AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘पदवीधर’ टी स्टॉलवर धनंजय मुंडे प्यायले 2 हजार रुपयांचा चहा

बीड : पदव्युत्तर शिक्षण घेऊन देखील नोकरी मिळाली नसल्याने बीडच्या एका सुशिक्षित तरुणाने बीडच्या शासकीय विश्रामगृहासमोर ‘पदवीधर’ नावानेच चहाचा हातगाडा टाकला आहे. याच चहाच्या हात गाड्यावर विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडेंचा ताफा पोहचला आणि पदवीधर मुलाने बनवून दिलेल्या चहाचा घोट घेत चर्चा केली. एवढेच नाही तर धनंजय मुंडेंनी प्यायलेल्या चहाचे 2000 रुपये देखील दिले. नितीन धुताडमल या युवकाने समाजशास्त्र […]

'पदवीधर' टी स्टॉलवर धनंजय मुंडे प्यायले 2 हजार रुपयांचा चहा
| Edited By: | Updated on: Jul 05, 2019 | 4:25 PM
Share

बीड : पदव्युत्तर शिक्षण घेऊन देखील नोकरी मिळाली नसल्याने बीडच्या एका सुशिक्षित तरुणाने बीडच्या शासकीय विश्रामगृहासमोर ‘पदवीधर’ नावानेच चहाचा हातगाडा टाकला आहे. याच चहाच्या हात गाड्यावर विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडेंचा ताफा पोहचला आणि पदवीधर मुलाने बनवून दिलेल्या चहाचा घोट घेत चर्चा केली. एवढेच नाही तर धनंजय मुंडेंनी प्यायलेल्या चहाचे 2000 रुपये देखील दिले.

नितीन धुताडमल या युवकाने समाजशास्त्र विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. पीएसआय परीक्षेत कमी मार्क मिळाल्याने थोडक्यात पद हुकले. दुसरीकडे कुठेही नोकरी मिळत नाही म्हणून हतबल होऊन त्याने बीडच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवनासमोर चहाची टपरी टाकली. यावरच त्याचा उदरनिर्वाह चालतो. त्याचा या ‘पदवीधर’ टी स्टॉलला राज्याचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी भेट दिली.

नितीनने या टपरीचं नावही ‘पदवीधर’ ठेवून, युवकांना रोजगाराची खोटी आश्वासनं देणाऱ्या मोदी सरकारला एक चपराक दिली आहे. अशा हजारो पदवीधर युवकांना हतबल होण्याची वेळ या भाजपा सरकारमुळे आली आहे. आगामी निवडणुकांमध्ये हेच बेरोजगार तरुण भाजपाला धूळ चारतील, अशा प्रतिक्रिया धनंजय मुंडेंनी यावेळी दिल्या.

घराची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने कुटुंबाचा उदानिर्वाह चालविण्यासाठी या पदवीधर तरुणाने चहाचा ठेला टाकला. याला महिना होतोय। दिवसाकाठी सर्व वजा होऊन नितीनला 500 रुपये दररोज मिळकत होते. मात्र चहाच्या ठेल्यावर राज्याचे विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे आणि त्यांचा ताफा चहा घेण्यासाठी येईल याची कल्पना नितीनला नव्हती. धनंजय मुंडेंनी चहा घेतल्याने नितीनचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे.

पदवी हातात घेऊन ही नोकरी मिळत नसल्याने हतबल झालेल्या समाजशास्त्राच्या या तरुणावर चक्क चहा विकण्याची वेळ आली आहे. मात्र आलेल्या परिस्थितीवर मात करत नितीनने उचलले पाऊल सुशिक्षित बेरोजगारांसाठी एक आदर्शच म्हणावे लागेल.

INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!
INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!.
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना.
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं.
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न.
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी.
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण.
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर.
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी.
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान.
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप.