AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मराठा समाजासाठी सरकारचा मोठा निर्णय, जरांगेंच्या उपोषणानंतर थेट आदेश, ते टेन्शनच मिटलं!

राज्यातील मराठा समाजासाठी मोठी बातमी आहे. मराठा आरक्षणाच्या आंदोलना दरम्यान मृत्यू झालेल्या आंदोलकांच्या वारसांना आता एमआयडीसीमध्ये देखील नोकरी मिळणार आहे. सामान्य प्रशासन विभागाकडून याबाबतचा शासन निर्णय जारी करण्यात आला आहे.

मराठा समाजासाठी सरकारचा मोठा निर्णय, जरांगेंच्या उपोषणानंतर थेट आदेश, ते टेन्शनच मिटलं!
CM Fadnavis and Manoj Jarange PatilImage Credit source: Google
| Updated on: Jun 01, 2026 | 10:30 PM
Share

राज्यातील मराठा समाजासाठी मोठी बातमी आहे. मराठा आरक्षणाच्या आंदोलना दरम्यान मृत्यू झालेल्या आंदोलकांच्या वारसांना आता एमआयडीसीमध्ये देखील नोकरी मिळणार आहे. सामान्य प्रशासन विभागाकडून याबाबतचा शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. मराठा आरक्षण आंदोलनात मृत्यू झालेल्या आंदोलकांच्या वारसांची पडताळणी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मृत आंदोलकांच्या पात्र वारसांची पडताळणी करून त्यांना प्रमाणपत्र देण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. या प्रमाणपत्राच्या आधारे पात्र वारसांना MIDC मध्ये अनुकंपा तत्त्वावर नोकरी देण्यात येणार आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

जरांगे पाटलांनी केली होती मागणी

काही दिवसांपूर्वी मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाच्या मागणीसाठी उपोषण सुरू केले होते. या उपोषणानंतर सरकारने वेगाने हालचाली करत जरांगे पाटलांच्या मागण्या मान्य केल्या होत्या. त्यानंतर मध्यरात्री जरांगे पाटलांना उपोषण सोडले होते. जरांगे यांनी मराठा आरक्षणासाठी लढा देताना मृत्यू झालेल्यांच्या वारसांना एमआयडीसीमध्ये नोकऱ्या देण्याची मागणी केली होती. त्यानंतर आता सरकारने तातडीने पावले उचलत याबाबत निर्णय घेतला आहे.

सामान्य प्रशासन विभागाकडून आदेश जारी

मराठा आरक्षणामध्ये मृत्यू पावलेल्या आंदोलकांच्या वारसांना आता मोठा दिलासा मिळाला आहे. मराठा समाजासाठी फडणवीस सरकारचा मोठा निर्णय घेतला आहे. एसटीच्या धर्तीवर आता एमआयडीसीमध्ये देखील वारसांना नोकरी मिळणार आहे. सामान्य प्रशासन विभागाकडून शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांनी मनोज जरांगे पाटील यांना याबाबत आश्वासन दिले होते, त्यानंतर आता दोनच दिवसात अध्यादेश काढण्यात आला आहे.

मराठा आरक्षण आंदोलनात मृत्यू झालेल्या आंदोलकांच्या वारसांची पडताळणी करण्याचे आदेश सर्व जिल्हाधिकाऱ्यांना सामान्य प्रशासन विभागाकडून देण्यात आले आहेत. मृत आंदोलकांच्या पात्र वारसांची पडताळणी करून त्यांना प्रमाणपत्र देण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. या प्रमाणपत्राच्या आधारे पात्र वारसांना MIDC मध्ये अनुकंपा तत्त्वावर नोकरी देण्यात येणार आहे. मराठा आरक्षण आंदोलनातील मृत आंदोलकांच्या कुटुंबियांना दिलासा देण्याच्या दृष्टीने राज्य सरकारची ही महत्त्वाची कार्यवाही मानली जात आहे.

Follow Us
डान्समध्ये गौतमीला टक्कर देणाऱ्या ऐश्वर्याला मोठा धक्का, पोलिसांनी थेट
Aishwarya Jadhav Dancer | डान्समध्ये गौतमीला टक्कर देणाऱ्या ऐश्वर्याला मोठा धक्का, पोलिसांनी थेट...
दहीहंडीतील लावणी भोवली! नृत्यांगणा राधा पाटीलसह आयोजकांवर गुन्हा दाखल
Dancer Radha Patil News | पुण्यात दहीहंडीतील लावणी भोवली! नृत्यांगणा राधा पाटीलसह आयोजकांवर गुन्हा दाखल
बारामतीत पवार विरुद्ध पवार! सुनेत्रा पवारांसमोर युगेंद्र पवारांचं...
Baramati | बारामतीत पवार विरुद्ध पवार! सुनेत्रा पवारांसमोर युगेंद्र पवारांचं स्वतंत्र पॅनल; सोमेश्वर कारखान्याची निवडणूक रंगणार
विशाखा राऊतांचं नगरसेवकपद रद्द! कारवाईनंतर पहिली प्रतिक्रिया आली समोर
Vishakha Raut | विशाखा राऊतांचं नगरसेवकपद रद्द! कारवाईनंतर पहिली प्रतिक्रिया आली समोर
...तर 10 मिनिटांत महाराष्ट्र बंद पाडला पाहिजे! जरांगेंचा सरकारला इशारा
...तर 10 मिनिटांत महाराष्ट्र बंद पाडला पाहिजे! जरांगेंचा सरकारला कडक इशारा
20-22 दिवसांपासून पाऊस गायब, सोयाबीनवर येलो मोझॅकचा कहर!
Nanded | 20-22 दिवसांपासून पाऊस गायब, सोयाबीनवर येलो मोझॅकचा कहर! नांदेडमध्ये हजारो एकर पीक धोक्यात
तू तुझं तुझं बघ ना! सदावर्तेंच्या मागणीला अंबादास दानवेंचं परखड उत्तर
Ambadas Danve On Gunaratna Sadavarte | तू तुझं तुझं बघ ना! बाळासाहेब ठाकरेंच्या फोटोवरून सदावर्तेंच्या मागणीला अंबादास दानवेंचं परखड उत्तर, पुढे म्हणाले...
ठाकरे गटाला मोठा धक्का बसणार! विकासकामांसाठी... त्या बड्या नेत्याने...
ठाकरे गटाला मोठा धक्का बसणार! विकासकामांसाठी अनेक जण आमच्याशी संपर्कात, त्या बड्या नेत्याने सगळंच सांगितलं
अजित दादांचं काय झालं? जरांगे पाटलांनी उपस्थित केला थेट सवाल...
Manoj Jarange | अजित दादांचं काय झालं? जरांगे पाटलांनी उपस्थित केला थेट सवाल, पुढे म्हणाले...
सप्टेंबरमध्ये पावसाऐवजी सूर्य आग ओकतोय! सोयाबीन माना टाकू लागलं
Amravati | सप्टेंबरमध्ये पावसाऐवजी सूर्य आग ओकतोय! अमरावतीत सोयाबीन माना टाकू लागलं; शेतकरी संकटात