Gosekhurd Dam | गोसेखुर्द धरणातून इतिहासातील सर्वाधिक विसर्ग, नदीकाठच्या गावांना अतिसतर्कतेचा इशारा

धरणातून आजवरच्या इतिहासातील सर्वाधिक विसर्ग झाला आहे. गोसेखुर्द धरणातून पाण्याचा 19,184 क्युसेक विसर्ग वैनगंगा नदीत प्रवाहित झाला आहे.

Gosekhurd Dam | गोसेखुर्द धरणातून इतिहासातील सर्वाधिक विसर्ग, नदीकाठच्या गावांना अतिसतर्कतेचा इशारा
प्रशासनाने नदीकाठच्या गावांना अतिसतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
Nupur Chilkulwar

|

Aug 29, 2020 | 5:27 PM

भंडारा : भंडारा जिल्ह्यातील गोसेखुर्द धरणाच्या पाणलोट क्षेत्रात (Gosekhurd Dam Door Open) पावसामुळे पाण्याची प्रचंड आवक झाली आहे. धरणातून आजवरच्या इतिहासातील सर्वाधिक विसर्ग झाला आहे. गोसेखुर्द धरणातून पाण्याचा 19,184 क्युसेक विसर्ग वैनगंगा नदीत प्रवाहित झाला आहे. या धरणाची 25 दारं 3 मिटरने, तर 8 दारं अडीच मिटरने उघडण्यात आली आहेत (Gosekhurd Dam Door Open).

याचा परिणाम गडचिरोली-चंद्रपूर जिल्ह्यावर होणार आहे. त्यामुळे प्रशासनाने नदीकाठच्या गावांना अतिसतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. तसेच, कमी उंचीचे पूल आणि जिल्ह्यातील काही मार्ग या विसर्गाने ठप्प झाले आहेत.

वैनगंगा नदीला पूर आल्यामुळे ब्रह्मपुरी तालुक्यातील गांगलवाडी ते आवळगाव, हळदा, मुडझा मार्ग आवळगाव नाल्याच्या पुलावर पाणी वाढत असल्यामुळे वाहतुकीस बंद करण्यात आला आहे. याच भागातील पिपंळगाव (भों) येथे गावात वैनगंगा नदीच्या पुराचे पाणी शिरण्यास प्रारंभ झाला आहे.

या भागातील शेतशिवारातही वैनगंगा नदीच्या पुराचे पाणी शिरत असून स्थानिक प्रशासनाने नागरिकांना सुरक्षित ठिकाणी जाण्यास सांगितले आहे. हा पूर चंद्रपूर-गडचिरोली जिल्ह्यातील भागात वैनगंगा नदी असलेल्या क्षेत्रात तीव्रतेने जाणवण्याची शक्यता आहे.

Gosekhurd Dam Door Open

संबंधित बातम्या :

वरुणराजा बरसला, मुंबई पाणीपुरवठा करणाऱ्या 7 पैकी 4 तलाव भरले

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें