बुलेट गिफ्ट, अनेकवेळा पैसेही दिले, 47 वर्षीय महिलेची लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक

लग्नाचं आमिष दाखवून एका 47 वर्षीय महिलेची फसवणूक झाल्याची घटना नाशिकमध्ये घडली आहे (Abuse of Women on the name of marriage in Nashik).

बुलेट गिफ्ट, अनेकवेळा पैसेही दिले, 47 वर्षीय महिलेची लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक
प्रातिनिधीक फोटो
Follow us
| Updated on: Jun 25, 2020 | 9:52 PM

नाशिक : गिफ्ट म्हणून बुलेट आणि अनेकवेळा पैसे देऊनही एका 47 वर्षीय महिलेची फसवणूक झाल्याची घटना नाशिकमध्ये घडली आहे (Abuse of Women on the name of marriage in Nashik). आरोपीने लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केली आणि शारीरिक अत्याचार केल्याचा आरोप पीडित महिलेने केला आहे. या प्रकरणी अंबड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

पीडित महिला नाशिक शहरातील कामटवाडे भागात राहते. आरोपीने या 47 वर्षीय महिलेला लग्नाचे आमिष दाखवत तिची आर्थिक फसवणूक केली. तसेच तिच्यावर शारीरिक अत्याचारही केल्याचा आरोप आहे. पीडित महिलेच्या तक्रारीवरुन अंबड पोलिसांत संशयित आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. आरोपी मूळचा उत्तरप्रदेशचा रहिवासी आहे. मात्र, गेल्या काही वर्षांपासून नाशिकमध्ये वास्तव्य करतो. या संशयित आरोपीने पीडितेला लग्नाचे आमिष दाखवत हे कृत्य केलंय.

पीडित महिला आणि संशयित आरोपी यांच्यामध्ये गेल्या काही वर्षांपासून मैत्री होती. या मैत्रीतूनच आरोपीने लग्नाचे आमिष दाखवत महिलेवर अत्याचार केला. आरोपीने वारंवार लग्नासाठी महिलेकडून पैशांची मागणी केली. लग्नाच्या अपेक्षेने पीडित महिलेने देखील आरोपीला बुलेट मोटार सायकल आणि रोख रक्कम दिली. मात्र, यानंतरही आरोपीने महिलेसोबत लग्न करण्यास नकार दिला. यानंतर पीडित महिलेने आरोपीला जाब विचारला असता त्याने तिला जीवे मारण्याची धमकी दिली. यानंतर पीडित महिलेने पोलिस ठाणे गाठत तक्रार नोंदवल्याची माहिती अंबडचे सहायक पोलीस निरीक्षक संजय बेडवाल यांनी दिली. अंबड पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरु आहे.

हेही वाचा :

पुण्यात गांजा-चरस तस्करी करणाऱ्यांच्या मुसक्या आवळल्या, 2 कोटी 10 लाखाचा मुद्देमाल जप्त

पुण्यात महामार्गावर दरोडा टाकणाऱ्या टोळीचा पर्दाफाश, जवळपास 5 कोटी मुद्देमालासह 7 आरोपींना बेड्या

Hindustan Petroleum | भिंतीत बोगदा खणून पाईपलाईन, ‘एचपी’ कंपनीतून हजारो लिटर डिझेल चोरी, चेंबूरमध्ये पर्दाफाश

Nagpur Crime | नागपुरात पार्किंगच्या वादातून 34 वर्षीय तरुणीची हत्या

Abuse of Women on the name of marriage in Nashik

Non Stop LIVE Update
तू ज्या शाळेत शिकतो बेटा, त्याचा मी हेडमास्तर; अजित पवारांचा खोचक टोला
तू ज्या शाळेत शिकतो बेटा, त्याचा मी हेडमास्तर; अजित पवारांचा खोचक टोला.
राजसाहेबांचं भाषण झोंबलंय, पिक्चर अभी... मनसे नेत्याचा राऊतांना इशारा
राजसाहेबांचं भाषण झोंबलंय, पिक्चर अभी... मनसे नेत्याचा राऊतांना इशारा.
पैसे मोजताना मी स्वतः...मातोश्रीवरचा तो किस्सा राणेंनी भरसभेत सांगितला
पैसे मोजताना मी स्वतः...मातोश्रीवरचा तो किस्सा राणेंनी भरसभेत सांगितला.
बाप तो बाप... बारामतीत शरद पवारांच्या सभास्थळी टोले लगावणारे बॅनर
बाप तो बाप... बारामतीत शरद पवारांच्या सभास्थळी टोले लगावणारे बॅनर.
माझ्याकडे असा दारूगोळा आहे, पण मी...; उज्ज्वल निकम यांचं सूचक वक्तव्य
माझ्याकडे असा दारूगोळा आहे, पण मी...; उज्ज्वल निकम यांचं सूचक वक्तव्य.
'हेमंत करकरेंना कसाबने नाहीतर RSS समर्थक पोलीस अधिकाऱ्यानं घातली गोळी'
'हेमंत करकरेंना कसाबने नाहीतर RSS समर्थक पोलीस अधिकाऱ्यानं घातली गोळी'.
मतांसाठी कसाबची बाजू... लाज बाळगा; भाजप नेत्याची वडेट्टीवारांवर टीका
मतांसाठी कसाबची बाजू... लाज बाळगा; भाजप नेत्याची वडेट्टीवारांवर टीका.
2004ला दादा मुख्यमंत्री, पवारांनी प्रस्ताव नाकारला, कुणाचा गौप्यस्फोट?
2004ला दादा मुख्यमंत्री, पवारांनी प्रस्ताव नाकारला, कुणाचा गौप्यस्फोट?.
संताच्या ओव्या, अभंग, मोदी..., सोशल मीडियावरील फडणवीसांचा अनोखा प्रचार
संताच्या ओव्या, अभंग, मोदी..., सोशल मीडियावरील फडणवीसांचा अनोखा प्रचार.
ठाकरेंची कशावरून सटकली? 'त्या' वक्तव्यावरून शिंदेंनी लगावला खोचक टोला
ठाकरेंची कशावरून सटकली? 'त्या' वक्तव्यावरून शिंदेंनी लगावला खोचक टोला.