पुणे विद्यापीठाच्या कोणत्याही परीक्षा रद्द नाही, सर्व अभ्यासक्रमाच्या परीक्षा नियमित होणार

पुणे विद्यापीठाने सर्व अभ्यासक्रमाच्या परीक्षा 14 एप्रिलपर्यंत पुढे ढकलल्या आहेत. मात्र कोणतीही परीक्षा रद्द केली जाणार नाही अशी माहिती विद्यापीठाचे उपकुलगुरु डॉ. एन. एस. उमराणी यांनी (Pune University Exam Not postpone) दिली.

पुणे विद्यापीठाच्या कोणत्याही परीक्षा रद्द नाही, सर्व अभ्यासक्रमाच्या परीक्षा नियमित होणार
Follow us
| Updated on: Apr 04, 2020 | 8:39 AM

पुणे : जगभर थैमान घालणाऱ्या कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव (Pune University Exam Not postpone) भारतात दिवसेंदिवस वाढत चालला आहे. कोरोनामुळे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या परीक्षांचे वेळापत्रक कोलमडले आहे. या पार्श्वभूमीवर पुणे विद्यापीठाने सर्व अभ्यासक्रमाच्या परीक्षा 14 एप्रिलपर्यंत पुढे ढकलल्या आहेत. मात्र कोणतीही परीक्षा रद्द केली जाणार नाही अशी माहिती विद्यापीठाचे उपकुलगुरु डॉ. एन. एस. उमराणी यांनी दिली.

कोरोनामुळे सरकारने सर्व शाळा, महाविद्यालयांना सुट्टी जाहीर (Pune University Exam Not postpone) केली आहे. मात्र ही सुट्टी जाहीर होण्यापूर्वी कला, वाणिज्य, विज्ञान या तिन्ही शाखांच्या पदवी परीक्षा सुरु होत्या. तर पदव्युत्तर आणि व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या परीक्षा अद्याप सुरु झालेल्या नाही. यामुळे गेल्या काही दिवसांपासून प्रथम वर्षाच्या परीक्षा रद्द केल्या जाणार असल्याची चर्चा सुरु होती. मात्र व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत कोणत्याही अभ्यासक्रमाच्या परीक्षा रद्द केल्या जाणार नाही, असा निर्णय घेण्यात आला.

कोरोनामुळे सर्व विद्यापीठांच्या परीक्षांचे वेळापत्रक कोलमडले आहे. मात्र भविष्यात सर्व अभ्यासक्रमाच्या परीक्षा होणार आहे. पण या परीक्षा कशा पद्धतीने घेतल्या जाव्या? यासंदर्भात विद्यापीठाकडून प्राध्यापक, प्राचार्य यांच्याकडून सूचना व उपाय मागवण्यात आल्या होत्या. यात विद्यापीठाला 100 पेक्षा जास्त सूचना आणि उपाय विद्यापीठाला प्राप्त झाले आहेत. यांची छाननी करुन नवीन परीक्षा पद्धती ठरवली जाणार आहे.

पुणे विद्यापीठाच्या सर्व प्रकारच्या परीक्षा 14 एप्रिलपर्यंत पुढे ढकलल्या आहेत. त्यानंतर लॉकडाऊनंतर या सर्व परीक्षा नवीन वेळापत्रकानुसार घेतल्या जातील. त्यामुळे विद्यार्थ्यांना लॉकडाऊननंतर परीक्षेला सामोरी जावे लागणार आहे.

विशेष म्हणजे परीक्षेच्या स्वरुपात बदल करण्यासाठी विद्यापीठ गांभीर्याने विचार करत आहे. 1 एप्रिल ते 14 एप्रिल हा कालावधी उन्हाळी सुट्टी म्हणून ग्राह्य धरला जाणार आहे, अशी माहिती उपकुलगुरू डॉ. एन. एस. उमराणी यांनी (Pune University Exam Not postpone) दिली.

Non Stop LIVE Update
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'.
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार.
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया.
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?.
ज्यांनी पत्नीला सोडलं..., शरद पवारांवरील टीकेनंतर मोदींवर कुणाची टीका?
ज्यांनी पत्नीला सोडलं..., शरद पवारांवरील टीकेनंतर मोदींवर कुणाची टीका?.
मोदी महानटसम्राट...काँग्रेसच्या बड्या नेत्याची पतंप्रधानांवर खोचक टीका
मोदी महानटसम्राट...काँग्रेसच्या बड्या नेत्याची पतंप्रधानांवर खोचक टीका.
दादा आवाज येत नाही, अजितदादांकडून कार्यकर्त्यांची फिरकी, काय दिल उत्तर
दादा आवाज येत नाही, अजितदादांकडून कार्यकर्त्यांची फिरकी, काय दिल उत्तर.
ठाकरे गटाच्या 'त्या' जाहिरातीत पॉर्नस्टार? चित्रा वाघ यांचा आक्षेप काय
ठाकरे गटाच्या 'त्या' जाहिरातीत पॉर्नस्टार? चित्रा वाघ यांचा आक्षेप काय.
'तर मोदींनी ते कृत्य केलं नसतं', संजय राऊतांचा पंतप्रधानांवर हल्लाबोल
'तर मोदींनी ते कृत्य केलं नसतं', संजय राऊतांचा पंतप्रधानांवर हल्लाबोल.
अंधारेंना घेण्यासाठी हेलिकॉप्टर आलं अन्...नको ते घडलं, नेमकं काय झालं?
अंधारेंना घेण्यासाठी हेलिकॉप्टर आलं अन्...नको ते घडलं, नेमकं काय झालं?.