Delhi Corona Cases | दिल्लीत कोरोनाचा कहर, 24 तासात तब्बल 7546 नवे रुग्ण, 98 बाधितांचा मृत्यू

दिल्लीत कोरोना रुग्णांच्या संख्येत प्रचंड वाढ होत आहे. गेल्या 24 तासात तब्बल 7 हजार 546 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत (Corona Cases increase in Delhi).

Delhi Corona Cases | दिल्लीत कोरोनाचा कहर, 24 तासात तब्बल 7546 नवे रुग्ण, 98 बाधितांचा मृत्यू

नवी दिल्ली : दिल्लीत कोरोना रुग्णांच्या संख्येत प्रचंड वाढ होत आहे. गेल्या 24 तासात तब्बल 7 हजार 546 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. तर कोरोनामुळे दिवसभरात 98 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाबाधितांचा वाढता आकडा प्रशासनाची चिंता वाढवणारा आहे (Corona Cases increase in Delhi).

दिल्लीत काल (18 नोव्हेंबर) कोरोनाने सर्वाधिक 131 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली होती. त्याआधी 12 नोव्हेंबर रोजी 104 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला होता. राजधानी दिल्लीत कोरोनामुळे आतापर्यंत 8 हजार 41 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दिल्लीतील मृत्यू दर हा 1.57 टक्के इतका आहे.

दिल्लीत आतापर्यंत कोरोनाचे 5 लाख 10 हजार 630 रुग्ण आढळले आहेत. यापैकी 4 लाख 59 हजार 368 रुग्ण बरे झाले आहेत. सध्या दिल्लीत 43 हजार 221 रुग्णांवर उपचार सुरु आहे. दरम्यान, दिल्लीत आज (19 नोव्हेंबर) दिवसभरात 6 हजार 685 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

दिल्लीत गेल्या 24 तासात 62 हजार 437 टेस्ट झाल्या आहेत. यामध्ये 22 हजार 67 आरटीपीसीआर, तर 40 हजार 370 अँटीजन टेस्ट करण्यात आल्या आहेत. दिल्लीत आरटीपीसीआर टेस्टचा हा सर्वाधिक आकडा आहे (Corona Cases increase in Delhi).

कोरोनाचा वाढता आकडा लक्षात घेऊन दिल्ली सरकारकडून महत्त्वपूर्ण पावलं उचलण्यात आली आहेत. दिल्लीत लग्न समारंभात 200 लोकांना सहभागी होण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला होता. मात्र, हा निर्णय सरकारने मागे घेतला आहे. मास्कचा वापर सक्तीने करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मास्क न वापरल्यास तब्बल 2000 रुपये दंड भरावा लागेल, असा आदेश जारी करण्यात आला आहे.

महाराष्ट्रातही कोरोना फोफावतोय

महाराष्ट्रात आज दिवसभरात कोरोनाचे एकूण 5535 कोरोनाग्रस्त आढळले. तर दिवसभरात एकूण 154 रुग्णांच्या मृत्यूंची नोंद करण्यात आली. कालच्या तुलनेत राज्यात आज दिवसभरात एकूण 500 रुग्ण जास्त आढळले आहेत. तर मृतांच्या आकड्यांतही लक्षणीय वाढ झाली आहे. आज दिवसभरात राज्यात एकूण 154 बाधितांचा मृत्यू झाला आहे. आज दिवसभरात राज्य़ात 5860 जण कोरोनामुक्त झाले आहेत. नवे कोरोनाग्रस्त आढळण्याचे प्रमाण रुग्ण कोरोनामुक्त होण्याच्या तुलणेत कमी असले तरी, कालच्या तुलनेत नव्या कोरोनाग्रस्तांच्या संख्येत आज मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे कोरोना संसर्ग वाढतोय असे म्हटले जात आहे.

संबंधित बातमी :

राज्यात कोरोनाग्रस्तांच्या संख्येत पुन्हा वाढ; संसर्ग रोखण्याचं आरोग्य यंत्रणेपुढे आव्हान

दिवाळीनंतर कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता! मुंबई महापालिका प्रशासनाच्या तयारीचा आदित्य ठाकरेंकडून आढावा

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI