दिल्लीची कोरोना रुग्णांची संख्या वाढतीच, वाढत्या रुग्णसंख्येला आळा घालण्यासाठी मुख्यमंत्री केजरीवाल सरसावले

राजधानी नवी दिल्लीत गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढते आहे. दिल्लीत गेल्या 24 तासांत जवळपास 8 हजार केसेस समोर आल्या आहेत.

दिल्लीची कोरोना रुग्णांची संख्या वाढतीच, वाढत्या रुग्णसंख्येला आळा घालण्यासाठी मुख्यमंत्री केजरीवाल सरसावले
Akshay Adhav

|

Nov 14, 2020 | 7:54 AM

नवी दिल्ली : देशभरात गेल्या 24 तासांत जवळपास 45 हजार रुग्णांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. याचबरोबर देशातील कोरोना रुग्णांची संख्या वाढून 87 लाखांपर्यंत ही संख्या गेली आहे. राजधानी नवी दिल्लीत गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढते आहे. दिल्लीत गेल्या 24 तासांत जवळपास 8 हजार केसेस समोर आल्या आहेत. त्यामुळे दिल्लीची एकूण कोरोना रुग्णांची संख्या पावणे पाच लाखांपर्यंत जाऊन पोहचली आहे. (Delhi Corona Update Cm Arvind kejriwal)

राजधानी दिल्लीत गेल्या 24 तासांत 56 हजार 500 टेस्ट केल्या गेल्या आहेत. तर साडे सहा हजा रुग्ण ठणठणीत बरे झाले आहेत. दिल्लीतला रिकव्हरी रेट चांगलाच वाढला आहे. 89. 1 टक्के एवढा रिकव्हरी रेट झाला आहे.

दुसरीकडे वाढत्या कोरोना रुग्णांच्या संख्येमुळे राज्य सरकार चिंतेत आहे. कोरोनाला रोखण्यासाठी जी पावले उचलायला हवीत, आम्ही ती उचलतो आहोत. पुढच्या आठवड्यामध्ये कोरोनाला रोखण्याच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाची पावले आम्ही उचलत आहोत. पुढील दहा दिवसांत कोरोना नियंत्रणात येईल, अशी अपेक्षा दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी व्यक्त केली आहे.

दिल्लीतील वाढत्या कोरोना रुग्णांचं खापर केजरीवालांनी शेजारच्या इतर राज्यांवरही फोडलं. “शेतातील कचरा जाळल्याने पूर्ण 1 महिना उत्तर भारतातील पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश, तसंच  दिल्लीमध्ये धूर आणि प्रदुषण असते. पाठीमागच्या 10 ते 12 वर्षांपासून प्रत्येक वर्षाच्या ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यात शेतातील कचरा जाळल्याने होणाऱ्या प्रदुषणामुळे उत्तर भारत त्रस्त असतो”, असं केजरीवाल यांनी नमूद केलं.

दिल्लीत कोरोनाचं संक्रमन कसं वाढलं?

दिल्लीत कोरोना संक्रमनाचा वेग मंदावला होता. मात्र, गेल्या दोन आठवड्यात संक्रमनाचा वेग वाढला. दिल्लीत 28 ऑक्टोबर रोजी पहिल्यांदा 5 हजार 673 नवे रुग्ण आढळले होते. त्यानंतर 2 नोव्हेंबर वगळता दररोज पाच हजार पेक्षा जास्त नवे कोरोनाबाधित आढळत आहेत.

दिल्लीत कोरोना संक्रमन वाढण्यामागे अनेक कारणं असल्याचं सांगितलं जात आहे. सणांनिमित्ताने लोक एकमेकांच्या जास्त संपर्कात आले. याशिवाय दिल्लीत प्रदूषणदेखील वाढलं आहे. त्याचबरोबर थंडीदेखील वाढली आहे. या कारणांमुळे दिल्लीत कोरोना रुग्ण वाढले आहेत.

कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन नागरिकांनी मास्क वापरावं, सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचं पालन करावं, असा सल्ला तज्ज्ञांनी दिल्लीच्या नागरिकांना दिला आहे.

(Delhi Corona Update Cm Arvind kejriwal)

संबंधित बातम्या

पुढच्या 10 दिवसांत दिल्लीतील कोरोना नियंत्रणात येण्याची अपेक्षा : मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल

Corona | नवी दिल्लीत कोरोनाची तिसरी लाट, संसर्गापासून बचावासाठी मास्क वापरा, दिल्लीच्या आरोग्यमंत्र्यांचे आवाहन

दिल्लीत कोरोनाची तिसरी लाट, नव्या बाधितांमध्ये प्रचंड वाढ : अरविंद केजरीवाल

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें