , राज ठाकरेंच्या टीकेवरून मनसेचा राऊतांना इशारा.
सांगलीत तिहेरी लढत, मविआतच बंड अन् ठाकरेंचं वाढलं टेन्शन
सांगलीत तिहेरी लढत, मविआतच बंड अन् ठाकरेंचं वाढलं टेन्शन.
अमरावतीत शरद पवारांचा माफीनामा, ... तेव्हा चूक झाली, यापुढं होणार नाही
अमरावतीत शरद पवारांचा माफीनामा, ... तेव्हा चूक झाली, यापुढं होणार नाही.
वंचित उमेदवाराची माघार, भाजपची डोकेदुखी तर काँग्रेसला मिळणार दिलासा
वंचित उमेदवाराची माघार, भाजपची डोकेदुखी तर काँग्रेसला मिळणार दिलासा.
शिंदेंच्या बंडाचा आणखी एक पत्ता उघडला, टपरीवरून शिंदेंचा ठाकरेंना फोन
शिंदेंच्या बंडाचा आणखी एक पत्ता उघडला, टपरीवरून शिंदेंचा ठाकरेंना फोन.