धक्कादायक : 1 लिटर दुधात बादलीभर पाणी, मध्यान्न भोजन म्हणून 81 मुलांना वाटप

केंद्रापासून राज्य सरकारपर्यंत शालेय मुलांच्या आरोग्यावर अनेक योजनांची घोषणा होते (Corruption in Mid Day Meal scheme). मात्र, त्या योजनांची अवस्था काय आहे याकडे दुर्लक्ष झालेले दिसते.

धक्कादायक : 1 लिटर दुधात बादलीभर पाणी, मध्यान्न भोजन म्हणून 81 मुलांना वाटप

लखनौ : केंद्रापासून राज्य सरकारपर्यंत शालेय मुलांच्या आरोग्यावर अनेक योजनांची घोषणा होते (Corruption in Mid Day Meal scheme). मात्र, त्या योजनांची अवस्था काय आहे याकडे दुर्लक्ष झालेले दिसते. अनेकदा याबाबत मोठे खुलासेही झाले आहेत. आता शाळांमधील मध्यान्न भोजन योजनेचं आणखी एक धक्कादायक वास्तव समोर आलं आहे. सरकारने शालेय मुलांना कुपोषणापासून वाचवण्यासाठी मध्यान्न भोजन योजना सुरु केली. मात्र, या योजनेतील भ्रष्टाचारामुळे हीच शालेय मुलं कुपोषणाचे बळी ठरत असल्याचं समोर आलं आहे (Corruption in Mid Day Meal scheme). उत्तर प्रदेशमध्ये असा एक प्रकार घडला.

उत्तर प्रदेशमध्ये मध्यान्न भोजनांतर्गत चक्क 1 लिटर दुधात बादलीभर पाणी टाकून 81 मुलांना वाटप करण्यात आलं. हा प्रकार समोर आल्यानंतर देशभरातून याविषयी संताप व्यक्त केला जात आहे. सोनभद्र जिल्ह्याच्या चोपन ब्लॉक येथील प्राथमिक शाळेत अशाप्रकारे दुधाच्या नावाने पाणीच वाटण्यात आले आहे. माध्यमांनी हा प्रकार उघड केल्यानंतर जिलाधिकारी एस. राजलिंगम यांनी तात्काळ या प्रकरणी कारवाई करण्याचे आदेश दिले.

मध्यान्न भोजन वाटणाऱ्या अधिकाऱ्यांवक कारवाईबाबत लेखी आदेश देण्यात आले आहेत. तसेच शाळेतील एका शिक्षक मित्राचेही निलंबन करण्यात आले. सलईबनवा या प्राथमिक शाळेच्या प्रभारी शिक्षकांवरही कारवाई करण्यात येत आहे.

शाळेच्या स्वयंपाकीने सांगितले, की आपल्याला एक लिटर दुध देण्यात आले होते. त्यानंतर तिने या एक लिटर दुधात पाणी टाकून सर्व मुलांना वाटले. दुसरीकडे घटनास्थळावर पोहचलेल्या अधिकाऱ्याने (एबीएसए) यात प्राथमिक चूक शिक्षक मित्राची असल्याचं दिसत आहे, असं मत व्यक्त केलं. तसेच या शिक्षक मित्राला निलंबित केल्याचीही माहिती त्याने दिली.


Published On - 7:25 pm, Fri, 29 November 19

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI