AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अरविंद केजरीवाल यांच्या कोरोना चाचणीचा रिपोर्ट निगेटिव्ह

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा कोरोना चाचणी अहवाल निगेटिव्ह आला आहे. आज सकाळीच अरविंद केजरीवाल यांची कोरोना टेस्ट करण्यात आली होती.

अरविंद केजरीवाल यांच्या कोरोना चाचणीचा रिपोर्ट निगेटिव्ह
| Updated on: Jun 09, 2020 | 9:01 PM
Share

नवी दिल्ली : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Delhi CM Arvind Kejriwal Tests Negative For COVID-19) यांचा कोरोना चाचणी अहवाल निगेटिव्ह आला आहे. आज सकाळीच अरविंद केजरीवाल यांची कोरोना टेस्ट करण्यात आली होती. सायंकाळी त्यांचा अहवाल निगेटिव्ह आला. आम आदमी पक्षाचे आमदार राघव चड्डा यांनी ही माहिती दिली (Delhi CM Arvind Kejriwal Tests Negative For COVID-19).

अरविंद केजरीवाल यांना ताप आला होता आणि त्यांच्या घशात खवखवत होतं, त्यामुळे त्यांनी रविवारपासून (7 जून) स्वत:ला आयसोलेट करुन घेतलं होतं. त्यानंतर आज सकाळी त्यांची कोरोना टेस्ट करण्यात आली.

अरविंद केजरीवाल सेल्फ आयसोलेशनमध्ये

मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या घशात खवखव होत होती. त्यामुळे डॉक्टरांनी त्यांना आराम करण्याचा सल्ला दिला आणि काही चाचण्याही करायला सांगितल्या. यामध्ये कोरोना टेस्टही करण्यात आली. मंगळवारी (9 जून) सकाळी केजरीवालांनी त्यांचे नमुने दिले. केजरीवालांनी आधीच स्वत:ला सर्व कार्यक्रम आणि बैठकांपासून दूर केलं होतं. सोमवारी (8 जून) त्यांनी कुठल्याही अधिकाऱ्याशी मुलाखत केली नाही. त्यांना स्वत:ला आयसोलेट केलं.

अरविंद केजरीवाल यांची पूर्वीची मेडिकल हिस्ट्री पाहाता त्यांना कोरोनाचा धोका असल्याची शक्यता होती. म्हणून त्यांची कोरोना टेस्ट करणे अत्यावश्यक झालं होतं. दिलासादायक बाब म्हणजे त्यांचा अहवाल निगेटिव्ह आला, असं आयएमए (IMA) सहसचिव डॉ. अनिल गोयल यांनी ‘टीव्ही 9 भारतवर्ष’सोबत बोलताना सांगितलं.

दिल्लीत कोरोनाचे 874 बळी

दिल्लीत कोरोनाबाधितांची संख्या 29 हजार 943 वर पोहोचली आहे. यापैकी 11,357 जण आतापर्यंत कोरोनामुक्त झाले आहेत. तर 17,712 जणांवर उपचार सुरु आहे. तर दिल्लीत कोरोनामुळे आतापर्यंत 874 जणांचा मृत्यू झाला आहे.

Delhi CM Arvind Kejriwal Tests Negative For COVID-19

संबंधित बातम्या :

राजधानीत अधिक मोकळीक, दिल्लीच्या सीमा खुल्या, रेस्टॉरंट-मॉलही उघडणार

ममतादीदी, ‘कोरोना एक्स्प्रेस’ तुमचा ‘एक्झिट रुट’ ठरेल, अमित शाह यांचा घणाघात

भाजप नेते ज्योतिरादित्य शिंदे यांना ‘कोरोना’, मातोश्री माधवी राजे शिंदे यांनाही लागण

लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.