AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मराठमोळा शिलेदार करणार प्रभासला दिग्दर्शन, ‘आदिपुरुष’ची घोषणा

'लोकमान्य' ते 'तानाजी' असे विविधांगी चित्रपट साकारणाऱ्या ओम राऊत याच्यासोबत प्रभास नवीन चित्रपट करत आहे.

मराठमोळा शिलेदार करणार प्रभासला दिग्दर्शन, 'आदिपुरुष'ची घोषणा
| Updated on: Aug 18, 2020 | 11:50 AM
Share

मुंबई : ‘बाहुबली’ अभिनेता प्रभास आता मराठमोळ्या दिग्दर्शकासोबत काम करणार आहे. ‘लोकमान्य’ ते ‘तानाजी’ असे विविधांगी चित्रपट साकारणाऱ्या ओम राऊत याच्यासोबत प्रभास नवीन चित्रपट करत आहे. ‘आदिपुरुष’ या सिनेमाची आज घोषणा करण्यात आली. (Director Om Raut to work with Prabhas on Adipurush)

अजय देवगनसोबत ‘तानाजी’ या सुपरहिट चित्रपटाचे दिग्दर्शन केल्यावर ओम राऊत आता ‘बाहुबली’ स्टार प्रभाससोबत काम करणार आहे. ओम राऊत आणि प्रभास यांनी मंगळवारी सकाळी 7 वाजून 11 मिनिटांच्या मुहूर्तावर आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर पोस्ट शेअर करत ‘आदिपुरुष’ची अधिकृत घोषणा केली.

अभिनेता प्रभास ‘आदिपुरुष’ची मुख्य भूमिका साकारणार असल्याचे पोस्टरमध्ये म्हटले आहे. टी सीरीजचे भूषण कुमार या सिनेमाची निर्मिती करणार आहेत. हा चित्रपट 2022 मध्ये प्रदर्शित होणार असून हिंदीशिवाय तेलुगू, तमिळ, मल्याळम आणि कन्नड या चार दाक्षिणात्य भाषांमध्ये रिलीज होईल.

प्रभासनेही सोशल मीडियावर ‘आदिपुरुष’चे पोस्टर शेअर करुन या चित्रपटाची घोषणा केली आहे. दुष्टावर सुष्टाने मिळवलेल्या विजयाचा जल्लोष म्हणजे या सिनेमाचे कथानक असल्याचे त्याने म्हटले आहे. चित्रपटाच्या पोस्टरवरुन हा सिनेमा प्रभू श्रीराम यांच्यावर आधारित असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

ओम राऊतचा परिचय

लेखक-दिग्दर्शक ओम राऊत हा प्रख्यात निर्मात्या नीना राऊत आणि ज्येष्ठ पत्रकार भारतकुमार राऊत यांचा चिरंजीव. लहानपणी करामती कोट (1993) या सिनेमात त्याने अभिनय केला होता. ‘सिटी ऑफ गोल्ड’ या सिनेमाच्या निर्मितीतून 2010 मध्ये त्याने मनोरंजन विश्वात पाऊल ठेवलं. सुबोध भावेची मुख्य भूमिका असलेल्या ‘लोकमान्य : एक युगपुरुष’ सिनेमाचे दिग्दर्शन त्याने केले. तर नुकत्याच आलेल्या अजय देवगणच्या ‘तान्हाजी’च्या दिग्दर्शनातून त्याने बॉलिवूडमध्येही ठसा उमटवला.

दुसरीकडे, प्रभास अभिनेत्री दीपिका पदुकोणसोबतही एका सिनेमात झळकणार आहे. या सिनेमाचे नाव ठरले नसून नाग अश्विन त्याचे दिग्दर्शन करणार आहे. तर अभिनेत्री पूजा हेगडेसोबत त्याचा ‘राधे श्याम’ हा चित्रपट पुढच्या वर्षी रिलीज होणार आहे. (Director Om Raut to work with Prabhas on Adipurush)

KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन.