केसांवर भांडी विकणाऱ्यांची उपासमार, भीक मागून आणलेली, वाळलेली चपाती चिमुकल्याच्या हाती

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारने लॉकडाऊन केले. त्यामुळे अनेक (Daily Wages People Struggle during Lockdown)  लोकांचे व्यवसाय गेले.

केसांवर भांडी विकणाऱ्यांची उपासमार, भीक मागून आणलेली, वाळलेली चपाती चिमुकल्याच्या हाती

वर्धा : केसांवर भांडे म्हणत परिसरात येऊन टिकल्या, कानातले विकणाऱ्या महिला आणि पुरुष या लॉकडाऊनच्या (Daily Wages People Struggle during Lockdown)  काळात आपल्या झोपडीतच लॉक झाल्या आहेत. लॉक डाऊनच्या सुरुवातीच्या दोन दिवसात तर नेमकं काय झालं हेच त्यांना समजलं नव्हतं, आता पोलीस बाहेर येऊ देत नाही आहेत, मग करायचं काय अन् खायचं काय असा प्रश्न त्यांना पडला आहे. सरकारकडे मागायचं तर रेशन कार्ड देखील नाही, अशी काहीशी परिस्थिती वर्ध्याच्या सावंगी येथील झोपडीत राहणाऱ्या रहिवाशांची झाली आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारने लॉकडाऊन केले. त्यामुळे अनेक (Daily Wages People Struggle during Lockdown)  लोकांचे व्यवसाय गेले. हातावर पोट असणाऱ्या लोकांवर उपासमारीची वेळ आली आहे. परिसरात भीक मागून आणलेल्या भाकरीला सध्या ही लोक वाळवून खात आहे. आमच्या घरचं सर्व धान्य संपले आहे. तेल, तिखट, मीठ, साबण, गहू, डाळ सर्व संपलं आहे. आठ दिवस झाले, घरची चूल पेटलेली नाही. भीक मागायला गेले तर आम्हाला खायला नाही, तुम्हाला कुठून देऊ, असे कानावर येतं. आमचे लहान-लहान मुले आहे त्यांच्यासाठी भीक मागून जगत आहे. आता मात्र पोलीस देखील रस्त्यावर जाऊ देत नाही, आम्हाला हकलून लावतात. लॉकडाउन आहे, फिरु नका असे पोलिसांकडून सांगण्यात येते.

लॉकडाऊनच्या काळात आम्हाला काम नाही. घरी बसून आहे खायला अन्न भेटत नाही. शिळ्या चपातीचे तुकडे खात आहे आणि आमच्या लहान मुलांना पण खाऊ घालत आहे. लॉकडाउनच्या सुरुवातीच्या काळात काही सामाजिक संघटना एक वेळेच अन्नवाटप करत होते. आता मात्र आठ दिवसापासून कोणीच येत नाही. आमच्याकडे रेशन कार्ड नाही त्यामुळे सरकारी शिधाचा लाभ घेऊ शकत नाही.

आम्ही केसांवर भांडे विकायचा व्यवसाय करायचो. पोट भरण्यासाठी काही करायला गेलं तर पोलीस हकलून लावतात. लॉकडाऊनच्या काळात जगायचं कसं असा प्रश्न समोर उभा आहे. काही लोक सुरुवातीला कधी-कधी अन्न आणून देत होते. औषधाला देखील पैसे उपलब्ध नाही.

हातावर पोट असणाऱ्या नागरिकांची उपासमार कोण थांबवणार. आठ दिवसापासून बंद असलेली स्वयंपाकाची चुल पेटवण्यास मदत कोण करणार, कोरोनाच्या या काळात वंचित घटकांचा भूकेचा संघर्ष कधी थांबणार ? प्रशासन यांना मदत कधी करणार हे पाहणे आता महत्त्वाचं ठरणार (Daily Wages People Struggle during Lockdown)  आहे.


Published On - 5:18 pm, Mon, 20 April 20

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI