बंगालची लढाई पुन्हा, ममता विरुद्ध ‘बाहरी’? काय काय घडतंय?

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या ताफ्यावर झालेल्या हल्ल्याची पश्चिम बंगालच्या राज्यपालांनी गंभीरपणे दखल घेतली आहे.

बंगालची लढाई पुन्हा, ममता विरुद्ध 'बाहरी'? काय काय घडतंय?

कोलकाता : भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या ताफ्यावर झालेल्या हल्ल्याची पश्चिम बंगालच्या राज्यपालांनी गंभीरपणे दखल घेतली आहे. याबाबत बोलताना प. बंगालचे राज्यपाल जगदीप धनखड यांनी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना खडे बोल सुनावले आहेत. तसेच ‘आगीशी खेळू नका’, असा सल्लादेखील त्यांनी मुख्यमंत्री बॅनर्जी यांना दिला आहे. (Don’t play with Fire, Bengal Governor Jagdeep Dhankar warned Mamata Banerjee)

राज्यपाल धनखड म्हणाले की, “ममता बॅनर्जी यांनी भारतीय संविधान, कायदा आणि सूव्यवस्था तसेच बंगालच्या संस्कृतीचं पालन करायला हवं. मी या देशाच्या संविधानाची शपथ घेतली आहे, त्याचप्रमाणे तुम्हीदेखील (ममता) शपथ घेतली आहे. आपण दोघेही संविधानाचे पालन करण्यास वचनबद्ध आहोत, जर तुम्ही तुमचं कर्तव्य विसरत असाल, तुम्ही तुमच्या कर्तव्यापासून दूर गेलात तर तिथून माझी जबाबदारी सुरू होते”.

जे. पी. नड्डा यांच्या ताफ्यावर झालेल्या हल्ल्याची केंद्र सरकारने त्वरीत गंभीरपणे दखल घेतली. घटनेची माहिती मिळताच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी स्वत: या हल्ल्याचा निषेध नोंदवला, तसेच पश्चिम बंगालच्या राज्यापालांना याबाबतचा रिपोर्ट पाठवण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार या घटनेबाबत राज्यपालांनी केंद्रीय गृह मंत्रालयाला रिपोर्ट दिला आहे. केंद्राने याबाबत म्हटले आहे की, आम्हाला काही ब्युरोक्रॅट्सना संदेश द्यायचा आहे की, ते राजकीय पक्षासाठी काम करत आहेत, तसे न करता त्यांनी स्वतःच्या जबाबदाऱ्या पार पाडाव्या.

जे. पी. नड्डा यांच्यावर झालेल्या हल्ल्यानंतर केंद्र सरकारने राज्यपाल जगदीप धनखड यांच्यासह बंगालचे डीजीपी आणि मुख्य सचिवांना राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेबाबतचा अहवाल पाठवण्याचे आदेश दिले होते. पश्चिम बंगालमधील दक्षिण 24 परगण्यात गुरुवारी टीएमसी आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये तुंबळ हाणामारी झाली होती. यावेळी टीएमसी कार्यकर्त्यांनी नड्डा यांचा ताफा रोखण्याचा प्रयत्न केला आणि दगडफेक केल्याचा आरोप भाजपचे प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष यांच्यासह सर्वच भाजप नेत्यांनी केला आहे.

बंगालमध्ये विरोधी पक्षासाठी जागा नाही : राज्यपाल

डायमंड हार्बर येथे गुरुवारी झालेल्या घटनेप्रकरणी आज राज्यपाल जगदीप धनखड यांनी पत्रकार परिषद घेतली. धनखड यांनी यावेळी बंगालमधील कायदा आणि सूव्यवस्थेबाबत चिंता व्यक्त केली. तसेच ते म्हणाले की, “बंगालमध्ये आता विरोधी पक्षासाठी जागा शिल्लक राहिलेली नाही”.

नड्डा यांच्या ताफ्यावर झालेल्या हल्ल्यानंतर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी बाहेरुन आलेल्यांबाबतचे (ममता यांनी ‘बाहरी लोग’ असा उल्लेख केला होता) वक्तव्य केले होते. याचा राज्यपालांनी खरपूस समाचार घेतला. राज्यपाल म्हणाले की, “इथे बाहेरचे लोक कोण आहेत? तुम्ही जे वक्तव्य केले त्याचा नेमका अर्थ काय होतो? भारतीय नागरिक बाहेरुन आले आहेत का? ममता बॅनर्जी यांनी अशा प्रकारची वक्तव्ये करायला नकोत. मुख्यमंत्र्यांनी आगीशी खेळू नये. त्यांनी संविधानाचं पालन करायला हवं”.

सुरक्षा असतानाही हल्ला झालाच कसा?: ममता

नड्डा यांच्यावरील हल्ला ही नौटंकी असल्याची टीका मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केली आहे. बीएसएफ आणि सीआरपीएफचे जवान सुरक्षेसाठी तैनात असताना नड्डा यांच्यावर हल्ला होईलच कसा? असा सवाल करतानाच या हल्ल्याचे व्हिडीओ भाजपने तयार केलेच कसे? असा सवालही ममता बॅनर्जी यांनी केला आहे. भाजपच्या रॅलीला लोकांचा प्रतिसाद मिळत नाही. त्यामुळे लोकांना रॅलीमध्ये खेचून आणण्यासाठीच हल्ल्याची योजना केल्याचा आरोपही त्यांनी केला. तसेच शेतकरी आंदोलनावरून लक्ष विचलीत करण्याचा भाजपचा हा डाव असल्याचा दावाही त्यांनी केला आहे.

राष्ट्रपती राजवट लागू करा: रॉय

या हल्ल्यानंतर भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष मुकुल रॉय यांनी पश्चिम बंगालमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केली आहे. सध्याची परिस्थिती पाहता राज्यात तात्काळ राष्ट्रपती राजवट लागू केली पाहिजे, अशी मागणी रॉय यांनी केली आहे.

अत्याचार, अराजकता, अंधकाराचं युग: शहा

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी या घटनेचा तीव्र शब्दात निषेध नोंदवला आहे. बंगालमध्ये जेपी नड्डा यांच्यावर झालेला हल्ला अत्यंत निंदनीय आहे. या हल्ल्याचा निषेध करावा तेवढा कमीच आहे. केंद्र सरकारने या हल्ल्याची गंभीरपणे दखल घेतली आहे. बंगाल सरकारला या प्रायोजित हिंसेचं राज्यातील शांतताप्रिय जनतेला उत्तर द्यावंच लागणार आहे, असं शहा यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांनी अत्याचार, अंधकार आणि अराजकतेचं युग आणलं आहे, अशी टीकाही शहा यांनी केली.

संबंधित बातम्या

जेपी नड्डांवरील हल्ल्याचे पडसाद, भाजपचा मुंबईत रास्तारोको; राज्यभर आंदोलनाचा इशारा

प. बंगालमध्ये आम्ही 200 हून अधिक जागा जिंकू; जेपी नड्डा यांचा दावा

(Don’t play with Fire, Bengal Governor Jagdeep Dhankar warned Mamata Banerjee)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI