‘काय पो छे’तील सुशांतच्या सहकलाकाराचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

गुजराती चित्रपटांचे सुप्रसिद्ध दिग्दर्शक आणि अभिनेते आशिष कक्कड यांचे सोमवारी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.

'काय पो छे'तील सुशांतच्या सहकलाकाराचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

मुंबई : अभिनेता सुशांत सिंह राजपूतसह ‘काय पो छे’ चित्रपटात झळकलेले,  ‘बेटर हाफ’सह अनेक गुजराती चित्रपटांचे सुप्रसिद्ध दिग्दर्शक आणि अभिनेते आशिष कक्कड (Gujarati actor Ashish Kakkad) यांचे सोमवारी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. आशिष कक्कड त्यांच्या मुलाचा वाढदिवस साजरा करण्यासाठी अहमदाबादहून कोलकत्याला गेले होते. तिथून ते 6 नोव्हेंबरला घरी परतणार होते. मात्र, हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने त्यांची प्राणज्योत मालवली. आशिष यांचे मित्र, संगीतकार निशित मेहता यांनी यासंदर्भात माध्यमांना माहिती दिली. (Gujarati film maker actor Ashish Kakkad passed away due to cardiac arrest)

कोलकता येथे मुलाचा खास दिवस साजरा करायला गेलेल्या आशिष कक्कड यांना सोमवारी दुपारी 3.50 वाजताच्या दरम्यान हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने, झोपेतच त्यांची प्राणज्योत मालवली. काहीच दिवसांपूर्वी गुजराती मनोरंजन विश्वातल्या महेश-नरेश या दोन मातब्बर कलाकारांचे निधन झाले. या नंतर आशिष यांच्या निधनाच्या वृत्ताने मनोरंजन विश्वावर शोककळा पसरली आहे.

महाविद्यालयीन जीवनापासून मनोरंजन विश्वात सक्रिय

महाविद्यालयीन जीवनापासून आशिष यांना नाटकात रस होता. अभिनयापेक्षा बॅकस्टेज आणि लाइटिंग यासारख्या प्रॉडक्शनच्या कामामध्ये त्यांना अधिक रुची होती. कॉलेजमध्ये आशिषने एक लघुपट बनविला होता. या लघुपटामुळे त्याचे विशेष कौतुक झाले होते. कौतुकाच्या थापेने प्रेरणा मिळाल्यामुळे त्याने पुढे मनोरंजन विश्वात काम करायचे, असे स्वप्न त्यांनी उराशी बाळगले.(Gujarati film maker actor Ashish Kakkad passed away due to cardiac arrest)

गुजराती मनोरंज विश्वात समांतर चित्रपटांची सुरुवात करणाऱ्या आशिष यांनी रंगभूमी-चित्रपट-मालिका अशी तीनही क्षेत्रे आपल्या अभिनयाने गाजवली. 2014मध्ये प्रदर्शित झालेला ‘बेटर हाफ’ आणि 2016मध्ये प्रदर्शित झालेला ‘मिशन ममी’ या चित्रपटांमुळे त्यांना प्रसिद्धी मिळाली. बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या ‘काय पो छे’ या चित्रपटातील भूमिकेने त्यांना बॉलिवूडमध्येही ओळख मिळाली.

फिल्म मेकर अभिषेक जैन यांनी सोशल मीडियावर आशिष कक्कड यांचा फोटो शेअर करत त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

(Gujarati film maker actor Ashish Kakkad passed away due to cardiac arrest)

Published On - 7:10 pm, Tue, 3 November 20

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI