भारतात 62 लॅब, 106 सॅम्पल कलेक्शन केंद्र, गुगल मॅपवर एका क्लिकवर माहिती उपलब्ध

कोरोनाशी सामना करण्यासाठी केंद्र सरकारने देशभरात 62 लॅब आणि 106 सॅम्पल कलेक्शन केंद्र सुरु केले आहेत (Labs and sample collection centers).

भारतात 62 लॅब, 106 सॅम्पल कलेक्शन केंद्र, गुगल मॅपवर एका क्लिकवर माहिती उपलब्ध
Follow us
| Updated on: Mar 19, 2020 | 3:13 PM

मुंबई : कोरोनाशी सामना करण्यासाठी केंद्र सरकारने देशभरात 62 लॅब आणि 106 सॅम्पल कलेक्शन केंद्र सुरु केले आहेत (Labs and sample collection centers). या सर्व केंद्रांची माहिती एका क्लिकवर मिळावी यासाठी हेल्थ अॅनलिस्टिक एशियाच्या डेटा टीमकडून तशी व्यवस्था करण्यात आली आहे. केंद्र सरकारने गुगल मॅपवर या सर्व लॅब आणि केंद्रांची माहिती उपलब्ध करुन दिली आहे (Labs and sample collection centers).

जगभरात थैमान घालणारा कोरोना भारतातही फोफावत चालला आहे. देशात आतापर्यंत 150 पेक्षा जास्त जणांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे. मात्र, तरीही भारताची कोरोनाशी झुंज सुरु आहे. कोरोनाविरोधात लढण्यासाठी भारताने आतापर्यंत देशभरात 62 लॅब आणि 106 सॅम्पल कलेक्शन केंद्र सुरु केली आहेत. त्याचबरोबर लॅब आणि सॅम्पल कलेक्शन केंद्रांची संख्या वाढवण्याच्या दृष्टीनेही प्रशासनाचे प्रयत्न सुरु आहेत.

याबाबत केंद्र सरकारने आपल्या विविध वेबसाईट्सवर माहिती दिली. ही माहिती सर्वसामान्यांना सोयिस्करपणे उपलब्ध व्हावी यासाठी हेल्थ अॅनलिस्टिक एशियाच्या डेटा टीमने संपूर्ण माहिती एकत्र करत गुगल मॅपच्या मदतीने भारताच्या नकाशाव्यावर प्रकाशित केली. त्यामुळे सर्वसामान्यांना सहज ही माहिती उपलब्ध होणार आहे.

महाराष्ट्रात 2 लॅब तर 5 सॅम्पल कलेक्शन केंद्र

गुगल मॅपमध्ये दाखवल्याप्रमाणे महाराष्ट्रात आजच्या घडीला मुंबई आणि नागपूर येथे लॅब सुरु आहेत. तर औरंगाबाद, धुळे, कोल्हापूर, सोलापूर, अकोला येथील सरकारी वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये सॅम्पल कलेक्शन केंद्र सुरु करण्यात आली आहेत.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारकडून पूर्णपणे खबरदारी घेतली जात आहे. केंद्र सरकार ज्याप्रकारे उपाययोजना करत आहे ते पाहून इतर देशही भारताचं कौतुक करत आहेत.

संबंधित बातम्या : 

शासकीय कार्यालयात 50 टक्के कर्मचारी, रेल्वे, बसेसमध्ये प्रवासी क्षमता कमी करणार : मुख्यमंत्री

Non Stop LIVE Update
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?.
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण.
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं.
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा.
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?.
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री.
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली.
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज.
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?.
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर.