हर्षवर्धन जाधव यांच्या पत्नीवर शिवीगाळ केल्याचा आरोप, जाधव कुटुंबातील वाद विकोपाला

कन्नडचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव (Former MLA Harshvardhan Jadhav) यांच्या कुटुंबातील वाद विकोपाला गेला आहे.

हर्षवर्धन जाधव यांच्या पत्नीवर शिवीगाळ केल्याचा आरोप, जाधव कुटुंबातील वाद विकोपाला
Follow us
| Updated on: Mar 12, 2020 | 4:52 PM

औरंगाबाद : कन्नडचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव (Former MLA Harshvardhan Jadhav) यांच्या कुटुंबातील वाद विकोपाला गेला आहे. त्यांच्या कुटुंबातील वाद थेट पोलीस ठाण्यात धडकला आहे. हा वाद त्यांच्या आई तेजस्विनी जाधव आणि पत्नी संजना जाधव यांच्यात आहे (Former MLA Harshvardhan Jadhav) . तेजस्विनी जाधव यांनी आपली सून संजना यांच्याविरोधात शिवीगाळी केल्याची तक्रार औरंगाबादच्या क्रांती चौक पोलीस ठाण्यात केली आहे.

काय आहे नेमकं प्रकरण?

काही दिवसांपूर्वी हर्षवर्धन जाधव यांच्याविरोधात अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यांच्यावर एका व्यक्तीला जातीवाचक शिवीगाळ केल्याचा आरोप आहे.

पीडित व्यक्तीची हर्षवर्धन जाधव यांच्या जमिनीच्या प्लॉट शेजारी टपरी होती. ती टपरी काढण्यासाठी हर्षवर्धन जाधव यांनी जातीवाचक शिवीगाळ करत धमकी दिल्याचा आरोप पीडित व्यक्तीने केला आहे. त्याने याविरोधात पोलिसांकडे लेखी तक्रार देत जाधव यांच्यावर अॅट्रॉसिटी गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. त्यानंतर पोलिसांनी हर्षवर्धन जाधव यांच्यावर गुन्हा दाखल केला.

दरम्यान, हर्षवर्धन जाधव यांच्यावर अॅट्रॉसिटीचा गुन्हा हा त्यांचे सासरे आणि भाजप नेते रावसाहेब दानवे यांच्यामुळे करण्यात आल्याचा आरोप तेजस्विनी जाधव यांनी केला. त्यामुळे रावसाहेब दानवे यांची मुलगी आणि हर्षवर्धन जाधव यांच्या पत्नी संजना जाधव आणि तेजस्विनी जाधव यांच्यात वाद निर्माण झाला. हा वाद आता विकोपाला गेला असून थेट पोलीस ठाण्यात धडकला आहे.

कोण आहेत हर्षवर्धन ?

  • हर्षवर्धन जाधव हे भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांचे जावई आहेत.
  • हर्षवर्धन जाधव हे 2009 मध्ये मनसेच्या तिकिटावर कन्नड विधानसभा निवडणुकीत निवडून आले होते.
  • मात्र पाच वर्षांच्या आत त्यांनी पक्षांतर्गत मतभेदामुळे मनसेला सोडचिठ्ठी दिली होती.
  • त्यानंतर त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला.
  • 2019 च्या लोकसभा निवडणुकीत हर्षवर्धन जाधव यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवली. मात्र त्यांचा पराभव झाला.
  • 2019 च्या विधानसभा निवडणुकीतही हर्षवर्धन जाधव यांना विजय मिळवता आला नाही.
  • शिवसेनेच्या उदयसिंग राजपूत यांनी त्यांचा पराभव केला.

संबंधित बातमी : माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांच्यावर अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

Non Stop LIVE Update
भोरमधील सभेत अजित पवारांकडून सुप्रिया सुळेंची नक्कल, म्हणाले...
भोरमधील सभेत अजित पवारांकडून सुप्रिया सुळेंची नक्कल, म्हणाले....
मोरा सारखे नाचणारे मित्र पाहिले पण... मोर नाचताना तुम्ही पाहिलं का?
मोरा सारखे नाचणारे मित्र पाहिले पण... मोर नाचताना तुम्ही पाहिलं का?.
राजीनाम्यानंतर नसीम खान एमआयएम, वंचित की महायुतीत जाणार?
राजीनाम्यानंतर नसीम खान एमआयएम, वंचित की महायुतीत जाणार?.
कांदा निर्यातीबाबत सरकारचे दुटप्पी धोरण, शेतकऱ्यांचा संताप
कांदा निर्यातीबाबत सरकारचे दुटप्पी धोरण, शेतकऱ्यांचा संताप.
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.