US Election | ट्रम्प समर्थक मतमोजणीच्या मागणीसाठी पुन्हा रस्त्यावर, वॉशिंग्टनमध्ये बायडन- ट्रम्प समर्थकांमध्ये बाचाबाची

शनिवारी डोनाल्ड ट्रम्प समर्थक पुन्हा एकदा मतमोजणी करण्याची मागणी करत रस्त्यांवर उतरले होते. (Donald Trump supporters gathered at roads for demand of recounting)

US Election | ट्रम्प समर्थक मतमोजणीच्या मागणीसाठी पुन्हा रस्त्यावर, वॉशिंग्टनमध्ये बायडन- ट्रम्प समर्थकांमध्ये बाचाबाची
Follow us
| Updated on: Nov 15, 2020 | 4:32 PM

वॉशिंग्टन : अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत जो बायडन यांनी डोनाल्ड ट्रम्प यांचा पराभव केला आहे. मात्र, डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांचे समर्थक पराभव स्वीकारायला तयार नसल्याचे चित्र आहे. शनिवारी डोनाल्ड ट्रम्प समर्थक पुन्हा एकदा मतमोजणी करण्याची मागणी करत रस्त्यांवर उतरले होते. वॉशिग्टन शहरामध्ये ट्रम्प समर्थकांनी जोरदार निदर्शने केली. (Donald Trump supporters gathered at roads for demand of recounting)

डोनाल्ड ट्रम्प यांनी निवडणुकीतील मतमोजणीच्या सुरुवातीपासूनच फ्रॉड झाल्याचा आरोप केला होता. ट्रम्प सातत्यानं वेगवेगळे आरोप करत आलेले आहेत. शनिवारी वॉशिग्टनमध्ये मोठ्या प्रमाणावर ट्रम्प समर्थक रस्त्यांवर उतरले होते. निदर्शनादरम्यान त्यांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्या नावाचा जयघोष केला. यावेळी ट्रम्प समर्थकांनी राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत हेराफेरी झाल्याचा आरोप केला. सर्व ठिकाणी पुन्हा एकदा मतमोजणी व्हावी, अशी मागणी ट्रम्प समर्थकांनी केली. यावेळी डोनाल्ड ट्रम्प समर्थक आणि पोलिसांमध्ये बाचाबाची झाली.

शनिवारीच डोनाल्ड ट्रम्प समर्थक आणि जो बायडन समर्थक यांच्यामध्ये बाचाबाची झाली. दोन्ही नेत्यांच्या समर्थकांनी यावेळी जोरदार घोषणाबाजी केली. पोलिसांनी हस्तक्षेप करत दोन्ही बाजूच्या समर्थकांना शांत करण्याचा प्रयत्न केला. याघटनेमध्ये दोन्ही नेत्यांच्या समर्थक जखमी झाले. हा सर्व प्रकार अमेरिकेच्या अध्यक्षांचे निवासस्थान व्हाईट हाऊस जवळ झाला. त्यामुळे पोलिसांनी बंदोबस्त वाढवण्याचा निर्णय घेतला.

दरम्यान, अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत जो बायडन यांनी विद्यमान अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पराभव केला. जो बायडन यांना 306 तर ट्रम्प यांना 232 इलेक्ट्रोल व्होटस मिळाले आहेत. 20 जानेवारी 2021 ला जो बायडन यांचा शपथविधी होणार असून तोपर्यंत डोनाल्ड ट्रम्प अध्यक्षपदावर कायम राहतील.  जो बायडन डेमोक्रॅटिक तर डोनाल्ड ट्रम्प यांनी रिपब्लिककडून निवडणूक लढवली होती.

8 डिसेंबरपर्यंत मतमोजणी

अमेरिकेतील विविध राज्यांमध्ये 8 डिसेंबरपर्यंत मतमोजणी सुरु राहणार आहे. यावर्षी मतमोजणी प्रक्रियेला अनेक ठिकाणी मतमोजणी प्रक्रियेला कायदेशीर आव्हान देण्यात आले आहे. 538 इलेक्ट्रोल कॉलेजचे निकाल तयार केले जातील त्यानंतर ते अधिकृत रित्या अमेरिकेच्या काँग्रेसकडे सोपवले जातील.

अधिकृतपणे निकालांची घोषणा अमेरिकेच्या काँग्रेसचे अधिवेशन येत्या जानेवारी महिन्यात 6 तारखेला आयोजित केले जाईल. विद्यमान उपराष्ट्राध्यक्ष माईक पेन्स अधिकृतपणे निवडणुकीचे निकालांची घोषणा करतील.

अमेरिकेच्या अध्यक्षपदाची निवडणूक अत्यंत चुरशीची पाहायला मिळाली. विद्यमान अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि जो बायडन यांनी प्रचार अभियान जोरदार राबवले. 3 नोव्हेंबरला मतदान झाल्यानंतर तीन दिवस मतमोजणी झाल्यानंतर जो बायडन यांनी विजयासाठी आवश्यक असणारी संख्या 270 पार केली. आतापर्यंतच्या माहितीनुसार जो बायडन यांना 306 इलेक्ट्रोल वोटस तर डोनाल्ड ट्रम्प यांना 232 वोट मिळाले आहेत.

संबंधित बातम्या :

US Election 2020 | जो बायडन यांचा 20 जानेवारीला शपथविधी, अमेरिकेत मतमोजणी सुरुच

US Election 2020: ‘मेलानिया लवकरच डोनाल्ड ट्रम्प यांना घटस्फोट देणार’, माजी सहकाऱ्याचा दावा

Non Stop LIVE Update
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.