बॉडीगार्डसोबत रिलेशनशीप, दुबई शासकाच्या पत्नीकडून लपवाछपवीसाठी 12 कोटी?

राजकुमारी हया या दुबईचे शासक शेख मोहम्मद बिन राशिद अल मकतूम यांची सहावी पत्नी, त्यांचा घटस्फोट झाला आहे

बॉडीगार्डसोबत रिलेशनशीप, दुबई शासकाच्या पत्नीकडून लपवाछपवीसाठी 12 कोटी?
Follow us
| Updated on: Nov 21, 2020 | 4:05 PM

दुबई : दुबईचे शासक शेख मोहम्मद बिन राशिद अल मकतूम (Sheikh Mohammed bin Rashid Al Maktoum) यांच्या पत्नीचे अंगरक्षकाशी संबंध होते, असा धक्कादायक आरोप केला जात आहे. प्रिन्सेस हया (Princess Haya) यांनी बॉडीगार्डला त्यांच्या नात्याबाबत गप्प राहण्यासाठी 12 लाख युरो म्हणजेच अंदाजे 12 कोटी रुपये दिल्याचा दावा केला जात आहे. ‘डेली मेल’ने ब्रिटिश कोर्टाच्या सुनावणीच्या आधारे हा दावा केला आहे. दुबईच्या राज्यकर्त्याने राजकुमारी हया यांना न कळवताच शरिया कायद्या अंतर्गत फेब्रुवारी 2019 मध्ये घटस्फोट दिला होता. (Dubai ruler’s wife Princess Haya allegedly paid bodyguard lover £1.2m to keep their affair quiet)

राजकुमारी हया आपल्या बॉडीगार्ड रसेल फ्लॉवर्सला (Russell Flowers) खूप महागड्या भेटवस्तू देत असत. ज्यामध्ये 12 लाखांचे घड्याळ आणि 50 लाखांच्या बंदुकीचा समावेश होता. राजकुमारी हया या दुबईचे शासक शेख मोहम्मद बिन राशिद अल मकतूम यांची सहावी आणि सर्वात लहान पत्नी होत्या. 2016 मध्ये अंगरक्षक रसेल राजकुमारी हया यांच्यासाठी पूर्ण वेळ काम करायला लागल्यानंतर हे अफेअर सुरु झाल्याचं बोललं जातं.

राजकुमारी हया यांचा अंगरक्षक विवाहित होता. पण या कथित अफेअरमुळे त्याचेही लग्न मोडले. हया यांनी आधीच दुबई सोडली असून गेल्या काही काळापासून त्या ब्रिटनमध्ये राहत आहे. घटस्फोटानंतर मुलांचा ताबा मिळवण्याबाबत राजकुमारी हयावर यांनी यूकेच्या कोर्टात खटला दाखल केला होता आणि त्याचा निकाल हया यांच्या बाजूने लागला.

46 वर्षीय हया यांचे 37 वर्षीय ब्रिटीश वंशाचा अंगरक्षक रसेल फ्लॉवरसोबत असलेले अफेअर जवळपास 2 वर्षे टिकले. रसेलशी असलेले संबंध गुप्त ठेवण्यासाठी हया यांनी अन्य तीन अंगरक्षकांनाही कोट्यवधी रुपये दिल्याचा दावा केला जात आहे.

अफेअर संपुष्टात आल्यानंतर राजकुमारी हया 2018 मध्ये दुबईहून पळून गेल्या आणि आता लंडनमध्ये राहत आहेत. त्यांना दोन मुलं आहेत. डेली मेलच्या अहवालानुसार बॉडीगार्ड रसेल फ्लॉवरशी संपर्क साधला असता त्याने प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. त्याचबरोबर, राजकन्या हया यांनीही रसेलशी संबंधित काही दाव्यांचा इन्कार केल्याचे समजते.

इतर बातम्या :

विश्वास बसणार नाही, पण अलास्कातील ‘या’ शहरात आता थेट 2021 मध्ये सूर्योदय होणार

अवघ्या 3 दिवसात संपूर्ण जगाची भटकंती, महिलेचा विक्रम, कोण आहेत ख्वाला-अल-रोमेथी?

ब्रिटनची राजकुमारी डायनाची खोटं बोलून मुलाखत घेतल्याचा आरोप, BBC स्वतंत्र चौकशी करणार

(Dubai ruler’s wife Princess Haya allegedly paid bodyguard lover £1.2m to keep their affair quiet)

Non Stop LIVE Update
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?.
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण.
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं.
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा.
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?.
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री.
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली.
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज.
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?.
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर.