पिझ्झा डिलिव्हरी बॉयला कोरोनाची लागण, 72 जण क्वारंटाईन

पिझ्झा मागवणे आता आपल्या सर्वांसाठी धोकादायक ठरू शकते. दिल्लीमध्ये पिझ्झा बॉयला (Pizza delivery boy corona positive) कोरोनाची लागण झाल्याने तब्बल 72 लोक क्वारंटाईन झाले आहेत.

पिझ्झा डिलिव्हरी बॉयला कोरोनाची लागण, 72 जण क्वारंटाईन

दिल्ली : पिझ्झा मागवणे आता आपल्या सर्वांसाठी धोकादायक ठरू शकते. दिल्लीमध्ये पिझ्झा बॉयला (Pizza delivery boy corona positive) कोरोनाची लागण झाल्याने तब्बल 72 लोकं क्वारंटाईन झाले आहेत. कारण या सर्वांना कोरोनाची लागण झालेल्या तरुणाने पिझ्झा डिलिव्हर केला होता. या घटनेमुळे सर्वत्र एकच खळबळ (Pizza delivery boy corona positive) उडाली आहे.

कोरोनाची लागण झालेला पिझ्झा डिलिव्हरी बॉय मार्चच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत काम करत होता. त्यानंतर गेल्या आठवड्यात या डिलिव्हरची बॉयला कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले. या घटनेची माहिती मिळतनाच प्रशासनाला धक्का बसला आहे. प्रशासनाने तातडीने डिलिव्हरी बॉयच्या संपर्कात आलेल्या सर्वांची माहिती मिळवली आणि त्यांना क्वारंटाईन केले.

दक्षिण दिल्लीतील अनेकजण क्वारंटाईन

पिझ्झा डिलिव्हरी बॉयने दक्षिण दिल्लीमध्ये अनेक विभागात पिझ्झा डिलिव्हर केला होता. यामध्ये हौज खास आणि मालीवीय नगरचाही समावेश होता. त्यामुळे येथील अनेक लोकं क्वारंटाईन झाले आहेत.

“सध्या या पिझ्झा डिलिव्हर बॉयच्या संपर्कात आलेले 72 लोकं क्वारंटाईन झाले आहेत. आतापर्यंत यातील कोणाची कोरोना चाचणी केली नाही. यामधील जर कुणाला कोरोनाची लक्षणं दिसली तर त्याची आम्ही कोरोना चाचणी करु. आतापर्यंत पिझ्झा डिलिव्हरी बॉय आणि 72 लोकांची ओळख सांगितलेली नाही”, असं दक्षिण दिल्लीचे डीएम बीएम मिश्रा यांनी सांगितले.

पिझ्झा डिलिव्हरी बॉय डायलिसिससाठी रुग्णालयात गेला तेव्हा त्याच्यामध्ये कोरोनाची लक्षणं दिसली. त्यानंतर त्याला क्वारंटाईन करण्यात आले आणि त्याची तपासणी केली. तपासणी केल्यानंतर डिलिव्हरी बॉयला कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले. आता त्याच्यावर उपचार सुरु आहेत.

दरम्यान, कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात केंद्र सरकारकडून लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. या लॉकडाऊनमध्ये आता वाढ केली असून तो 3 मे पर्यंत वाढवण्यात आला आहे. पण या लॉकडाऊन दरम्यान जीवनावश्यक वस्तूंच्या सेवा सुरु राहणार असल्याचे सरकारने सांगितले होते. यामध्ये अनेक हॉटेल, पिझ्झा शॉपच्या डिलिव्हरी सुरु आहेत. पिझ्झा डिलिव्हरी बॉयला कोरोनाची लागण झाल्यामुळे आता यावर रोख लावण्यात येऊ शकतो अशी शक्यता वर्तवली जात आहे.


Published On - 9:10 am, Thu, 16 April 20

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI