AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आता आली AI एअर होस्टेस, जगातला असा पहिला देश ज्याने तयार केली पहिली AI एअर होस्टेस

तंत्रज्ञानाच्या जगात कृत्रिम बुद्धिमत्तेचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जात आहे. आता काही कंपन्या AI च्या मदतीने डिजिटल मानव तयार करत आहेत. दरम्यान, एका सरकारी विमान कंपनीने त्यांच्या केबिन क्रू मेंबर्समध्ये एआय एअर होस्टेसचा समावेश केला आहे.

आता आली AI एअर होस्टेस, जगातला असा पहिला देश ज्याने तयार केली पहिली AI एअर होस्टेस
AI AIR HOSTESImage Credit source: TV9 NEWS NETWORK
| Updated on: Mar 10, 2024 | 6:04 PM
Share

कतार | 10 मार्च 2024 : गेल्या काही वर्षांत जगभरात आर्टिफिशियल इंटेलिजन्सची (AI) क्रेझ वाढली आहे. जगभरात विविध क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जात आहे. AI चा वापर इतका वाढला आहे की आता कंपन्या AI ह्युमन देखील तयार करत आहेत. आत्तापर्यंत डिजिटल वेबसाइट्सवर आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जात होता पण आता AI च्या मदतीने डिजिटल ह्युमन तयार केले जात आहेत. केरळमधील एका शाळेत मुलांना शिकविण्यासाठी AI शिक्षिका दाखल झाली. याच क्रमवारीत आता जगातील आघाडीच्या एअरलाइन्सपैकी एका कंपनीने एआय एअरहोस्टेसचा समावेश त्यांच्या केबिन क्रूमध्ये केला आहे.

तंत्रज्ञानाच्या जगात कृत्रिम बुद्धिमत्तेचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जात आहे. आता काही कंपन्या AI च्या मदतीने डिजिटल मानव तयार करत आहेत. दरम्यान, एका सरकारी विमान कंपनीने त्यांच्या केबिन क्रू मेंबर्समध्ये एआय एअर होस्टेसचा समावेश केला आहे. कतार देशाने आपल्या सरकारी कतार एअरवेजमध्ये विमान कंपनीमध्ये एअर होस्टेस म्हणून एआयचा समावेश केला आहे. Sama 2.0 असे या एअर होस्टेसचे नाव आहे.

Sama 2.0 ही AI एअर होस्टेस कोणत्याही प्रकारे मानवी केबिन क्रूची जागा घेणार नाही. उलट ती अतिरिक्त वैशिष्ट्य म्हणून समाविष्ट केली गेली आहे असे कंपनीने सांगितले. कतारने एअरलाइन्समध्ये डिजिटल मानवाची ओळख करून देऊन एआयचा हा एक नवीन प्रकार सादर केला आहे. त्यामुळे कतार एअरवेज ही एआय एअर होस्ट्सचा समावेश करणारी जगातील पहिली एअरलाइन बनली आहे.

कंपनीच्या म्हणण्यानुसार, यामुळे प्रवाशांना प्रवासादरम्यान एक नवीन अनुभव मिळेल. एआय एअर होस्टेस समाला कंपनीने फ्लाइट अटेंडंट म्हणून नियुक्त केले आहे. मात्र, त्यापूर्वी समा हिला विशेष प्रशिक्षण दिले गेले आहे. कंपनीकडून समा या एआय एअर होस्टेसला सतत अपडेट करत आहे जेणेकरून ती प्रवाशांना रिअल टाइम उत्तरे देते. कतार एअरवेजच्या या प्रयोगामुळे आता जगातील इतर एअरलाईन्स कंपन्याही अशा प्रकारचे फीचर्स लाँच करू शकतात, अशी शक्यता निर्माण झाली आहे.

INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!
INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!.
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना.
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं.
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न.
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी.
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण.
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर.
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी.
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान.
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप.