AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

वसईत कोरोनाचा विळखा, नायगाव कोळीवाड्यात आजपासून 14 दिवसांचा कडकडीत बंद

वसई-विरार महापालिकेने आजपासून 14 दिवसांचा कडकडीत लॉकडाऊन लागू करण्याचा निर्णय घेतला आहे (Complete lockdown in Naygaon Koliwada of Vasai Virar).

वसईत कोरोनाचा विळखा, नायगाव कोळीवाड्यात आजपासून 14 दिवसांचा कडकडीत बंद
| Updated on: Jun 24, 2020 | 9:29 AM
Share

पालघर : कोरोना विषाणूच्या संसर्गाने मुंबईसह आजूबाजूच्या जिल्ह्यांनाही वेढा घातला आहे. वसईच्या नायगाव कोळीवाड्यात देखील अशीच स्थिती तयार झाली. अखेर वसई-विरार महापालिकेने या ठिकाणी आजपासून 14 दिवसांचा कडकडीत बंद लागू करण्याचा निर्णय घेतला आहे (Complete lockdown in Naygaon Koliwada of Vasai Virar). कोरोनाचा वाढता संसर्ग टाळण्यासाठी हे पाऊल उचलल्याचे महापालिका प्रशासनाने सांगितलं आहे. या काळात केवळ अत्यावश्यक सेवा सुरु राहणार आहेत.

एकट्या नायगाव कोळीवाड्यात मागील 8 ते 10 दिवसात 22 हून अधिक कोरोना बाधित रुग्ण आढळले आहेत. तर सोमवारी (22 जून) एका कोरोना रुग्णाचा दुर्दैवी मृत्यूही झाला. या परिसरात दाटीवाटीची लोकवस्ती आहे. सुखदुःखात एकत्र येणे, ओटीवर बसणे, समुहाने फिरणे असे सर्व प्रकार या परिसरात सुरुच असल्याचं प्रशासनाच्या निदर्शनास आलं आहे. त्यामुळेच नायगाव कोळीवाडा परिसरातील बेसिन कॅथलिक बँक ते नायगाव स्टेशन परिसराकडील कोळीवाड्याची हद्द पूर्णपणे सील करण्याचा निर्णय घेण्यात आला.

यानिमित्ताने स्थानिक नागरिकांनी कोरोनाला रोखण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन प्रभाग समिती (आय)चे सहाय्यक आयुक्त सुभाष जाधव यांनी केलं आहे.

दरम्यान, राज्यात काल (23 जून) दिवसभरात 3 हजार 214 नव्या रुगणांची नोंद झाली (Maharashtra COVID-19 Total Cases). कोरोनामुळे दिवसभरात सर्वाधिक 248 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यापैकी 75 मृत्यू हे मागील 48 तासांमधील आहेत. तर, 173 जणांची नोंद गेल्या काही दिवसांमधील आहे. त्यामुळे कोरोनाबळींची एकूण संख्या 6 हजार 531 वर पोहोचली आहे. तर सध्या राज्यात 1 लाख 39 हजार 10 कोरोनाचे रुग्ण आहेत (Maharashtra COVID-19 Total Cases).

दिवसभरात 1,925 रुग्णांची कोरोनावर मात

राज्यात काल दिवसभरात 1 हजार 925 रुग्णांची कोरोनावर मात केली. त्यामुळे त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्यात आतापर्यंत 69 हजार 631 कोरोनाग्रस्तांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्यातील रुग्ण बरे होण्याचं प्रमाण 50.09 टक्के आहे. तर, सध्या राज्यातील मृत्यूदर 4.69 टक्के इतका आहे (Maharashtra COVID-19 Total Cases).

6 लाख 05 हजार 141 लोक होम क्वारंटाईन

राज्यात कालपर्यंत पाठविण्यात आलेल्या 8 लाख 02 हजार 775 नमुन्यांपैकी 1 लाख 39 हजार 10 नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात 6 लाख 05 हजार 141 लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. तर सध्या 26 हजार 572 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या राज्यात कोरोनाचे 62 हजार 833 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत.

संबंधित बातम्या :

कोरोना नियंत्रणासाठी पुणे मनपाचा मोठा निर्णय, 1 लाख नागरिकांच्या कोरोना टेस्ट करणार

LIVE: नाशिक शहरातील शासकीय कार्यालय देखील कोरोनाच्या विळख्यात

Maharashtra Corona Update | राज्यात कोरोनाबळींचा नवा उच्चांक, दिवसभरात 248 जणांचा मृत्यू

Complete lockdown in Naygaon Koliwada of Vasai Virar

'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला
'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला.
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात.
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी.
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप.
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार.
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप.
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी.
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा.
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.