सलून सुरु करुन नाभिक समाजाला न्याय द्या : फडणवीस

राज्यात जवळपास 20 लाख सलून व्यावसायिकांवर बेरोजगारीचं संकंट आहे. त्यामुळे नाभिक समाजाचे प्रश्न शासनदरबारी मांडू, असं आश्वासन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिलं आहे (Devendra Fadnavis promise hair salon shopkeepers).

सलून सुरु करुन नाभिक समाजाला न्याय द्या : फडणवीस

मुंबई : लॉकडाऊनदरम्यान सर्व सलून दुकानं बंद आहेत (Devendra Fadnavis promise hair salon shopkeepers). त्यामुळे सलून व्यवसायिकांना मोठ्या आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. राज्यात जवळपास 20 लाख सलून व्यावसायिकांवर बेरोजगारीचं संकंट आहे. त्यामुळे नाभिक समाजाचे प्रश्न शासनदरबारी मांडू, असं आश्वासन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिलं आहे (Devendra Fadnavis promise hair salon shopkeepers).

देवेंद्र फडणवीस यांनी आज (9 जून) महाराष्ट्रातील विविध नाभिक समाजातील संस्थांचे प्रतिनिधी तसेच सलून/वेलनेस उद्योगांतील प्रतिनिधींशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून चर्चा केली. वेलनेस अ‍ॅम्बेसेडर रेखाताई चौधरी यांनी ही चर्चा घडवून आणली.

गावागावांतील केश कर्तनालयापासून ते शहरांतील मोठ्या सलूनपर्यंत या व्यवसायात सुमारे 20 लाख लोकांना रोजगार प्राप्त होतो. कोरोना प्रादुर्भाव, टाळेबंदी आणि त्यानंतर हळूहळू सूट देण्याचा क्रम यात केंद्र सरकारने या व्यवसायाला सूट दिली आहे. अन्य राज्यांनीसुद्धा या व्यवसायाला सुरु करण्याचा निर्णय घेतला.

दरम्यान, “महाराष्ट्रात सलून व्यवसायाला अजून सूट देण्यात आलेली नाही. त्यामुळे बेरोजगारीची मोठी कुर्‍हाड या व्यवसायावर, या व्यवसायात काम करणार्‍यांवर कोसळते आहे. हे सारे गरिब अथवा मध्यमवर्गीय कुटुंबातील आहेत. इतर राज्यांप्रमाणे महाराष्ट्रातील व्यवसायिकांनीसुद्धा हा व्यवसाय सुरु करण्यासाठी स्वत:चे प्रोटोकॉल्स तयार केले आहेत. त्याचे पालन करुन व्यवसाय सुरू करण्याची अनुमती द्यावी”, अशी नाभिक संघटनांची मागणी आहे. याबाबत राज्य सरकारकडे पाठपुरावा करण्याचे आश्वासन देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे.

“सलून दुकानं सुरु राहावीत आणि सरकारने मदत करावी”, यासाठी दोन दिवसांपूर्वी महाराष्ट्र सलून आणि पार्लर असोसिएशनने आंदोलन पुकारलं होतं. “महाराष्ट्र सलून आणि पार्लर असोसिएशन आणि संपूर्ण नाभिक समाज संघटना कोरोनाविरोधाच्या लढाईत सरकारसोबत आहे. मात्र, सरकारने आर्थिक मदत देऊन सलून व्यवसाय बंद ठेवण्यास सांगावे”, अशी मागणी महाराष्ट्र सलून आणि पार्लर असोसिएशनचे अध्यक्ष सोमनाथ काशिद यांनी केली होती.

संबंधित बातम्या :

राज्य सरकारने आर्थिक मदत करुन दुकानं बंद ठेवण्यास सांगावं, सलून व्यवसायिक आक्रमक

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI