औरंगाबादमध्ये कोरोनाबाधितांच्या आकड्यातील वाढ सुरुच, 41 नव्या रुग्णांची नोंद

औरंगाबाद जिल्ह्यात आज (20 मे) सकाळपर्यंत 41 कोरोना रुग्ण आढळून आले (Corona Patient Increase Aurangabad) आहेत.

औरंगाबादमध्ये कोरोनाबाधितांच्या आकड्यातील वाढ सुरुच, 41 नव्या रुग्णांची नोंद

औरंगाबाद : औरंगाबाद जिल्ह्यात आज (20 मे) सकाळपर्यंत 41 कोरोना रुग्ण आढळून आले (Corona Patient Increase Aurangabad) आहेत. त्यामुळे जिल्ह्यात आता कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 1 हजार 117 वर पोहोचली आहे. जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याचे प्रशासनाचीही चिंता वाढली (Corona Patient Increase Aurangabad) आहे.

औरंगाबाद जिल्ह्यात आज आढळलेल्या रुग्णांचा तपशील (कंसात रुग्ण संख्या)

गणेश नगर, खंडोबा मंदिर, सातारा गाव (1), न्याय नगर, गल्ली नं. 7 (2), पुंडलिक नगर, गल्ली नं 7 (1), पोलीस कॉलनी (2), लिमयेवाडी, मित्र नगर (1), शरीफ कॉलनी (1), न्याय नगर, गल्ली न.1 (1), रोहिदास नगर, मुकुंदवाडी (3), मराठा गल्ली, उस्मानपुरा (2), कैलास नगर, गल्ली नं.2 (3), जुना मोंढा, भवानी नगर, गल्ली नं.5 (2), शिवशंकर कॉलनी, तानाजी चौक, बालाजी नगर (2), इंदिरा नगर (1), खडकेश्वर (1), माणिक नगर (1), जयभीम नगर (4), पुंडलिक नगर (5), जिल्हा सामान्य रुग्णालय (1), संजय नगर (1), सिटी चौक (1), बालाजी नगर (1), आझम कॉलनी (1) आणि फुलंब्री तालुक्यातील बाबरा, भिवसने वस्ती (2), कन्नड तालुक्यातील धनगरवाडी, औराळा (1). यामध्ये 16 महिला आणि 25 पुरुषांचा समावेश आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत एक हजार 117 कोरोना रुग्ण आढळले आहेत. तर 36 रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात 401 रुग्ण आतापर्यंत कोरोनामुक्त झालेले आहेत. तर 684 रुग्णांवर सध्या उपचार सुरु आहेत.

औरंगाबादमध्ये 15 मार्च रोजी पहिला कोरोनाबाधित रुग्ण आढळला होता. या रुग्णानंतर कोरोनाबाधितांच्या आकड्यात काहीशी वाढ होत होती. मात्र गेल्या 20 दिवसात हा आकडा प्रचंड वेगाने वाढत आहेत. त्यामुळे सद्यस्थितीत कोरोनाची साखळी तोडण्याचे मोठं आवाहन प्रशासनापुढे आहे.

संबंधित बातम्या :

मुंबई-पुण्याहून आलेल्या 8 जणांना कोरोना, बीडमधील रुग्णसंख्येत पुन्हा वाढ

राज्यात एकाच दिवसात सर्वाधिक 76 कोरोनाबळी, बाधितांचा आकडा 37 हजार पार

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI