Lockdown : खासगी वैद्यकीय सेवा अबाधित ठेवा, अन्यथा कारवाईसाठी तयार राहा : तुकाराम मुंढे

'लॉकडाऊन' दरम्यान कुठलीही (Tukaram Munde Order) खासगी वैद्यकीय सेवा बंद ठेवू नये. त्या अबाधित ठेवाव्या

Lockdown : खासगी वैद्यकीय सेवा अबाधित ठेवा, अन्यथा कारवाईसाठी तयार राहा : तुकाराम मुंढे

नागपूर : ‘लॉकडाऊन’ दरम्यान कुठलीही (Tukaram Munde Order) खासगी वैद्यकीय सेवा बंद ठेवू नये. त्या अबाधित ठेवाव्या, असे आदेश देत कुठलेही कारण नसताना बंद आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा मनपा आयुक्त तुकाराम मुंढे (Tukaram Munde Order) यांनी दिला.

यासंदर्भात आज रविवारी एक आदेश निर्गमित केला आहे. लॉकडाऊन हे लोकांनी घराबाहेर पडून कोरोना विषाणूचा प्रसार करु नये, यासाठी आहे. अत्यावश्यक सेवांना यातून वगळण्यात आले आहे. मात्र, शहरात अनेक खासगी दवाखाने बंद असल्याचे निदर्शनास आले आहे. खासगी दवाखाने, ओपीडी, पॅथॉलॉजी लॅब, मेडिकल स्टोर्स बंद ठेवण्याचे काहीही कारण नाही.

अनेक ठिकाणी या सेवा बंद करण्यात आल्याने (Tukaram Munde Order) नागरिकांची गैरसोय होत आहे. यासंदर्भात नागरिकांच्याही तक्रारी प्राप्त झाल्या. त्यामुळे सर्व खासगी वैद्यकीय व्यावसायिकांनी सेवा सुरु ठेवण्याचे आदेश दिले आहेत. विनाकारण सेवा बंद ठेवल्यास साथरोग नियंत्रण कायदा आणि भारतीय दंड संहितेनुसार कारवाई करण्यात येईल, असे आदेशात नमूद केले आहे. वैद्यकीय सेवेशी संबंधित सर्व संघटनांना हा आदेश पाठविण्यात आला आहे.

दुसरीकडे, देशात कोरोनाची दहशत दिवसेंदिवस वाढत चालली आहे. तर महाराष्ट्रातही कोरोनाबाधितांची संख्या ही 200 पार गेली आहे. सध्या महाराष्ट्रात 203 कोरोनाबाधित रुग्ण आहेत. त्यापैकी 14 हे नागपुरातील आहेत. तर राज्यात आतापर्यंत 8 जणांना बळी कोरोनाने (Tukaram Munde Order) घेतला आहे.

संबंधित बातम्या :

Corona : लॉकडाऊनऐवजी वेगळा विचार करा, राहुल गांधींचा मोदी सरकारला सल्ला

देशात कोरोनाबाधितांची संख्या 1000 च्या पार, 24 तासात 106 कोरोना रुग्ण

‘कोरोना’च्या तिसऱ्या टप्प्यापासून वाचण्यासाठी पंतप्रधानांचं ‘हे’ आवाहन पाळा : अजित पवार

Lockdown : बॅकस्टेज आर्टिस्ट, मेक अप, ड्रेसबॉय, स्पॉट बॉइज यांच्या मदतीसाठी रंगमंच कामगार संघाचा पुढाकार

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI