धुळ्यात पोलिसांकडून गांजाची शेती उद्ध्वस्त, 6 लाखांची गांजा रोपं जप्त

धुळ्यात पोलिसांकडून गांजाची शेती उद्ध्वस्त, 6 लाखांची गांजा रोपं जप्त

शिरपूर तालुक्यातील बोराडी शिवारात ही गांजाची शेती केली जात होती. सांगवी पोलिसांकडून ही कारवाई करण्यात आली.

Nupur Chilkulwar

|

Oct 19, 2020 | 4:52 PM

धुळे : धुळ्यात पोलिसांनी गांजाची शेती उद्ध्वस्त करत मोठी कारवाई केली (Dhule Ganja Farming). यावेळी तब्बल 6 लाख रुपयांची गांजाची रोपं जप्त करण्यात आली आहेत. शिरपूर तालुक्यातील बोराडी शिवारात ही गांजाची शेती केली जात होती. सांगवी पोलिसांकडून ही कारवाई करण्यात आली (Dhule Ganja Farming).

शिरपूर तालुक्यातील बोराडी शिवारात एकलव्यपाड्यात तूर आणि कपाशीच्या आडोशाला गांजाची शेती केली जात होती. सांगवी पोलिसांनी छापा टाकून ही शेती उद्ध्वस्त केली. यावेळी 6 लाखांच्या गांजाची रोपं जप्त करण्यात आली असून दोन जणांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बोराडीपासून काही अंतरावर असलेल्या दुर्गम भागात एकलव्यपाडा असून वनविभागाच्या जमिनीवर अवैधरित्या गांजा वनस्पतीची लागवड केल्याची गुप्त माहिती सांगवी पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील यांना मिळाली. त्यानुसार, शेतात जावून पोलिसांनी छापा टाकला. यावेळी शेतातील तूर, कपाशी पिकाच्या आडोशाला गांजाची हिरवी झाडे लागवड केलेल्या अवस्थेत आढळून आली.

गब्बर फिरंग्या पावरा याच्या शेतात लागवड केलेली 290 किलो ग्रॅम वजनाची 5 ते 8 फुटापर्यंत उंच असलेली हिरवी रोपे जप्त केली. त्याची किंमत 2 लाख 90 हजार रुपये इतकी आहे. तर डोंगरसिंग खजान पावरा याच्या शेतात लागवड केलेली 300 किलो ग्रॅम वजनाची 5 ते 8 फुटापर्यंत उंच असलेली हिरवी रोपे जप्त केली. त्याची किंमत 3 लाख रुपये इतकी आहे. या दोघांना अटक करण्यात आली असून 5 लाख 90 हजाराचा मुद्देमाल जप्त केला आहे.

Dhule Ganja Farming

संबंधित बातम्या :

गाडीत पेट्रोल भरलं की पाणी?, जाब विचारणाऱ्या तरुणांना पेट्रोल पंप कर्मचाऱ्यांची जबर मारहाण

CCTV | एपीएमसी मार्केटमध्ये मास्क न वापरणाऱ्यांवर कारवाई करणाऱ्या सुरक्षारक्षकाला परप्रांतीय मजुरांची मारहाण

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें