ICICI Bank : ICICI बँकेनं दुसऱ्यांदा व्याजदरात केली वाढ, आता मुदत ठेवींमधून होणार अधिक कमाई

आयसीआयसीआय बँकेने या महिन्यात दुसऱ्यांदा मुदत ठेवींवरील व्याजदरात वाढ केली आहे. ज्या ग्राहकांना बँकेत एफडी करायची आहे, त्यांना पूर्वीपेक्षा अधिक नफा मिळेल

ICICI Bank : ICICI बँकेनं दुसऱ्यांदा व्याजदरात केली वाढ, आता मुदत ठेवींमधून होणार अधिक कमाई
Image Credit source: facebook
Follow us
| Updated on: Apr 22, 2022 | 1:19 PM

खासगी क्षेत्रातील आघाडीची बॅंक आयसीआयसीआय बँकेने (ICICI Bank) पुन्हा एकदा कोट्यवधी ग्राहकांना खुशखबर दिली आहे. आयसीआयसीआय बँकेने मुदत ठेवींवरील व्याजदरात (FD Interest Rates) वाढ केली आहे. दोन कोटी रुपयांपेक्षा अधिक आणि पाच कोटी रुपयांपेक्षा कमी रकमेच्या एफडीवरील (Fixed Deposit) व्याजदरात वाढ करण्यात आली आहे. नवे दर 21 एप्रिल 2022 रोजी पासून लागू झाले आहेत. बँकेच्या अधिकृत संकेतस्थळा नुसार, आयसीआयसीआय बँकेने अनेक मुदतीवरील व्याजदरात 5 ते 10 बेसिस पॉईंट्सची (Basis Points) वाढ केली आहे. यापूर्वी आयसीआयसीआय बँक 1 वर्ष आणि 15 महिन्यांपेक्षा कमी कालावधीच्या एफडीवर 4.25 टक्के व्याज देत होती, ती 4.30 टक्के करण्यात आली आहे. अशा प्रकारे मुदत ठेवींच्या व्याजदरात 5 बेसिस पॉईंट्सची वाढ करण्यात आली आहे.

पूर्वी बँक 15 महिने ते 18 महिन्यांपेक्षा कमी कालावधीत परिपक्व होणाऱ्या ठेवींवर 4.30 टक्के व्याजदर देत असे, पण आता ती 4.40 टक्के असेल. त्यात 10 बेसिस पॉइंट्सची वाढ झाली आहे. 18 महिने ते 2 वर्षांपर्यंतच्या परिपक्व ठेवींवरील व्याजदर 4.40 टक्क्यांवरून 4.50 टक्के करण्यात आला आहे. येथेही 10 बेसिस पॉइंटची भर पडली.

नवीन व्याज दर

2 वर्ष आणि एक दिवस ते 3 वर्षात परिपक्व होणाऱ्या मुदत वाढीवरील व्याजदर 4.60 टक्के आहे. 3 वर्ष, 1 दिवस ते 5 वर्षात मॅच्युअर होणाऱ्या एफडीवर 4.70 टक्के व्याज दिलं जाणार आहे. त्याचबरोबर 5 वर्षे 1 दिवस ते 10 वर्षांत परिपक्व होणाऱ्या एफडीचा व्याजदर 4.70 टक्के आहे.

आयसीआयसीआय बँक 2 कोटी आणि त्यापेक्षा अधिक पण 5 कोटी रुपयांपेक्षा कमी रकमेच्या ठेवींवर 7 ते 29 दिवसांत 2.50 टक्के व्याजदर देत आहे. 30 ते 60 दिवसांच्या मुदत ठेवींवर 2.75 टक्के व्याजदर असेल. 61 दिवस ते 90 दिवसांत मॅच्युअर होणाऱ्या एफडीवर आता 3 टक्के व्याज मिळणार आहे. आयसीआयसीआय बँक 91 ते 184 दिवसांत मुदत ठेवींवर 3.35 टक्के व्याजदर देत आहे.

185 दिवस ते 270 दिवसांपर्यंत मॅच्युअर होणाऱ्या ठेवींवर आयसीआयसीआय बँक 3.60 टक्के व्याज देत असून 271 दिवसांवरून एका वर्षापेक्षा कमी कालावधीत परिपक्व झाल्यास बँक 3.80 टक्के व्याजदरही देत आहे. या महिन्यात खासगी क्षेत्रातील बड्या बँका, एचडीएफसी बँक, कोटक महिंद्रा बँक आणि आयडीबीआय बँकेने मुदत ठेवींचे दर वाढवले आहेत.

विशेष मुदत ठेवीचा कालावधी वाढविला

आयसीआयसीआय बँकेने ज्येष्ठ नागरिकांसाठी गोल्डन इयर स्पेशल एफडी योजनेचा कालावधी वाढवला आहे. विशेष एफडी योजना 20 जानेवारी 2022 रोजी सुरू करण्यात आली होती आणि 8 एप्रिल 2022 रोजी बंद होत होती. आयसीआयसीआय बँकेने या योजनेला 7 ऑक्टोबर 2022 पर्यंत मुदतवाढ दिली आहे. सीनियर सिटिझन गोल्डन इयर्स एफडी योजनेत दोन कोटी रुपयांपेक्षा कमी रक्कम असलेल्या एफडींना अतिरिक्त व्याजदर मिळणार आहे.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.