Lockdown : सोलापुरात ‘लॉकडाऊन’मध्ये यात्रा साजरा करण्याचा प्रयत्न, पोलिसांवर दगडफेक, गुन्हा दाखल

सोलापुरातील वागदारीत गावकऱ्यांनी पोलिसांवर दगडफेक केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.

Lockdown : सोलापुरात 'लॉकडाऊन'मध्ये यात्रा साजरा करण्याचा प्रयत्न, पोलिसांवर दगडफेक, गुन्हा दाखल

सोलापूर : वागदरीत गावकऱ्यांनी पोलिसांवर दगडफेक केल्याचा (Crowd Pelting Stones On Police) धक्कादायक प्रकार घडला आहे. अक्कलकोट तालुक्यातील वागदरी येथे ही घटना घडली आहे. येथे एक यात्रा असते, मात्र लॉकडाऊन असल्याकारणाने पोलिसांनी यात्रेला परवानगी दिली नाही. दोन लोकांनीच पुजा करावी (Crowd Pelting Stones On Police) असा पोलिसांचा आग्रह होता.

कोरोनाच्या पार्श्वभूमिवर संपूर्ण देशात लॉकडाऊन आहे. मात्र, वागदरी येथे जमावबंदीचा आदेश मोडून यात्रा साजरा करण्याचा प्रयत्न गावकऱ्यांकडून करण्यात आला. यावेळी पोलिसांनी गर्दी पांगविण्याचा प्रयत्न केल्यावर गावकऱ्यांनी पोलिसांवर दगडफेक करण्यात आली. या घटनेनंतर यात्रा कमिटीचे पंच आणि 200 हून अधिक ग्रामस्थांवर गुन्हा दाखल करण्याची कारवाई सुरु आहे.

पोलिसांचा आग्रह झुगारुन यात्रेचा प्रयत्न

“वादगरी गावात यात्रा होती. यात्रा करु नये असं आवाहन पोलिसांनी केलं. फक्त दोन लोकांनी पुजा करावी असा पोलिसांचा आग्रह होता, तरीही काही लोक तिथे जमले आणि त्यांनी रथ ओढण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलिसांनी लगेच हस्तक्षेप करत यात्रा बंद केली आणि लोकांना पांगवलं. यावेळी काही लोकांनी पोलिसांवर दगडफेक केली. अशावेळी अशी कुठली घटना घडणे हे दुर्दैवी आहे”, असं सोलापूरचे पोलीस आयुक्त मनोज पाटील यांनी सांगितलं.

“या ठिकाणी आधीच पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता. तिथे पोलीस निरिक्षक ते सर्व अधिकारी उपस्थित होते. तरीही काही लोकांनी जो रथ असतो तो ओढण्याचा कार्यक्रम करण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी हे थांबवलं, याचा राग कदाचित काही लोकांना आला असावा आणि त्यांनी पोलिसांवर दगडफेक (Crowd Pelting Stones On Police) केली. या प्रकरणी 30-40 लोकांवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे. या लोकांवर योग्य ती कडक कारवाई केली जाईल”, अशी माहिती सोलापूरचे पोलीस आयुक्त मनोज पाटील यांनी दिली.

ही घटना दुर्दैवी, संबंधितांवर कारवाई होणार : सतेज पाटील

“संचारबंदी जाहीर केली आहे आणि लोकांनी जर प्रतिसाद नाही दिला, तर ही दुर्दैवाची गोष्ट आहे. प्रशासन जे करत आहे, ते लोकांच्या सुरक्षेसाठी करत आहे याचं भान लोकांनी ठेवायला हवं. प्रशासनाला सहकार्य करा असं आम्ही सातत्याने लोकांना सांगतो आहे. कारण, हा जो काही कोरोनाचा विषय आहे तो सोशल डिस्टंसिंगमुळेच कमी होणार आहे. जर अशा यात्रेच्या माध्यमातून लोक पुन्हा एकत्र आले तर कम्युनिटी स्प्रेडिंगला वेळ लागणार नाही”, अशी प्रतिक्रिया गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी ‘टीव्ही 9 मराठी’ला दिली.

“भारतातली आकडेवारी गेल्या चार दिवसात ज्या गतीने वाढत आहे, याचा अर्थ तिसऱ्या स्टेजमध्ये हा विषाणू पसरत आहे. त्यामुळे माझी लोकांना विनंती आहे की त्यांनी पोलिसांना सहकार्य करा. ज्या लोकांनी पोलिसांवर दगडफेक केली असेल, त्यांच्यावर कायदेशी कारवाई 100 टक्के होणार. आम्ही प्रशासनाच्या बाजुने. पोलीस रस्त्यावर जे उतरले आहेत ते लोकांच्या सुरक्षिततेसाठी उतरले आहेत. आपण हा लॉकडाऊन नाही पाळला तर हा संसर्ग वाढायला वेळ लागणार नाही. त्यामुळे लोकांनी पोलिसांना सहकार्य करावं आणि जो काणी काही चुकीचं (Crowd Pelting Stones On Police) करत असेल त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई ही होणार आहे”, असंही सतेज पाटील यांनी सांगितलं.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI