पाणी कपातीच्या निर्णयात देवेंद्र फडणवीसांच नाव आणू नये? पुणेकर सुज्ञ आहेत – महापौरांचा जयंत पाटलांना टोला

जलसंपदा विभागाने 2 डिसेंबरला काढलेल्या आदेशात सरळ लिहिण्यात आले आहे, कीभामा आसखेडमधून 1. 6 टीएमसी पाणी मिळतंय म्हणून आम्ही पाणी बंद करतो आहोत. तर देवेंद्र फडणवीस हे 2019 पर्यंत सत्तेत होते. भामा-आसखेड प्रकल्प 1 जानेवारी 2021 ला झालं मग यात देवेंद्र फडणवीस आले कुठून?

पाणी कपातीच्या निर्णयात देवेंद्र फडणवीसांच नाव आणू नये? पुणेकर सुज्ञ आहेत - महापौरांचा जयंत पाटलांना टोला
Murlidhar Mohol

पुणे- भामा आसखेडमधून 1.6 टीएमसी पाणी ज्यादा मिळतंय म्हणून खडकवासला धरणातून पाणी कमी केलं जाईल असा आदेश पाटबंधारे विभागानं आदेश काढला. मात्र पुणेकरांनी या पाणी कपातीला केलेला विरोध पाहाता राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी हा निर्णय मागे घेतल्याची माहिती दिली. परंतु जर हा निर्णय आज रद्दच करायचा होता तर आपल्या खात्यानं हा आदेश का काढला? असा सवाल महापौरा मुरलीधर मोहळ यांनी उपस्थित केला. पुण्याचा पाणी कपातीचा निर्णय रद्द केल्याचे जलसंपदा विभागाने जाहीर निर्णयानंतर मोहळ यांनी पत्रकार परिषद घेत ही माहिती दिली.

देवेंद्र फडणवीस आले कुठून?

पाणी कपातीचा निर्णय रद्द केल्याबद्दल जलसंपदा विभागाचे आभार. परंतु आपण पत्रकार परिषदेत पाणी कपातीचा निर्णय देवेंद्र फडणवीसांच्या काळात घेतला होता अशी माहिती दिली. मात्र जलसंपदा विभागाने २ डिसेंबरला काढलेल्या आदेशात सरळ लिहिण्यात आले आहे, कीभामा आसखेडमधून 1. 6 टीएमसी पाणी मिळतंय म्हणून आम्ही पाणी बंद करतो आहोत. तर देवेंद्र फडणवीस हे 2019 पर्यंत सत्तेत होते. भामा-आ सखेड प्रकल्प 1 जानेवारी 2021 ला झालं मग यात देवेंद्र फडणवीस आले कुठून? असा सवालही मोहाळ यांनी उपस्थित केला.

भेट न देता मंत्रीमहोदय निघून गेले पाणी कपातीच्या संदर्भात मी मंत्री महोदयांना भेटण्या संदर्भात वेळही मागितली होती. त्यानुसार त्यांनी मला 5 वाजताची वेळ भेटण्यासाठी दिलीही होती. मंत्रीमहोदयांच्या भेटीसाठी वेळेत त्या ठिकाणी पोहचलो. मात्र त्यापूर्वीच राष्ट्रवादी पक्षाचे कार्यकर्ते पाणी प्रश्नासंदर्भात मंत्री महोदयांशी चर्चा करत होते. त्यानंतर त्यांनी थेट पत्रकार परिषद घेत पाणी कपातीचा निर्णय जाहीर केला. मात्र मला भेटीसाठी पाच मिनिटाचा वेळ न देता मंत्रीमहोदय निघून गेले. मी एक तास तुमच्या भेटीसाठी वाट बघत थांबलो होतो. मी माझ्या वैयक्तिक कामासाठी त्यांच्याकडे नाव्हो गेलो. पुणेकरांच्या प्रश्नासाठी तसेच पुण्याचा प्रथम नागरिक या नात्याने त्यांना भेटण्यासाठी गेलो होतो.

पुणेकरांच्या रोषाला सामोरे जावे लागू नये म्हणून तुम्ही हा निर्णय घेतला. भविष्यात असे कोणतेही निर्णय घेऊ नका. पाणी कपातीसाठी महापालिका म्हणून आम्ही काय करायचे ते सांगा. आम्ही निश्चित त्यासाठी सहकार्य करू असेही मोहळ म्हणाले.

Breaking : राज्यात ओमिक्रॉनचा शिरकाव, कल्याण-डोंबिवलीत ओमिक्रॉनची लागण झालेला रुग्ण आढळला

Breaking | परमबीर सिंग, सचिन वाझे यांच्याविरोधात पहिलं दोषारोपपत्र दाखल

87 वर्षांचा तरुण, काळजात लोकशाहीचे धगधगते स्पिरीट, ओठात कैसे ढूंढना पाऊ…साहित्य संमेलनात भटकळांची मोहनमाया!

Published On - 7:39 pm, Sat, 4 December 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI