CM Uddhav Thackeray | महाराष्ट्रात काय सुरु, काय बंद? आरोग्य, शिक्षण ते आपत्ती सज्जता, मुख्यमंत्र्यांचे सर्व महत्वाचे मुद्दे

विद्यापीठ परीक्षा तातडीने घेणे शक्य नाही, जितके सेमिस्टर झाले, त्याची सरासरी काढून पास करणार, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.

CM Uddhav Thackeray | महाराष्ट्रात काय सुरु, काय बंद? आरोग्य, शिक्षण ते आपत्ती सज्जता, मुख्यमंत्र्यांचे सर्व महत्वाचे मुद्दे
Follow us
| Updated on: May 31, 2020 | 10:06 PM

CM Uddhav Thackeray | मुंबई : राज्य सरकारने लॉकडाऊन 5 साठी(CM On Maharashtra Mission Begin Again) नवी नियमावली जाहीर केली. त्या पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जनतेला संबोधित केलं . यावेळी मुख्यमंत्री महाराष्ट्राला अनलॉक कसं करणार याबाबत माहिती दिली. ‘मिशन बिगीन अगेन, म्हणजे पुनश्च हरीओम, लॉकडाऊन हे विज्ञान असेल, तर ते उघडणं ही कला आहे’, असं मुख्यमंत्री (CM On Maharashtra Mission Begin Again) म्हणाले.

तसेच त्यांनी अनेक महत्त्वाच्या घोषणा केल्या. विद्यापीठ परीक्षा तातडीने घेणे शक्य नाही, जितके सेमिस्टर झाले, त्याची सरासरी काढून पास करणार, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. लॉकडाऊन उठवण्याविषयी मुख्यमंत्री म्हणाले, “इतर देशांप्रमाणे आपल्याला उघडझाप करायची नाही, आपण एकदा उघडलेली गोष्ट बंद करायची नाही. एकदा लॉकडाऊन काढला की पुन्हा तो लावावा लागणार नाही यासाठी आपले प्रयत्न आहेत.”

CM Uddhav Thackeray LIVE Updates

  • विद्यापीठ परीक्षा तातडीने घेणे शक्य नाही, जितके सेमिस्टर झाले, त्याची सरासरी काढून पास करणार, जर कोणाला अधिक गुण मिळवण्याची इच्छा असेल, त्यांना नंतर अंदाज घेऊन परीक्षेची संधी देऊ : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
  • 16 लाख मजुरांना ट्रेन आणि बसने परराज्यात पाठवलं, पियुषजी धन्यवाद, तुम्ही मनावर घेतलं त्यामुळे 11 लाख मजूर ट्रेनने गेले, 42 हजार एसटीमधून सव्वापाच लाख मजूर राज्याच्या सीमेवर, मुख्यमंत्री निधीतून 85 ते 90 कोटी रुपये खर्च : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
  • महाराष्ट्रात गेले दोन महिने उपचार करण्यावर भर दिला, टास्क फोर्स अविरत मेहनत करत आहे, मृत्यूदर कमी करायचा आहे, माझा एक निष्ठावान कार्यकर्ता चाचणीसाठी गेला आणि तिथेच कोसळला, लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
  • येत्या पावसाळ्यापासून चाचण्यांची क्षमता आणि लॅबची संख्या वाढवावी लागेल, त्याची किंमत कमी करावी लागेल, कारण पावसात भिजून सर्दी-फ्लू होणार : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
  • पुढच्या रविवारपासून वृत्तपत्र घरपोच देण्यास सुरुवात करणार : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
  • रविवारपासून महाराष्ट्रात वृत्तपत्रं सुरु करणार, घरपोच वृत्तपत्र पोचवण्याची परवानगी देतो आहे, मात्र काळजी घेणे आवश्यक : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
  • महाराष्ट्राला काही जण आपलीच मंडळी बदनाम करतात आहे : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
  • एकूण ६५ हजार रुग्ण, २८ हजारच्या आसपास रुग्ण बरे, ३४ हजार रुग्ण अॅक्टिव्ह, २४ हजार रुग्णांना लक्षणेही नाहीत, साडेनऊ हजार मध्यम ते तीव्र लक्षणे, दोनशे रुग्ण व्हेंटीलेटरवर : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
  • जे कोणी घराबाहेर पडणार आहेत, त्यांनी घरात येताना काळजी घ्या, त्याचा संसर्ग होईल असे होऊ नये. घराबाहेरुन आल्यानंतर हातपाय धुवा, अंघोळ करा : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
  • युवा वर्गाने आपल्याकडून इतरांना संसर्ग होणार नाही याची काळजी घ्यावी, स्वच्छ अंघोळ करुन काही अंतर राखावे : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
  • ज्यांना आवश्यक नाही खासकरुन जे वयोवृद्ध आहेत त्यांनी बाहेर पडू नका. वयोवृद्धांनी बाहेर पडू नका, : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
  • ५५ ते ६० वर्षावरील ज्येष्ठ नागरिक, तसेच मधुमेह, हृदयविकार, ब्लड प्रेशर असे आजार असलेल्या व्यक्तीनी घराबाहेर पडू नये : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
  • महाराष्ट्र किती शिस्तबद्ध आहे, याचा आदर्श सर्वांनी घेतला पाहिजे : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
  • पाच जूनपासून दुकाने एकआड एक दिवस सुरु करणार, तर आठ तारखेपासून कार्यालये सुरु करणार, कर्मचारीसंख्या 10 टक्के उपस्थितीने सुरु करणार : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
  • बाहेर फिरताना जितके अंतर ठेऊ, तितकेच कोरोनापासून अंतर ठेऊ, मित्र-आप्तेष्ट यांना भेटा, पण अंतर राखून नमस्कार करा, तीन तारखेपासून घराबाहेर व्यायाम करण्यास मुभा : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
  • ज्या ठिकाणी गर्दी होईल त्याला परवानगी नाही. एकमेकांपासून अंतर ठेवू तेवढंच कोरोनापासून अंतर राहिल, नातेवाईक भेटले तरी नमस्कार करा : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
  • इतर देशांप्रमाणे आपल्याला उघडझाप करायची नाही, आपण एकदा उघडलेली गोष्ट बंद करायची नाही : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
  • आपण उघडछाप करायची नाही, एखादी गोष्ट सुरुवात करु ती बंद करायची नाही : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
  • मास्क अनिर्वाय आहे, हात धुणं महत्वाचं, कंटाळा करु नका, चेहऱ्याला हात लावू नका : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
  • येत्या दोन दिवसात पश्चिम किनारपट्टीवर चक्रीवादळ धडकण्याची शक्यता, आपली यंत्रणा सज्ज, पुढील चार दिवस मच्छीमार बांधवांनी समुद्रात जाऊ नये : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
  • पावसाळ्याची सुरुवात म्हटल्यावर मी सर्वांची बैठक घेतली, त्यात समाधानकारक पाऊस पडेल असा अंदाज आहे, मात्र अचानक पूरपरिस्थिती निर्माण झाली तरीही आपण सज्ज आहोत : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
  • मिशन बिगीन अगेन म्हणजे पुनश्च हरीओम, लॉकडाऊन हे विज्ञान असेल, तर ते उघडणं ही कला आहे, पावसाळा तोंडावर असल्याने काळजी घ्यावी लागेल : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

CM On Maharashtra Mission Begin Again

मुख्यमंत्री नेमकं काय म्हणाले?

लॉकडाऊन सुरु करणं हा एक भाग आणि आता लॉकडाऊन बंद करणं हा एक भाग झाला. लॉकडाऊन सुरु करणं विज्ञान आहे आणि हटवणं ही कला आहे. पावसात शेवाळावर पाय पडू नये म्हणून जी काळजी घ्यावी लागते तशीच आपल्याला येणाऱ्या काळात कोरोनाबाबत काळजी घ्यायची आहे. यावर्षीचा पाऊस समाधानकारक असेल असा अंदाज आहे. या काळात ढगफुटी होते, अशावेळी काय करायचं याबाबत बैठक घेण्यात आली आहे. त्यासाठी आपण सज्ज आहोत.

उद्या 1 जूनरोजी चक्री वादळाची शक्यता आहे. ते येणार नाही, येऊ नये अशी माझी प्रार्थना आहे. असं असलं तरी माझी मच्छिमारी करणाऱ्या बांधवांना पुढील 4-5 दिवस समुद्रात जाऊ नये अशी विनंती आहे.

केंद्र सरकारने त्यांची नियमावली दिली आहे. कोरोनाशी जगण्याची सवय लावा असं आपण अनेकदा ऐकलं. यापुढे तोंडावर मास्क लावणं अत्यंत महत्त्वाचं आहे. सतत हात स्वच्छ ठेवणे देखील महत्त्वाचं आहे. 24 तास मास्क लावून केवळ 5 सेकंद तोंडाला, डोळ्यांना हात लावला तर काहीही उपयोग होणार नाही.

आपण उघडछाप करायची नाही, एखादी गोष्ट सुरुवात करु ती बंद करायची नाही : मुख्यमंत्री

अनेकांना लॉकडाऊन कधी उठवता अशी घाई झाली आहे. मात्र, जगभरात काही ठिकाणी लॉकडाऊन लावण्यात आला, काही ठिकाणी लावून काढण्यात आला. पण या देशांमध्ये लॉकडाऊन काढून पुन्हा लावण्याची वेळ आली. त्यामुळे आपण ठोस पावलं टाकणार आहोत. एकदा लॉकडाऊन काढला की पुन्हा तो लावावा लागणार नाही यासाठी आपले प्रयत्न आहेत.

3 जूनपासून आपण काही प्रमाणात हातपायी हालवण्यासाठी सुरु करणार आहोत. त्यानंतर 5 जूनपासून आपण सुरुवातीला एका बाजूची दुकानं उघडायची, नंतर दुसऱ्या बाजूचे दुकानं उघडायचे. याची अंमलबजावणी कशी होते हे पाहून पुढील निर्णय घेऊयात. याची सवय लावुयात. 5 जूनपासून दुकानं सुरु करुयात. 8 जूनपासून आपण कार्यालयं सुरु करणार आहोत. त्यावेळी कर्मचाऱ्यांची उपस्थिती आपण 10 टक्केपासून सुरु करु. यामुळे रुग्णांची संख्या वाढते की काय हे पाहून पुढील निर्णय घेऊ. आपण सध्या रुग्णांची संख्या वाढण्याच्या सर्वोच्च ठिकाणी किंवा त्याच्याजवळ आहोत. असं असलं तरी काही काळाने ही संख्या कमी होईल. त्यामुळे ज्यांना इतर आजार आहेत त्यांनी कारणाशिवाय घराबाहेर पडू नये.

वयोवृद्धांना कोरोनाचा अधिक धोका आहे. ते हायरिस्क गटात मोडतात. त्यामुळे त्यांनी घरातच थांबावं. मग घराबाहेर पडले त्यांचा प्रश्न उरतो. अशावेळी बाहेर फिरणाऱ्यांनी आपल्या घरातील वडिलधाऱ्यांना अनावधानाने देखील कोरोनाचा संसर्ग होणार नाही याची काळजी घ्या. बाहेरुन घरात आल्यास स्वच्छता पाळा. लक्षणं वेळेत ओळखा. वेळेत लक्षात येऊन उपचार घेतल्यास बरं होणाऱ्यांचे प्रमाण मोठं आहे. महाराष्ट्रात 65 हजार रुग्ण आहेत. यापैकी जवळपास 28 हजार रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सध्या महाराष्ट्रात 34 हजार कोरोना अॅक्टीव्ह रुग्ण आहेत. त्यातील 24 हजार रुग्णांना एकही लक्षण नाही. जे मुंबईतील, महाराष्ट्रातील स्थिती बिघडली, सैन्या बोलवा असं बोलत आहेत. त्यांना ही आकडेवारी दाखवावी लागेल.

महाराष्ट्राला बदनाम करण्याचं काम आपली म्हणणारी माणसं करत आहेत : मुख्यमंत्री

महाराष्ट्राला बदनाम करण्याचं काम आपली म्हणणारी माणसं करत आहेत. याचं दुःख आहे. असं असलं तरी तुमचा सरकारवर विश्वास असल्यानेच हे काम करु शकलो.

7 जूनपासून घरपोच वृत्तपत्र देणं सुरु करणार : मुख्यमंत्री

पुढील रविवारपासून घरपोच वृत्तपत्र देणं सुरु करणार आहे. आपली सकाळी चहा आणि पेपरने होते. त्यामुळे वृत्तपत्र महत्त्वाचा आहे. हे करताना वृत्तपत्र वाटप करणाऱ्या मुलांना मास्क आणि सॅनिटायझर देणं महत्त्वाचं असणार आहे.

पहाटे 5 पासून सायंकाळी 7 पर्यंत नागरिकांना निसर्गाच्या सानिध्यात जाऊन मैदानी व्यायाम करता येतील, फिरता येईल. मात्र हे करताना काळजी घेणं महत्वाचं आहे.

पावसाळ्याच्या तोंडावर अनेकांना सर्दी, खोकला किंवा ताप अशी लक्षणं दिसतील. मात्र अशावेळी तपासणीसाठी प्रयोगशाळा सुसज्ज करण्यावर आमचा भर आहे. प्रयोगशाळांची संख्या वाढवली जाईल. तसेच, खासगी प्रयोगशाळांमध्ये देखील शंका असेल, त्याला चाचणी करता यावी म्हणून त्याची किंमत कमी करण्यासाठी प्रयत्न केले जातील. त्यासाठी केंद्र सरकारशी चर्चा केली जाईल.

काही प्रमाणात बेड उपलब्ध होत नाहीत हे खरं आहे. मात्र एकालाही बेड नाही असं होता कामा नाही. त्यासाठी बेडची उपलब्धता केली जात आहे. आपण गोरेगावला 3000 बेडची व्यवस्था सुरु करत आहोत. महाराष्ट्राने मागील 2 महिने सुविधा तयार करण्यावर भर देत आहोत. इतर राज्यांनी काय केलं हे स्पष्ट झालं असेल. मृत्यूदर कमी करण्यावर आपल्याला भर द्यायचा आहे. मात्र अनेक लोक शेवटच्या टप्प्यात दाखल होत आहे. माझाच एक निष्ठावंत सहकारी असा उशिरा आला आणि चाचणी करतानाच कोसळला. त्यामुळे अंगावर आजार काढू नका, लवकर समोर या.

16 लाख स्थलांतरित मजुरांना त्यांच्या राज्यात सोडलं : मुख्यमंत्री

आपण जवळपास 16 लाख स्थलांतरित मजुरांना त्यांच्या राज्यात सोडलं आहे. 800 रेल्वे सोडल्या. यासाठी मी पियष गोयल यांना धन्यवाद देतो. त्यांनी रेल्वे उपलब्ध करुन दिल्यानेच साडेअकरा लाख मजूर प्रवास करु शकले. मागच्यावेळी मी त्यांना बोललो तर पियुष गोयल यांना राग आला होता.

आपण शिवभोजन थाळीच्या माध्यमातून 32 लाख थाळ्या वाटल्या. मुख्यमंत्री निधीचाही कोरोना नियंत्रणासाठी उपयोग होत आहे.

सेमिस्टरची सरासरी काढून पास करणार : मुख्यमंत्री

परीक्षांचं काय करायचं यावर काम सुरु आहे. मी कुलगुरुंची बैठक घेतली. सर्वांचं म्हणणं आहे की तात्काळ परीक्षा घेणं शक्य नाही. ते कुलगुरु आणि मी मुख्यमंत्री असलो तरी आमच्यातील पालक जीवंत आहे. त्याप्रमाणे आम्ही विचार करत आहोत. त्यामुळे आपण मागील परीक्षांच्या (सेमिस्टर) निकालाची सरासरी काढून त्यांचं शैक्षणिक नुकसान होणार नाही यासाठी प्रयत्न केला जाईल.

काहींना सरासरीपेक्षा आपण अधिक गुण मिळवू शकलो असतो असं वाटेल त्यांच्यासाठी आपण परिस्थितीचा अंदाज घेऊन ऑक्टोबर/नोव्हेंबर जेव्हा शक्य असेल तेव्हा परीक्षा घेण्याचाही पर्याय ठेवणार आहोत.

पहिल वर्ष सुरु कसं करणार, पहिलीची सुरुवात कशी करणार हेही प्रश्न आहेत. शाळा सुरु करायच्या का हाही प्रश्न आहे. मात्र, सध्या या शाळा विलगीकरणासाठी ताब्यात घेण्यात आल्या आहेत. मात्र, असं असलं तरी शाळा सुरु करण्यासाठी त्या शाळा मोकळ्या करता येतील. त्या निर्जंतुकीकरण करता येईल. मात्र, इतर देशांमध्ये शाळा सुरु करुन बंद करण्याची वेळ आली आहे. मात्र, शाळा सुरु करण्याऐवजी शिक्षण सुरु करण्यावर आपला भर आहे. ग्रामीण भागात काही ठिकाणी शाळा सुरु करता आल्या तर तेही पाहिलं जाईल. पण शहरात ऑनलाईन शिक्षण सुरु करण्याबाबत पर्याय तपासले जातील.

शिक्षण सुरु झालंच पाहिजे, मात्र कोरोनाने आपल्याला काही गोष्टी शिकवल्या आहेत. त्याने आपल्याला शिक्षणाकडे, आरोग्याकडे पाहायला शिकवले. याआधी कदाचित शिक्षण आणि आरोग्याकडे तितकं लक्ष दिलं गेलं नसेल, मात्र, आता आपल्याला कोणत्याही परिस्थिती या गोष्टी सुरु राहतील याकडे लक्ष द्यावं लागेल.

येत्या काळात आरोग्य, शिक्षण, ग्रामीण भागात, छोट्या शहरात रुग्णालयांची व्यवस्था सज्ज ठेवायची असा निर्णय घेण्यात येणार आहे. इतरवेळी या इमारती इतर गोष्टींसाठी वापरता येतील. मात्र, गरजेच्यावेळी या सुविधा आरोग्य आणि शिक्षणासाठी वापरता येईल यावर भर दिला जाईल. आता जबाबदारी आणि खबरदारी दोन्ही गोष्टी लक्षात घ्याव्या लागतील. सरकारने जबाबदारी घेतली आहे, आता तुम्ही खबरदारी घ्यायची आहे. सरकार पडणार नाहीच, पण तु्म्ही सोबत असेल तर ते अजिबातच होणार नाही.

पंतप्रधान मोदींची ‘मन की बात’

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सकाळी 11 वाजता देशातील जनतेला ‘मन की बात’ मधून संबोधित केलं. यावेळी “कोरोनाविरुद्धची सर्व लढाई देशातील नागरिकांच्या संकल्पनेमुळेच लढली जात आहे. नागरिकांच्या संकल्पना शक्तीसोबतच देशवासियांची सेवा शक्ती ही या लढाईत महत्त्वाची ठरत आहे. कोरोना महामारीच्या संकंटात सेवा आणि त्याग आमचा विचार फक्त आमचा आदर्शच नाही तर भारताची जीवनपद्धत आहे.” हे आपण दाखवून दिलं आहे.”, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.

CM On Maharashtra Mission Begin Again

संबंधित बातम्या :

Maharashtra Mission Begin Again | केंद्राची परवानगी, मात्र महाराष्ट्रात हॉटेल-प्रार्थनास्थळांवर बंदी कायम

Lockdown 5.0 | सायकलिंग, रनिंग, वॉकिंगला परवानगी, लॉकडाऊन 5.0 मध्ये राज्यात काय सुरु काय बंद?

Maharashtra Mission Begin Again | तीन टप्प्यात शिथिलता येणार, कोणत्या टप्प्यात काय सुरु?

Maharashtra Lockdown Guideline | महाराष्ट्रासाठी लॉकडाऊन 5 ची नियमावली, शाळा-कॉलेज, धार्मिक स्थळ बंदच राहणार

Non Stop LIVE Update
बच्चू कडूचा राजकारणात कोणी बाप नाही, बच्चू कडू यांचा जोरदार प्रहार
बच्चू कडूचा राजकारणात कोणी बाप नाही, बच्चू कडू यांचा जोरदार प्रहार.
मविआ 48 जागा लढणार आणि त्या जिंकणार, संजय राऊत यांचा आत्मविश्वास
मविआ 48 जागा लढणार आणि त्या जिंकणार, संजय राऊत यांचा आत्मविश्वास.
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?.
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?.
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप.
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले.
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?.
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?.
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?.
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार.