बेरोजगार तरुणांचा अभिनव प्रयोग; एका दगडात दोन पक्षी, अनेकांना रोजगार आणि कोरोनावरही नियंत्रण

शहरातील बेरोजगार तरुणांनी ग्रुट फाऊंडेशनच्या नावाखाली एक अभिनव प्रयोग केला आहे. कोरोना महामारीच्या काळात संसर्गाला थोपवता यावे म्हणून मास्कचे उत्पादन आणि वितरणाचा प्रयोग त्यांनी यशस्वी करुन दाखवला आहे.

बेरोजगार तरुणांचा अभिनव प्रयोग; एका दगडात दोन पक्षी, अनेकांना रोजगार आणि कोरोनावरही नियंत्रण


सोलापूर : शहरातील बेरोजगार तरुणांनी ग्रुट फाऊंडेशनच्या नावाखाली एक अभिनव प्रयोग केला आहे. कोरोना महामारीच्या काळात संसर्गाला थोपवता यावे म्हणून मास्कचे उत्पादन आणि वितरणाचा प्रयोग त्यांनी यशस्वी करुन दाखवला आहे. यासोबतच लॉकडाऊनच्या काळात बेरोजगार कामगारांच्या हाताला त्यांनी कामही दिले आहे. ग्रुट फाऊंडेशनच्या या अभिनव उपक्रमाची सर्व स्तरातून वाहवा होत आहे. (distribution of mask by Groot Foundation for preventing corona infection )

राज्यात कोरोना संक्रमाणामुळे कित्येक नागरिकांचा मृत्यू झाला. लॉकडाऊनमुळे उद्योगधंदे बंद झाल्यामुळे कित्येकांचे रोजगार गेले. अशा परिस्थितीत सोलापूरसारख्या शहरात कोरोनाचा संसर्ग आणि बेराजगारी असे प्रश्न गंभीर बनत चालले होते. या सर्व गोष्टी पाहता शहरातील ग्रुट फाऊंडेशने अभिनव उपक्रम राबवला. त्यांनी एकत्र येत सोलापुरातल्या एमआयडीसी भागातल्या कामगारांना जमा केले. त्यांना चांगल्या दर्जाचे मास्क तयार करण्याचे प्रशिक्षण देऊन मास्कचे उत्पादनही सुरु केले.

त्यांच्या या प्रयोगामुळे बेरोजगारीच्या सावटाखाली जगणाऱ्या कित्येक कामगारांना रोजगार मिळाला. त्यानंतर ग्रुट फाऊंडेशनने तयार केलेले मास्क समाजातील गरजूंना वाटले. सोलापुरात ज्या ठिकाणी गर्दी होते अशा चहाच्या टपऱ्या, पेट्रोल पंप, बाजारपेठ अशा जागी या तरुणांनी मास्क वाटले. त्यामुळे दोन गोष्टी साध्या झाल्या. एक म्हणजे कामगारांना रोजगारही मिळाला; आणि दुसरी गोष्ट म्हणजे गरजूंना मास्क वाटप केल्यामुळे कोरोना संक्रमणावर आळाही बसला.

मास्कसोबतच सॅनिटायझर, पीपीई कीट, मास्कचेही वितरण

मास्क वाटताना या तरुणांना अनेक अडचणी समजल्या. जे नागरिक शारीरिक कष्टाचं काम करतात, ज्यांना अस्थमा किंवा इतर श्वसनाचे आजार आहेत. ते मास्क घालायला टाळाटाळ करातात. हॉटेल, कारखाने अशा ठिकाणी मास्क वापरताना मास्कमुळे धाप लागते, कान दुखतात, चश्म्यावर वाफ जमा होते, खूप घाम येतो अशा अनेक तक्रारी लोक करत होते. त्यावर उपाय म्हणून त्यानी प्रत्येक अडचीसाठी वेगळ्या डिझाईनचा मास्क बनवला आणि तो नागरिकांत वितरित केला.
दरम्यान, त्यांच्या या उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी इतरही गोष्टींचे उत्पादन आणि वितरण करण्याचे ठरवले. या तरुणांनी सॅनिटायसर ,पीपीई किट, मास्क डिस्पेंसर मशिन, अशा अनेक गोष्टींचे वितरण सुरु केले आहे. समाजात योग्य पद्धतीनं वितरण करुन शक्य तितका रोजगार निर्माण करण्याचा प्रयत्न या करुणांनी केला आहे. दरम्यान ग्रुट फाऊंडेशनच्या या उपक्रमाचे काँग्रेसनेते पृथ्वीराज चव्हाण, अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांनीदेखील प्रशंसा केली आहे.

संबंधित बातम्या :

25 हजार रुग्णांवर यशस्वी उपचार करणाऱ्या कोरोना योद्ध्यांची आयुक्तांसोबत दिवाळी

Nanded | प्रदुषणामुळे कोरोना वाढण्याची भीती, नागरिकांची फटाके खरेदीकडे पाठ

(distribution of mask by Groot Foundation for preventing corona infection )

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI