Kapil Sharma: त्या निव्वळ अफवा… कपिल शर्माच्या घरावर फायरिंग नाहीच, मोठा ट्विस्ट; अमृतसरमध्ये काय घडतंय?
Kapil Sharma: प्रसिद्ध कॉमेडीयन कपिल शर्माच्या अमृतसर येथील घरावर गोळीबार झाला आहे. दोन अज्ञात व्यक्ती गाडीवर आले आणि त्यांनी कपिलच्या घरावर धाडधाड गोळ्या झाडण्यास सुरुवात केली.

प्रसिद्ध कॉमेडीयन कपिल शर्माच्या अमृतसर येथील घरावर गोळीबार झाल्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ शेअर करत दोन अन्यात व्यक्ती गाडीवर आले आणि त्यांनी कपिल शर्माच्या बंगल्यावर गोळीबार केला. त्यांनी दोन राऊंडमध्ये गोळीबार केला. त्यानंतर ते तेथून फरार झाले. पोलिसांना याबाबत माहिती मिळताच ते तातडीने घटनास्थळी पोहोचले असे म्हटले आहे. मात्र, आता या प्रकरणी पोलीसांनी माहिती दिली आहे. या सर्व अफवा असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
काय आहे व्हिडीओ?
कपिल शर्मा अमृतसर येथील पॉश भाग हॉली सिटीमध्ये राहतो. तेथे त्याचा दोन मजली बंगला आहे. या बंगल्यावर दोन अन्यात व्यक्तींनी गोळीबार केल्याच्या अफवा पसरवल्या जात आहेत. एका व्यक्तीने दिलेल्या माहितीनुसार जवळपास दोन राऊंड गोळीबार केल्यानंतर आरोपी तेथून पसार झाले. कपिल शर्माच्या कुटुंबीयांनी तातडीने पोलिसात तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलीस घटनास्थळी पोहोचले. त्यांनी घराचा सीसीटीव्ही फुटेज चेक केला आहे. त्यामध्ये त्यांना दोन आरोपी दिसत आहेत. आता हा हल्ला कोणी केला आहे? याचा तपास घेतला जात आहे. तसेच हल्ला झाला तेव्हा कपिल शर्मा घरात होता का? याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही. मात्र हे सर्व खोटं असल्याचं स्पष्ट झालं आहे.
गोळीबार नाहीच… पोलिसांचा खुलासा
दरम्यान, अमृतसरच्या पोलीस आयुक्तालयाने या बाबत खुलासा केला आहे. कपिल शर्मा यांच्या घरावर कोणताही गोळीबार झाला नाही. कुणीही चुकीच्या अफवा पसरवू नका, असं आवाहन त्यांनी केलं आहे. काही बेजबाबदार लोक अमृतसरमधील कपिल शर्माच्या घराबाहेर झालेल्या कथित गोळीबाराच्या घटनेबाबत अफवा पसरवत आहेत. या प्रकरणाची वस्तुस्थिती समोर आणण्यासाठी आणि लोकांचा गैरसमज दूर करण्यासाठी अधिकृत व्हिडिओ निवेदन जारी करण्यात येत आहे. नागरिकांना विनंती करण्यात येते की त्यांनी अफवांकडे लक्ष देऊ नका आणि केवळ अधिकृत स्रोतांकडून मिळालेल्या पडताळणी केलेल्या माहितीलाच विश्वास ठेवा, असं आवाहन पोलीस आयुक्तालयाकडून करण्यात आलं आहे.
कॅनडामधील कॅफेवर गोळीबार
यापूर्वी कॅनडातील सरे शहरात १२० स्ट्रीट परिसरात असलेल्या कपिल शर्माच्या ‘कॅप्स कॅफे’जवळ (Kaps Cafe) चौथ्यांदा गोळीबाराची घटना घडली होती. यावेळी कॅफेच्या शेजारी असलेल्या ‘चाय सुट्टा बार’ रेस्टॉरंटला लक्ष्य करण्यात आले, जिथे अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला. या घटनेनंतर परिसरात दहशतीचे वातावरण आहे.
सोशल मीडियावर पोस्ट
गोळीबारानंतर लगेचच सोशल मीडियावर ‘टायसन बिश्नोई जोरा सिद्ध’ नावाच्या एका कथित व्यक्तीने पोस्ट शेअर करून ही घटना कपिल शर्मासाठी एक इशारा असल्याचे म्हटले होते. या पोस्टमध्ये लिहिले होते की, हा हल्ला एक “संदेश” आहे आणि कपिल शर्माला “वठणीवर (लाईनवर) आणण्याची” धमकी देण्यात आली आहे. तसेच, जर त्याने हे ऐकले नाही, तर पुढचे लक्ष्य त्याचे ‘कॅप्स कॅफे’ आणि मुंबईतील घर असू शकते, असा इशाराही देण्यात आला आहे.
या घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून तपास सुरू करण्यात आला. हल्लेखोरांची ओळख पटवण्यासाठी आजूबाजूला लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले गेले. सध्या या प्रकरणी कोणालाही अटक झाल्याची पुष्टी झालेली नाही. या घटनेवर कपिल शर्माकडूनही अद्याप कोणतेही अधिकृत वक्तव्य आलेले नाही.
