Morning Thoughts : रोज सकाळी करा ‘या’ 5 गोष्टी, दिवसभर राहाल सकारात्मक
फक्त पॉझिटिव्ह विचार केल्याने मानसिकच नाही तर शारीरिक आजारांवरही मात करता येई शकते.

गेल्या काही दिवसांमध्ये अशा अनेक घटना जगभरातून समोर आल्या ज्याचा विचार जरी केला तरी खचून जायला होतं. पण या सगळ्यातून मार्ग काढत सकारात्मकता हिच सगळ्यात आरोग्यदायी आहे. फक्त पॉझिटिव्ह विचार केल्याने मानसिकच नाही तर शारीरिक आजारांवरही मात करता येई शकते. (Do 5 things every morning and stay positive throughout the day)
बाहरेच्या जगातही अनेक पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह गोष्टी घडत असतात. पण त्यातून योग्य ती शिकवण घेत प्रत्येकानं मोठ्या जिद्दीने उभं राहायला हवं. कोरोनासारख्या या कठीण काळात आरोग्याचा विचार करून सुंदर आणि चांगल्या विचारांनीच दिवस घालवायला हवा. अशात आम्ही तुम्हाला अशा पाच गोष्टी सांगणार आहोत, ज्याच्या विचारांनी तुमचा संपूर्ण दिवस सकारात्मक जाईल.
1. प्रत्येक जण झोपेत आपल्या उज्जव आणि आरोग्यदायी भविष्याचा विचार करत असतो. पण याच विचारांसोबत उठून दिवसाला सुरूवात करायची की हा विचार फक्त स्वप्नात करायचा हे प्रत्येकाच्या हातात आहे. त्यामुळे रोज सकाळी उठल्यावर आपल्या आरोग्याची काळजी घेत उज्जव भविष्यासाठी प्रयत्न करा.
2. एका सुंदर दिवसाची सुरूवात करण्यासाठी चेहऱ्यावर नेहमी हसू असुद्या. एखादी सकारात्मक प्रार्थना म्हणा ज्याने तुम्हाला आणखी बळ मिळेल.
3. रोज पहाटे उठल्यानंतर संपूर्ण विश्वाला धन्यवाद म्हणायला विसरू नका. आपल्या आयुष्यात आणखी एक दिवस दिल्याने सगळ्यांना आभार मानले की संपूर्ण दिवस सकारात्मक असेल.
4. रोज पहाटे उठलं की किमान 10 मिनिटं चाला. यावेळी एकादं आवडचं आणि प्रेरणा देणारं गाण ऐकलं तर दिवस अगदी मजेत जाईल. याने शरीरही दिवसभर अॅक्टिव्ह राहतं.
5. रोज पहाटे उठलात की प्राणायम करण्यासाठी विसरू नका. याने आपलं मानसिक आणि शारीरिक बळ वाढतं. त्याचबरोबर दिवसभर पाणी आणि जेवणाची काळजी घ्या. एका आरोग्यदायी आयुष्यासाठी आणखी काय हवं!
इतर बातम्या –
हिवाळ्यात पाण्याकडे अजिबात नका करू दुर्लक्ष, गंभीर आजारांवरही असा आहे फायदा
बापरे! 9 महिन्याची गर्भवती महिला 5 मिनिटांत 1.6 किमी धावली, VIDEO पाहून हादराल
(Do 5 things every morning and stay positive throughout the day)
