कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा आदर्श, उपचार घेत असलेल्या कोव्हिड केअर सेंटरची साफसफाई

नांदेड जिल्ह्यात ठिकठिकाणी कोरोना रुग्णांसाठी कोव्हिड केअर सेंटर निर्माण करण्यात आले आहेत. (Corona Patient Clean covid center at Nanded)

कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा आदर्श, उपचार घेत असलेल्या कोव्हिड केअर सेंटरची साफसफाई

नांदेड : कोरोना रुग्णालय खूप घाणेरडी असतात. त्यात स्वच्छता नसते, अशा अनेक तक्रारी नेहमीच येत असतात. पण नांदेडमध्ये कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांनी उपचार घेत असलेल्या कोव्हिड केअर सेंटरची स्वत: साफसफाई केली. यामुळे या रुग्णांनी एक आदर्श घालून दिला आहे. त्यामुळे या रुग्णांचे कौतुक केले जात आहे. (Corona Patient Clean covid center at Nanded)

नांदेडमध्ये कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. त्यामुळे नांदेड जिल्ह्यात ठिकठिकाणी कोव्हिड केअर सेंटर निर्माण करण्यात आले आहेत. पण अनेक कोव्हिड सेंटरमध्ये अस्वच्छता असल्याचे पाहायला मिळतं. तसेच अनेक ठिकाणी कचरा आणि घाणीचे साम्राज्य पसरलेलं असते. अनेक कोव्हिड सेंटरमध्ये सरकारी कर्मचारी काम करत नाही, असा आरोप केला जात आहे.

पण नांदेडमध्ये सफाईबाबत तक्रारी न करता कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांनी कोव्हिड सेंटरची स्वच्छता केली. नांदेड शहरातील पंजाब भवन येथे कोव्हिड सेंटर उभारण्यात आलं होतं. या ठिकाणी कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार दिले जातात.

या इमारतीच्या परिसरात कचरा आणि घाण साचली होती. याबाबत तक्रारी करण्यापेक्षा काही रुग्णांनी स्वत: स्वच्छता करणं सुरु केले. त्यांना अन्य रुग्णांची देखील साथ मिळाली. त्यामुळे पॉझिटिव्ह रुग्णांची ही स्वच्छता मोहीम इतरांसाठी आदर्श ठरत आहे. (Corona Patient Clean covid center at Nanded)

संबंधित बातम्या : 

नागपुरात 31 नवीन कोव्हिड रुग्णालये होणार, मनपाचे आदेश, रुग्णालयांकडून मागवला अहवाल

आधी घरात जोरदार गणेशोत्सव, मग एकाच कुटुंबातील 35 जणांना कोरोना संसर्ग

Published On - 8:02 pm, Sun, 6 September 20

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI