डॉ. शीतल आमटेंची कुत्र्यांसाठी मागवलेलं इंजेक्शन वापरुन आत्महत्या?

डॉ. शीतल आमटे यांनी कुत्र्यांना देण्यासाठी नागपूरमधील फार्मसिस्टकडून मागवलेली इंजेक्शन्स पोलिसांना मृतदेहाजवळ सापडली

डॉ. शीतल आमटेंची कुत्र्यांसाठी मागवलेलं इंजेक्शन वापरुन आत्महत्या?


चंद्रपूर : महारोगी सेवा समितीच्या सीईओ आणि सामाजिक कार्यकर्त्या डॉ. शीतल आमटे (Dr Sheetal Amte Karjagi) यांनी कुत्र्यांसाठी मागवलेलं इंजेक्शन वापरुन आत्महत्या केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. पोलिसांनी नागपूरमधील फार्मसिस्टच्या केलेल्या चौकशीत महत्त्वाची माहिती उघड झाली आहे. शीतल आमटेंनी मागवलेल्या इंजेक्शन्सपैकी एक त्यांच्या मृतदेहाजवळ तुटलेल्या अवस्थेत मिळालेले होते. (Dr Sheetal Amte Karjagi allegedly committed suicide by injecting poisonous injection ordered for dogs)

डॉ. शीतल आमटे यांनी कुत्र्यांना देण्यासाठी नागपूरमधील फार्मसिस्टकडून इंजेक्शन्स मागवली होती. ही इंजेक्शन्स अ‍ॅनेस्थेशिया श्रेणीतील आहेत. शीतल यांनी मागवलेल्या पाच इंजेक्शन्सपैकी एक शीतल यांच्या मृतदेहाजवळ तुटलेल्या अवस्थेत मिळालेले होते. त्यामुळे आता पोलिसांचा तपास या इंजेक्शनवर केंद्रित झाला आहे.

डॉ. शीतल आमटे आत्महत्या प्रकरणात पोलीस आता दोन गोष्टींचा तपास करणार आहेत. कुत्र्यांसाठी मागवलेले हे इंजेक्शन घेतल्याने माणसाचा मृत्यू होतो का आणि ते किती प्रमाणात घ्यावं लागतं, शीतल आमटे यांच्या व्हिसेरा अहवालात या इंजेक्शनचे अंश सापडतात का? याकडे पोलिसांनी लक्ष केंद्रित केलं आहे.

आत्महत्येसाठी वापरलेले विष अत्यंत घातक

शीतल आमटे यांनी आत्महत्येसाठी वापरलेली इंजेक्शन्स त्यांच्या कक्षात आढळून आली होती. शीतल यांनी आत्महत्येसाठी नेमके कोणते विषारी रसायन वापरले याचा तपास पोलीस करत आहेत. याबाबतचा रासायनिक अहवाल आल्यानंतरच हे स्पष्ट होणार आहे. दरम्यान, डॉ. शीतल यांनी आत्महत्यासाठी वापरलेले विष हे अत्यंत घातक आणि उच्च गुणवत्तेचे असल्याची सूत्रांची माहिती आहे. हे विष त्यांनी कुठून मिळवले, याचा तपास करण्याचे पोलिसांपुढे आव्हान आहे.

गॅझेट्सना आय पासवर्ड, पतीलासुद्धा कल्पना नाही

दरम्यान, डॉ. शीतल आमटे यांचा लॅपटॉप, मोबाईल, टॅब तसेच इतर गॅझेट्स पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत. डॉ. शीतल यांनी त्यांच्या या गॅझेट्सचे पासवर्ड नुकतेच बदलल्याची माहिती आहे. विशेष म्हणजे बदललेल्या पासवर्डबद्दल त्यांचे पती गौतम करजगी यांनादेखील कल्पना नाही. यातील काही गॅझेट्सना सॉफ्टवेअर लॉक आहे. तर काही गॅझेट्सना त्यांनी स्वत:च्या डोळ्यांचे पासवर्ड ठेवले होते. त्यामुळे ताब्यात घेतलेला टॅब, लॅपटॉप, आणि मोबाईल उघडण्यास अडचणी निर्माण होत आहेत.

परिणामी या प्रकरणाचा तपास करण्यास, त्यांच्या मृत्यूमागचे नेमके कारण शोधण्यास अडचणी येत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, हे सर्व गॅझेट्स नागपूरच्या फॉरेन्सिक पथकाने मुंबईतील आयटी (IT) तज्ज्ञांकडे पाठवले आहेत. या गॅझेट्सच्या साहाय्याने डॉ. शीतल यांच्या आत्महत्येचे नेमके कारण शोधण्यास मादत होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

ज्येष्ठ समाजसेवक स्वर्गीय बाबा आमटे यांची नात आणि वरोरा येथील महारोगी सेवा समितीच्या सीईओ डॉ. शीतल आमटे-करजगी यांनी 30 नोव्हेंबरला आत्महत्या केली. त्यांनी आनंदवन येथील आपल्या राहत्या घरी विषारी इंजेक्शन टोचून आयुष्य संपवलं. आनंदवनमध्येच ही धक्कादायक घटना घडल्याने सामाजिक वर्तुळ हादरलं आहे. (Dr Sheetal Amte Karjagi allegedly committed suicide by injecting poisonous injection ordered for dogs)

आमटे कुटुंब दुःखात

शीतल आमटे करजगी यांच्या आत्महत्येनंतर त्यांच्या सासूबाई सुहासिनी करजगी आणि सासरे शिरीष करजगी यांनी फेसबुक पोस्टवरुन आमटे कुटुंबाला काही प्रश्न विचारले होते. मात्र ती पोस्ट नंतर डिलीट करण्यात आली. त्यावर सध्या बोलून काही उपयोग नाही. करजगी परिवार-आमटे परिवार सर्वच दुःखात आहेत. त्यांनी आपलं दुःख व्यक्त केलं असेल, पण सध्या तरी शीतल यांच्या आत्म्याला शांती देण्यासाठी सहकार्य करावं” असं आवाहन शीतल यांच्या भावजय पल्लवी कौस्तुभ आमटे यांनी केलं आहे.

“आनंदवन कोण चालवणार यावर सध्या काहीच बोलू शकत नाही. इतक्या लवकर या निर्णयाची अपेक्षा करणं चुकीचं आहे. आम्हाला वेळ द्या, विचारांची दिशा योग्य पद्धतीने जाण्यासाठी वेळ लागेल. काळच एक-एका प्रश्नाचं उत्तर देईल” अशी प्रतिक्रियाही त्यांनी दिली.

संबंधित बातम्या :

शीतल आमटेंच्या सासू-सासऱ्यांच्या आरोपांनंतर भावजय पल्लवी कौस्तुभ आमटेंनी मौन सोडलं!

डॉ. शीतल आमटे आत्महत्या : मोबाईल, लॅपटॉपला Eye पासवर्ड; चौकशी करायची कशी?

आमटे कुटुंबात नेमका वाद कोणता; डॉ. शीतल आमटे-कराजगींनी का उचललं टोकाचं पाऊल?

(Dr Sheetal Amte Karjagi allegedly committed suicide by injecting poisonous injection ordered for dogs)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI