AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

गद्दाफी, सद्दाम हुसैन आणि आता बशर, हुकूमशहांचे कसे झाले साम्राज्य उद्ध्वस्त

सीरियाची राजधानी दमिश्क यांच्यावर बंडखोरांना ताबा मिळविला आहे. तसेच सीरियाचे राष्ट्राध्यक्ष बशर अल-असद देश सोडून फरार झाले आहेत. त्यामुळे सध्या पंतप्रधानांचा हातात येथील सत्ता असून लवकरच नवे सरकार येणार आहे.

गद्दाफी, सद्दाम हुसैन आणि आता बशर, हुकूमशहांचे कसे झाले साम्राज्य उद्ध्वस्त
| Updated on: Dec 09, 2024 | 6:13 PM
Share

Civil war in Syria : सीरियात बंडखोरांनी सत्ता उलथवून टाकली आहे. सीरियाची राजधानी दमिश्कवर बंडखोरांनी ताबा मिळविला आहे. सीरियाचे राष्ट्रपती बशर अल-असद देशातून परांगदा झालेले आहेत. या गृहयुद्धानंतर आता बशर अल-असद यांचे शासनाचा अंत झाला आहे. सीरियात अल-असद यांच्या कुटुंबाची ५३ वर्षांहून अधिक काळ राजवट चालली होती. या सत्तेला लोकांनी तिलांजली दिली आहे.

सीरियाची राजधानी दमिश्कवर बंडखोरांनी ताबा मिळविताच बशर अल असद याच्या वडीलांच्या पुतळ्यांना तोडण्यात आले आहे. अशा प्रकारे अनेक देशात झाले आहे. जे लोक हुकूमशाह सर्व सत्ताधीश होते. त्यांच्या मनमानीला कंटाळून अखेर तेथील जनतेने तेथील सरकार पाडाल्यानंतर त्यांच्या पुतळे तोडून टाकले आहेत. चला तर पाहूयात आतापर्यंत कोणत्या हुकूमशाह यांच्या सत्ता पालटानंतर तेथील जनतेचे त्यांचे पुतळे उद्ध्वस्त करुन टाकले आहेत.

हाफीज अल-असद- सीरिया

साल १९७१ मध्ये बशर अल असद यांचे वडील हाफीज अल असद यांनी सीरियात सत्तापालटून टाकत आपल्या हातात सत्ता घेतली होती. त्यांनी त्यांच्या विरोधातील बंडाला हिंसक रुपाने उत्तर देऊन बंड मो़डून टाकले होते.

सीरियातील विद्रोही गटाने राजधानी दमिश्कवर कब्जा करीत पळपुटे राष्ट्राध्यक्ष बशर अल-असद याचे वडील हाफीज अल-असद यांचे पुतळे तोडले आहेत. ते एक सीरियाई राजकारणी आणि सैन्य अधिकारी होते. साल १९७१ ते २००० मध्ये त्यांचा मृत्यू होईपर्यंत ते सीरियाचे १८ वे राष्ट्राध्यक्ष होते.

सद्दाम हुसैन- इराक

सद्दाम हुसैन दोन दशकांहून अधिक काळ इराकचे राष्ट्राध्यक्ष होते. त्यांचा जन्म साल १९३७ च्या एप्रिल महिन्यात इराकच्या उत्तरेला असलेले तिकरीत गावात झाला होता. साल १९५७ मध्ये त्यांनी बाथ पार्टीचे सदस्य झाले. जी आता अरब राष्ट्रवादाची एक समाजवादी रुपाची मोहीम चालवत आहे.

साल १९६२ मध्ये इराकमध्ये बंडाळी झाली होती आणि ब्रिगेडियर अब्दुल करीम कासिम यांनी ब्रिटनच्या पाठींब्याने चाललेले राजेशाही हटवून सत्ता आपल्या ताब्यात घेतली. त्यानंतर १९६८ मध्ये पुन्हा बंडखोरी झाली. सद्दाम हुसैन यानी जनरल अहमद हसन अल बक्र सोबत सत्तेवर कब्जा केला होता. ९ एप्रिल २००३ रोजी इराकच्या बगदाद येथील फिरदौस स्क्वेअर येथे सदाम हुसैन यांच्या मोठ्या पुतळ्याला इराकच्या नागरिकांनी आणि अमेरिकन सैनिकांना पाडून टाकले. या घटनेला संपूर्ण जगातील मिडीयाने कव्हर केल होते. याला इराकमध्ये सद्दाम यांच्या राजवटीचा अंत म्हणून मानले जाते.

मुअम्मर अल गद्दाफी – लिबिया

मुअम्मर अल गद्दाफी यांचे संपूर्ण नाव मुअम्मर मोहम्मद अबू मिनयार गद्दाफी होते. संपूर्ण जग त्यांना कर्नल गद्दाफी नावाने ओळखायचे. केवळ २७ व्या वर्षी त्यांनी लिबियात सत्तापालट करुन सुमारे ४२ वर्षे राज्य केले. त्यांचा अंत सिर्त शहरात एका नाटो सैन्यांच्या हल्ल्यात झाला होता. लीबियाच्या त्रिपोलीत २०११ मध्ये विद्रोही बंडखोरांनी कर्नल गद्दाफीच्या बाब अल-अजीजिया परिसरावर कब्जा केला होता. त्यांनी याच दरम्यान गद्दाफी यांचे पुतळे पाडून टाकला होता. २५ एकर जागेवरील महल आता कचऱ्याचा ढीग बनला आहे. बाजार आणि पाळीव जनावरांसाठी एम्पोरियमचे घर आहे.

शेख मुजीबुर्रहमान

ऑगस्टमध्ये बांग्लादेशात सत्तापालट झाला होता. त्यानंतर पंतप्रधान शेख हसीना बांग्लादेश सोडून भारतात आल्या. त्यानंतर बांग्लादेशाचे राष्ट्रपिता म्हटले जाणाऱ्या शेख मुजीबुर्रहमान यांच्या पुतळ्याला पाडण्यात आले. बांग्लादेशाच्या स्वातंत्र्यासाठी ते लढले होते. बांग्लादेशाची निर्मिती झाल्यानंतर तर पहिले शेख मुजीबुर्रहमान पहिले राष्ट्राध्यक्ष झाले. त्यांना बंगबंधु म्हणून पदवी मिळाली होती.परंतू त्यांचा उल्लेख जगातील हुकूमशाहात होत नाही.

व्लादिमीर लेनिन- यूक्रेन

रशियन क्रांतीचा जनक व्लादिमीर लेनिन यांना मानले जाते. साल १९१७ मध्ये रशियन क्रांती यशस्वी झाली आणि फेब्रुवारी १९१७ मध्ये रशियातील झारची राजवट संपली. त्यास बोल्शेविक क्रांती म्हटले जाते. सोव्हीएत संघाच्या पाडावानंतर युक्रेनमध्ये व्लादिमीर लेनिन यांच्या पुतळ्यांना पाडण्यात आले. १९९० च्या दशकात हे वेगाने झाले. तसेच युक्रेनच्या काही पश्चिम शहरात व्लादीमीर लेनिनच्या स्मारकांना पाडण्यात आले.

डीए राजपक्षे- श्रीलंका

डीए राजपक्षे श्रीलंकन राजकीय नेते आणि संदस्य होते. त्यांना १९४७ ते १९६५ पर्यंत हंबनटोटा जिल्यात बेलिएट्टा निर्वाचन क्षेत्राचे प्रतिनिधीत्व केले होते. त्यांना देखील हुकूमशाहा मानले जात नाही.श्रीलंकेच मे २०२२ मध्ये झालेल्या बंडखोरीत लोकांनी महिंद्रा राजपक्षे आणि गोटबाया राजपक्षे यांचे वडील डीए राजपक्षे यांच्या पुतळ्याला पाडण्यात आले होते. राजपक्षे यांच्या कुटुंबामुळे देशाचे नुकसान झाले आणि अर्थव्यवस्था घसरल्याचा आरोप झाला होता.

मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र
मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र.
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?.
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला.
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी.
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्....
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्.....
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य.
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी.
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले...
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले....
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन.
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर..
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर...