Coolie No. 1|‘कुली नंबर 1 पुन्हा एकदा ट्रोल, वरुण धवनवर चाहते भडकले

बॉलिवूड अभिनेता वरुण धवन (Varun Dhawan) आणि सारा अली खान (Sara Ali Khan) आगामी ‘कुली नंबर 1’ (Coolie No. 1) प्रदर्शित करण्याच्या तयारीला लागले आहेत.

Coolie No. 1|‘कुली नंबर 1 पुन्हा एकदा ट्रोल, वरुण धवनवर चाहते भडकले
Follow us
| Updated on: Nov 29, 2020 | 3:01 PM

मुंबई : बॉलिवूड अभिनेता वरुण धवन (Varun Dhawan) आणि सारा अली खान (Sara Ali Khan) आगामी ‘कुली नंबर 1’ (Coolie No. 1) प्रदर्शित करण्याच्या तयारीला लागले आहेत. या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. चित्रपटाच्या ट्रेलरला प्रेक्षकांचा संमिश्र प्रतिसाद मिळत आहे. मात्र, यापेक्षाही अधिक चर्चा आहे ती म्हणजे ‘कुली नंबर 1’च्या ट्रेलरमधून गायब असणाऱ्या ‘लाईक/डिसलाईक’ (Like Dislike) बटणाची! ‘कुली नंबर 1’ची टीम ट्रोलर्सला खूपच घाबरली आहे. (Coolie No. 1 troll Varun Dhawan once again infuriated the fans)

चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर त्यातून लाईक आणि डिसलाईक ऑप्शन हटवले गेले होते. सुशांत सिंह राजपूतच्या फॅन क्लबने गेल्या अनेक दिवसांपासून सारा अली खानला सोशल मीडियावर ट्रोल करण्यास सुरुवात केली होती. बरेच ट्विटर वापरकर्ते या चित्रपटाचा ट्रेलरला डिसलाईक करण्याविषयी चर्चा करत होते. तर, दुसरीकडे अनेक लोक या चित्रपटाची खिल्ली उडवत होते. यामुळेच चित्रपटाच्या टीमने हा निर्णय घेतला असल्याची चर्चा सर्वत्र रंगली होती. मात्र, आता कुली नंबर 1हा चित्रपट एका वेगळ्याच गोष्टीमुळे खूप ट्रोल होताना दिसत आहे. या चित्रपटाचा ट्रेलर पाहणाऱ्या आता ला ट्रोल केलं वरुण धवन आहे. त्यांचे म्हणणे आहे की, वरुण गोविंदाची नकल करण्याचा प्रयत्न करत आहे आणि त्याला ते जमत देखील नाही त्याने गोविंदाची नकल करणे बंद करावे. असे म्हणत वरुणला ट्रोल करण्यात येत आहे. चित्रपटाच्या ट्रेलर आता पर्यंत युट्यूबवर 1 करोड़ 60 लाख व्हूज मिळाले आहेत. सारा अली खान ट्रोल! बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान (Sara Ali Khan) आणि अभिनेता वरुण धवन (Varun Dhawan) यांचा आगामी चित्रपट ‘Coolie No. 1’ हा चित्रपट येत्या 25 डिसेंबर रोजी ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. मात्र, आता सुशांतच्या चाहत्यांनी सारावर निशाणा साधण्यास सुरुवात केली आहे. ट्रेलर प्रदर्शित होण्यापूर्वीच सुशांतच्या चाहत्यांनी ‘डिसलाईक’ करण्यासाठीची मोहीम सुरू केली होती. चित्रपटासह सारा अली खानवर बंदी घालण्याची मागणी केली जात होती.

ट्रेलर प्रदर्शित होण्यापूर्वीच ‘कुली नंबर 1’च्या ट्रेलरवर बहिष्कार टाकण्याची तयारी सुशांतच्या चाहत्यांनी केली होती. ‘साराच्या विरोधात अद्याप ड्रग प्रकरणी केस चालू आहे, तर चित्रपट कसा येऊ शकतो?’, असा प्रश्न काही वापरकर्त्यांनी विचारला होता. तर, साराने सुशांतचा विश्वासघात केल्याचे काही वापरकर्ते म्हणत आहे.

संबंधित बातम्या :

Photo : सारा आणि वरुण ‘कुली नं 1’साठी सज्ज, रोमँटिक अंदाजात फोटोशूट

Sara Ali Khan | ‘Coolie No. 1’च्या ट्रेलरवर डिसलाईक्सच्या वर्षावाची तयारी, सुशांतच्या चाहत्यांचा सारा अली खानवर राग!

(Coolie No. 1 troll Varun Dhawan once again infuriated the fans)

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.