7000 मृत्यू, अमेरिकेत संचारबंदी, फ्रान्स लॉकडाऊन, कोरोनासमोर महाशक्तिशाली देशही हतबल

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी अमेरिकेने दोन मोठी राज्य न्यू जर्सी आणि सॅन फ्रान्सिस्कोमध्ये संचारबंदी लावण्यात आली आहे.

7000 मृत्यू, अमेरिकेत संचारबंदी, फ्रान्स लॉकडाऊन, कोरोनासमोर महाशक्तिशाली देशही हतबल
Follow us
| Updated on: Mar 17, 2020 | 9:44 AM

नवी दिल्ली : कोरोना विषाणूने जगातील सर्वात (Corona Effect On World) शक्तिशाली देशांनाही हतबल करुन सोडलं आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी अमेरिकेने दोन मोठी राज्य न्यूजर्सी आणि सॅन फ्रान्सिस्कोमध्ये संचारबंदी लावली आहे.

जर अत्यंत आवश्यकता असेल तरच घरातून बाहेर (Corona Effect On World) पडा, अशा सूचना अमेरिकेच्या नागरिकांना करण्यात आल्या आहेत. तसेच, 10 पेक्षा जास्त नागरिकांनी एकत्रित येऊ नये, असं आवाहन अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं.

हेही वाचा : उपचारानंतर कोरोना मुक्त, फेसबुकवर महिलेची पोस्ट व्हायरल

दुसरीकडे, फ्रान्समध्ये पुढील 15 दिवसांसाठी राष्ट्रव्यापी लॉकडाऊन करण्यात आलं आहे. केरोनाचा संसर्ग वाढू नये यासाठी पुढील 15 दिवसांसाठी फ्रान्सच्या नागरिकांनी घरातून बाहेर पडू नये आणि शक्य असल्यास सामाजिक संपर्क कमी करा, असे आदेश फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी केले.

तसेच, अत्यावश्यक प्रवासासाठी परवानगी दिली जाईल. मात्र, सरकारच्या आदेशाचं उल्लंघन केल्यास त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असंही इमॅन्युएल मॅक्रॉन म्हणाले.

जुलै-ऑगस्टपर्यंत कोरोना बरा होण्याची शक्यता

अमेरिकेने कोरोना विषाणूला नष्ट करण्यासाठी जरी लसीची चाचणी सुरु केली असेल, तरी या विषाणूवर पूर्णपणे नियंत्रण मिळवण्यासाठी जुलै-ऑगस्टपर्यंतचा वेळ लागेल, अशी शक्यता वर्तवली जात आहे.

न्यूजर्सी आणि सॅन फ्रान्सिस्कोमध्ये कर्फ्यू

वृत्त संस्था एएफपीनुसार, लोकांच्या ये-जा (Corona Effect On World) थांबवण्यासाठी न्यूजर्सीमध्ये संचारबंदी लावण्यात आली आहे. अनावश्यक दुकानं, मनोरंजन व्यापार रात्री 8 वाजेनंतर निश्चित स्वरुपात बंद केलं जाईल, असं न्यूजर्सीच्या गव्हर्नरने सांगितलं.

सॅन फ्रान्सिस्कोमध्येही लोकांना त्यांच्या घरातून बाहेर पडण्यावर बंदी घालण्यात आली आहे. मात्र, अद्याप संपूर्ण देशाला लॉकडाऊन करण्याची योजना नसल्याचं अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितलं.

आतापर्यंत 7000 पेक्षा जास्त जणांचा मृत्यू

कोरोनाची दहशत आता 145 देशांमध्ये पसरली आहे. या आजाराने आतापर्यंत जगात 7007 जणांचा मृत्यू झाला आहे. तर जवळपास दीड लाखापेक्षा जास्त लोकांना या विषाणूची लागण झाली आहे.

इटलीमध्ये सोमवारी 349 मृत्यू

इटलीमध्ये कोरोना विषाणूने मृत्यू हाणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. इटलीत सोमवारी एकाच दिवशी 349 जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली. त्यामुळे इटलीत कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या आता 2,158 वर येऊन पोहोचली आहे. तर, 27,980 जणांना कोरोनाची लागण झाल्याचं निष्पन्न झालं आहे.

स्पेन, रशिया, कॅनडाकडून सीमा बंद

स्पेन, रशियाने त्यांच्या सीमा बंद केल्या आहेत. जर्मनीनेही देशात अनेक प्रतिबंध घातले आहेत. तर कॅनडाने कॅनेडियन आणि अमेरिकन नागरिकांना वगळता इतर सर्व देशातील (Corona Effect On World) नागरिकांसाठी आपली दारं बंद केली आहेत.

संबंधित बातम्या :

कोरोनामुळे बंदिस्त घरात वादविवाद, चीनमध्ये घटस्फोटाच्या अर्जात वाढ

corona virus : 27 मार्चपर्यंत अॅपलचे सर्व स्टोअर्स बंद राहणार

इटली-स्पेनमध्ये लॉकडाऊन, ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर कोणत्या देशात काय खबरदारी?

‘आयसिस’लाही कोरोनाची धास्ती, युरोप दहशतवाद्यांच्या टार्गेटवरुन दूर

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.