अमित शाहांनी कानउघाडणी केल्यानंतर राज्यपालांनी स्वत:हून राजीनामा द्यायला हवा होता : अब्दुल सत्तार

अमित शहांनी कानउघाडणी केल्यानंतर राज्यपालांनी स्वत:हून राजीनामा द्यायला हवा होता , असं मत शिवसेना नेते तथा राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी व्यक्त केलंय.

बीड : “अमित शाहांनी कानउघाडणी केल्यानंतर राज्यपालांनी स्वत:हून राजीनामा द्यायला हवा होता , असं मत शिवसेना नेते तथा राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी व्यक्त केलं आहे. जर त्यांचे वरिष्ठ नेतेच नाराज असतील तर त्यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारुन राजीनामा द्यायला पाहिजे”, असं सत्तार म्हणाले. (Governor bhagatsinh Koshyari had to resign after Amit Shah’s criticism Says Abdul Sattar)

“राज्यपाल हे संविधानिक पद आहे. महामहिम शब्द बोलायलाही वेळ लागतो. अशा उच्च उदावर असलेल्या व्यक्तीने काही राजकारणी लोकांच्या हाताला धरुन असे पत्रव्यवहार केले याबद्दल अमित शहा यांनी राज्यपालांची कानउघाडणी केली. जर सुप्रिमोच नाराज असतील तर पदावर राहून काय फायदा असं म्हणत शाहांच्या टीकेनंतर त्यांनी लगोलग राजीनामा द्यायला हवा होता”, असं सत्तार म्हणाले.

राज्यपाल कोश्यारी यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांना लिहिलेल्या पत्रावरुन केंद्रीय गृहमंत्री अमित शाहदेखील नाराज आहेत. एका खासगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत अमित शाह यांनी आपण ते पत्र वाचल्याचं म्हटलंय. त्यातील काही शब्द कोश्यारी यांनी टाळायला हवे होते, असं अमित शाह म्हणाले.

शरद पवारांचा राज्यपालांवर हल्लाबोल ‘राज्यपाल हे देशातील महत्वाच्या आणि आदरणीय पदांपैकी एक पद आहे. त्या पदाचा आदर जसा राखला जातो, तसाच मुख्यमंत्री या पदाचाही राखला गेला पाहिजे. आता केंद्रीय गृहमंत्र्यांनी कानउघाडणी केल्यानंतर राज्यपालांनी पदावर राहावं नाही हे ठरवावं’, अशा शब्दात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर हल्लाबोल केला.

काय आहे प्रकरण? राज्यातील मंदिरं सुरु करण्याबाबत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्र्यांना एक पत्र लिहिलं होतं. त्या पत्रात राज्यापालांनी मुख्यमंत्र्यांना हिंदुत्वाची आठवण करुन देण्यासाठी काही प्रश्न विचारे होते. ‘राज्यात बार-रेस्टॉरंट सुरु झाले, मग देव कुलुपबंद का? तुम्हाला हिंदुत्वाचा विसर पडला आहे का?’ अशाप्रकारच्या पश्नांचा त्यात समावेश होता. त्यावरुन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही राज्यपालांना जोरदार प्रत्युत्तर दिलं होतं. माझ्या हिंदुत्वाला आपल्या प्रमाणपत्राची गरज नाही. तसेच ते कुणाकडून शिकण्याचीही मला गरज नाही, असं मुख्यमंत्र्यांनी आपल्या पत्रात म्हटलं होतं. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनीही राज्यपालांच्या पत्राबाबत नाराजी व्यक्त केली होती. पवार यांनी थेट पंतप्रधान मोदी यांना पत्र लिहून राज्यपालांच्या पत्रातील भाषेवर आक्षेप व्यक्त केला होता.

(Governor bhagatsinh Koshyari had to resign after Amit Shah’s criticism Says Abdul Sattar)

संबंधित बातम्या

स्वाभिमान शिल्लक असेल तर पदावर राहायचं की नाही ठरवायला हवं!, शरद पवार यांचा राज्यपाल कोश्यारींवर हल्लाबोल

धार्मिकस्थळं उघडली नाहीत म्हणून ‘सेक्युलर’ संबोधून अवहेलना करणार काय?; शरद पवारांचे पंतप्रधानांना खरमरीत पत्रं

राज्यपाल कोश्यारींवर आधी मुख्यमंत्री कडाडले, आता ओवेसीही भडकले!

बाळासाहेबांना हिंदुहृदयसम्राट म्हणणं बंद केलं, उद्धव ठाकरेंना हिंदुत्व शिकवण्याचीच गरज : चंद्रकांत पाटील

Published On - 3:57 pm, Mon, 19 October 20

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI